काँग्रेसचे राज्यातील नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत:जागांचा तिढा सोडवण्यासाठी राहुल गांधींशी चर्चा करणार, संजय राऊत यांची माहिती

जागावाटपाच्या रखडलेल्या निर्णयाला गती मिळाली पाहिजे. महाराष्ट्राचे नेते निर्णय घेण्यास सक्षम नेते नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आम्हाला महाराष्ट्राचा जास्त अनुभव आहे. भापज विरोधात कसे लढायचे हे आम्हाला माहीत आहे, असेही त्यांनी सांगितले. आमच्यामध्ये जवळपास बऱ्याच जागांमध्ये सहमती झाली असून काही जागांचा तिढा आहे. याबाबत मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. राहुल गांधी यांच्याही बोलणार आहे. काही जागांवर अडलेली गाडी पुढे नेण्यासाठी निर्णय लवकर व्हावा, असे राऊत म्हणाले. संजय राऊत आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काही जागांवर तिन्ही पक्षांचा दावा महाराष्ट्रातील काँग्रेस नेता जागावाटपाबाबत निर्णय घेण्यास सक्षम नाहीत, त्यांना वारंवार दिल्लीत यादी पाठवावी लागते. त्यानंतर चर्चा होते. पण आता ती वेळ निघून गेली आहे. जागावाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय व्हायला हवा. तिन्ही पक्षांमध्ये जास्त मतभेद नाहीत. काही जागांवर तिन्ही पक्ष दावा करत आहेत. त्यावर आम्ही दिल्लीतील हायकमांडशी चर्चा केली आहे. याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर त्यांनी काही सूचना दिल्या आहेत, त्याचे मी पालन करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. राहुल गांधींशी चर्चा करणार 200 पेक्षा जागांवर आमच्यात सहमती आहे. उरलेल्या जागांचा तिढा आहे. यावर मी सर्व नेत्यांशी चर्चा केली असून राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रात प्रत्येकाला आपले पक्ष टिकवायचे आहेत आणि चालवायचे आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना देखील पहाव्या लागतात. त्यामुळे जास्त खेचाखेची योग्य नाही, पण निर्णय लवकर व्हावेत, असे राऊत म्हणाले. भाजपच्या बिश्नोई गँगकडे ईडी, सीबीआय सारखी हत्यारे
महाराष्ट्रातील भ्रष्ट भाजप सरकारचा आम्हाला पराभव करायचा आहे. भाजपशी कसे लढायचे हे आम्हाला माहीत आहे. भाजप सरकारने शिवसेनेला जास्त त्रास दिला आहे. आमच्यासारखे लोक तुरुंगात जाऊन आले आहेत. त्यामुळे टार्गेटवर कोण आहेत आणि काय होऊ शकते याबाबत आम्हाला माहिती आहे. भाजपच्या बिश्नोई गँगकडे ईडी, सीबीआय सारखी हत्यारे आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. … त्या बदल्यात विधासभेला अपेक्षा करणे काही चूक नाही
लोकसभा निवडणुकीला रामटेक सारखी सहा वेळा निवडून आलेली तसेच अमरावतीची हक्काची जागा काँग्रेसला दिली. त्या मोबदल्यात विधानसभेला आम्ही काही अपेक्षा ठेवणे यात मला चुकीची काही वाटत नाही, असे संजय राऊत म्हणाले. लोकसभेला दिलेल्या जागा जिंकल्यानंतर विधानसभेला दोनचार जागा जास्त मिळाव्या अशा कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचे राऊत म्हणाले.

Share

-