दावा- पुतिन यांना गर्लफ्रेंडपासून 2 मुले:कडेकोट बंदोबस्तात राष्ट्राध्यक्षांच्या बंगल्यात राहतात; कोणालाही भेटण्याची परवानगी नाही

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांची गर्लफ्रेंड एलेना काबाएवापासून दोन मुले आहेत. फोर्ब्सने आपल्या अहवालात दोन्ही मुलांचे वय 5 आणि 9 वर्षे असल्याचा दावा केला आहे. इव्हान आणि व्लादिमीर जूनियर अशी त्यांची नावे आहेत. मॉस्कोमधील पुतिन यांच्या बंगल्यात ते कडेकोट सुरक्षेखाली राहतात. ते त्यांच्या पालकांनाही क्वचितच भेटतात. फोर्ब्सने रशियाच्या एका तपास संस्थेच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, काबाएवा आणि पुतिन यांनी 2008 मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. 6 वर्षानंतर पुतिन यांनी पत्नीला घटस्फोट दिला. काबाएवाने स्वित्झर्लंडमधील प्रसूती केंद्रात इव्हानला आणि मॉस्कोमध्ये व्लादिमीला जन्म दिला. दोन्ही मुलांचा त्यांच्या वयाच्या इतर मुलांशी संपर्क होत नाही. ते घरीच संगीत, पोहणे आणि जिम्नॅस्टिक शिकतात. यासाठी वैयक्तिक प्रशिक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. इव्हानने जिम्नॅस्टिकशी संबंधित अनेक स्पर्धांमध्येही भाग घेतला आहे. याशिवाय त्याने वडील पुतिन यांच्यासोबत अनेकदा हॉकीचे सामनेही खेळले आहेत. पुतिन यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली वास्तविक, पुतिन यांनी अधिकृतपणे त्यांच्या पहिल्या पत्नीपासून फक्त त्यांच्या दोन मुलींचीच माहिती दिली आहे. मारिया आणि कतरिना अशी त्यांची नावे आहेत. पुतीन यांची गर्लफ्रेंड एलिना ही एक रशियन राजकारणी, मीडिया मॅनेजर आणि निवृत्त रिदमिक जिम्नॅस्ट आहे. तिने आपल्या कारकिर्दीत 2 ऑलिम्पिक पदके, 14 जागतिक चॅम्पियनशिप आणि 21 युरोपियन चॅम्पियनशिप पदके जिंकली आहेत. मात्र, पुतिन यांनी हे कधीही जाहीरपणे सांगितले नाही. पुतिन आणि त्यांच्या मुलांसोबत एलिनाच्या जवळीकीच्या बातम्या अनेकदा मीडियामध्ये येतात. पुतिन यांनी आपल्या गर्लफ्रेंडसाठी राजवाडा बांधला मागील वर्षाच्या सुरुवातीला, द प्रोजेक्ट या रशियन तपास न्यूज वेबसाइटने दावा केला होता की पुतिन यांनी त्यांची गुप्त मैत्रीण एलिना काबाएवासाठी एक आलिशान राजवाडा बांधला होता. हा राजवाडा सोन्याचा असून मॉस्कोपासून 250 मैल अंतरावर असलेल्या वालदाई तलावावरील जंगलात आहे. पुतिन यांचे येथे अनेक मोठे वाडे आहेत. अहवालानुसार, सुमारे 990 कोटी रुपये खर्चून 13 हजार स्क्वेअर फूटमध्ये व्हिलाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. पुतिन यांच्या खास राजवाड्यापासून ते फक्त 800 मीटर अंतरावर आहे. त्यात लाकडाचे काम करण्यात आले असून माणिक जडित झुंबर टांगण्यात आले आहे. येथे खेळाचे मोठे मैदानही आहे. एलिनाजवळील ब्लॅक-सी कोस्टवरील सर्वात मोठे अपार्टमेंट एलिना यांना 2014 मध्ये कोवलचॅकच्या कंपनी नॅशनल मीडिया ग्रुपची प्रमुख बनवण्यात आले होते. यामुळे त्यांना 86 लाख पौंड वार्षिक उत्पन्न मिळते. त्यांच्याकडे अनेक आलिशान मालमत्ता आहेत. ब्लॅक-सीकडे सोचीमध्ये एक पेंटहाऊस आहे, जो रशियामधील सर्वात मोठा अपार्टमेंट आहे. दावा- पुतिन हे एका गुप्त मुलीचे वडील देखील आहेत पुतिन यांचे अनेक महिलांशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सुवर्णपदक जिंकणारी जिम्नॅस्ट एलिना काबेबा हिचे नाव प्रथम येते. पुतिन यांना त्यांची मैत्रीण एलिना काबाएवासोबत तिसरी मुलगी असल्याची अफवा आहे. याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. रशियन मीडियाने 18 वर्षीय एलिझावेटा क्रिव्होनोगिखचे वर्णन पुतिन यांची गुप्त मुलगी म्हणून केले आहे. पुतिन यांच्या गुप्त कन्येबाबत ब्रिटनच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठातील व्हिज्युअल कम्प्युटिंग सेंटरचे संचालक प्रा. हसन उगेल म्हणाले होते की, पुतीन आणि त्यांच्या कथित मुलीचे चेहरे इतके सारखे आहेत की ते दोघेही वडील आणि मुलगी असल्याचे कोणीही नाकारू शकत नाही.

Share