क्रिकेटपटू संजय बांगरच्या मुलाने लिंग बदलले:आर्यन आता बनली अयाना, पोस्टमध्ये म्हणाला, मी शक्ती गमावतोय पण मला आनंद मिळतोय

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू संजय बांगरचा मुलगा आर्यन (आता अयाना) याने सोमवारी लिंग बदलाचा (हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन) अनुभव शेअर केला. आर्यनने ११ महिन्यांपूर्वी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (एचआरटी) करून घेतली होती. २३ वर्षीय आर्यनने सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला व लिहिले, ‘मी शक्ती गमावत आहे, पण आनंद मिळवत आहे. शरीर बदलत आहे, डिसफोरिया कमी होत आहे… अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, पण प्रत्येक पाऊल माझ्यासारखे वाटते.’ आर्यनही (अयाना) क्रिकेटपटू आहे. २० ऑक्टोबर रोजी इंग्लिश, वेल्स क्रिकेट बोर्डाने ट्रान्सजेंडर महिलांना व्यावसायिक क्रिकेटमध्ये बंदी घातली. यामुळे आर्यन (अयाना) यापुढे महिला क्रिकेटमध्ये भाग घेऊ शकणार नाही. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (एचआरटी) म्हणजे काय? या प्रक्रियेत स्त्री किंवा पुरुषाचे हार्मोन्स बदलून त्यांचे लिंग बदलले जाते. यात प्लास्टिक सर्जरीचीही मदत घेतली जाते. भारतात २०१४ मध्ये यास मान्यता मिळाली. लिंगबदल शस्त्रक्रियेच्या संपूर्ण प्रक्रियेत किमान चार डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, सर्जन, स्त्रीरोगतज्ज्ञ व एका न्यूरो सर्जनचा सहभाग असतो. ही शस्त्रक्रिया २१ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांवरच केली जाते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Share

-