भाजपचे भाकरीवर नाही तर भावनेवर राजकारण सुरू:काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची टीका

काँग्रेस पक्षाने सर्वसमावेशक राजकारण आतापर्यंत देशात केलेले आहे. पण भाजपचे भाकरीवर राजकारण न होता, भावनेवर राजकारण हे देशाला अधोगतीकडे नेणारे आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भावना भडकवने हे भाजपचे नेहमीचे षडयंत्र आहे. निवडणूक जिंकण्यासाठी तरुणाईला भडकवणे काम केले जात आहे. नागरिकांच्या समस्या यावर सत्ताधारी न बोलता भावनिक विषय जाणीवपूर्वक पुढे करत आहे. देशाची उंची वाढवणे काम काँग्रेस पक्षाने नेहमी केले आहे असे मत कसबा मतदारसंघातील उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा मतदारसंघात सभा घेऊन आमदार रवींद्र धंगेकर हे पोटनिवडणूक मध्ये अपघाती आमदार झाले असून त्यांचे काम सोडून दंगाच जास्त अशी खरमरीत टीका केली याबाबत धंगेकर म्हणाले, कसबा मतदारसंघ हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वसवलेले पेठांचे शहर आहे.सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत असताना फडणवीस हे जाती आणि धर्मात भावना भडकावने काम करत आहे. फडणवीस यांनी माझी सर्व नाटके पहिली पॉर्श कार अपघात मध्ये दोन मुले मयत झाली त्याप्रकरनाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला पण मी लक्ष्य घातल्याने घटना तपास नीट सुरू झाला. अमली पदार्थ घेऊन पब मध्ये धांगडधिंगा सुरू त्याला मी विरोध करून तरुणाईला वाचवणे प्रयत्न केला. ललित पाटील सारखे ड्रग तस्कर हे शासकीय व्यवस्था हाताशी धरून ड्रग रॅकेट चालवत होते त्यावेळी गृहमंत्री कुठे होते. फडणवीस हे निवडणूक काळात दोन समाजात विष कालवणे काम करत आहे. समाजात द्वेष निर्माण करू नका. पुणे गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसत नाही. माझी फडणवीस यांना विनंती आहे की, मी चुकीच्या पद्धतीवर बोलत असेल तर त्यांना माझे नाटक का वाटत आहे. निवडणूक येतील आणि जातील पण पुणे सुरक्षित राहिले पाहिजे. फडणवीस यांनी माझ्या मतदारसंघात माझ्या सारख्या चांगल्या कार्यकर्त्यांचा आणि मतदार यांचा अपमान केला आहे. माझा मतदारसंघातील विकास निधी भाजपने पळवून नेला पण न्यायालयात जाऊन मी तो मिळवून आणला.

Share