महिला मतदानाच्या टक्केवारीत वाढ, देवेंद्र फडणवीस यांचा दावा:पुन्हा महायुतीचे सरकार येण्याचा विश्वास; मुख्यमंत्री पदाबाबतही केले भाष्य
महाराष्ट्र मध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आजपर्यंतचा अनुभव पाहता जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढली आहे, तेव्हा तेव्हा भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजप आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात वाढलेली मतदानाची टक्केवारी ही महिलांची असल्याचा दावा देखील त्यांनी केला. नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, या वेळी ते बोलत होते. आम्ही मतदारसंघातील बुथ वरील आकडेवारी जमा केली आहे. आणि प्राथमिक फीडबॅक नुसार महिलांची टक्केवारी वाढलेली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सत्ता स्थापनेसाठी अपक्ष उमेदवारांची गरज लागेल का? त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. मात्र, यावर भारतीय जनता पक्ष आणि आम्ही अद्याप कोणाशी संपर्क साधलेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी नेहमीच अदानींवर आरोप करतात. त्यात काय नवीन काहीच नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री पदाबाबत आतापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही. निकाल आल्यानंतर तिन्ही पक्ष एकत्र बसून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. साधारणपणे मतदानाची टक्केवारी ज्या पद्धतीने वाढली आहे. त्यात सरकारच्या बाजूने लोकांचा कल असू शकतो, असा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. मनसेच्या पराभवासाठी ठाकरे-शिंदे यांची छुपी युती होती का?:संदीप देशपांडे यांचा लाडक्या बहिणीचे भाऊ चीटर असल्याचा आरोप राज्यातील लाडक्या बहिणींचा भाऊ हा चिटर असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेने एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असल्याचे पत्र व्हायरल झाले होते. यावर संदीप देशपांडे यांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे. मनसेला हरवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे यांची छुपी युती होती का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पूर्ण बातमी वाचा… बहुमत असो किंवा नसो, अपक्षांना सोबत घेणार:भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा; लाडक्या बहिणींच्या मतदानावर विश्वास राज्यात मतांचा टक्का वाढला आहे. राज्यातील लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केले असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. वाढलेल्या मतदानाचा आम्हाला फायदा आम्हाला होईल, असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळाले तरी किंवा नाही मिळाले तरी सत्ता स्थापन करताना अपक्षांना सोबत घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्यात महायुती पुन्हा सत्ता स्थापन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पूर्ण बातमी वाचा…. राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार:काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांचा दावा; एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचेही केले स्पष्ट राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे नेते तथा नागपूर उत्तर विधानसभा मतदाररसंघातील उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील जनतेची पहिली पसंती महाविकास आघाडी असल्याचा दावा देखील त्यांनी केला. विविध संस्थांनी दाखवलेल्या एक्झिट पोलवरही त्यांनी साशंकाता व्यक्त केली आहे. एक्झिट पोलमधील अंदाज हा खरा नसतो, असेही त्यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…. राज्यातील राजकारणावर सट्टा बाजारातही वातावरण तापले:मोठ्या प्रमाणात उलाढाल; बहुमत कोणाला? कोणत्या पक्षाचे सरकार येणार? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र यातच विविध संस्थांच्या वतीने एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात सरकार कोणाचे येणार? यावर अंदाज मांडण्यात येत आहे. याच अंदाजात सर्वात महत्त्वाचा असतो तो सट्टा बाजार. राज्यातील सट्टा बाजारात सुद्धा राज्याच्या निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. 23 नोव्हेंबर रोजी कुणाला बहुमत मिळणार आणि कोणत्या पक्षाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार असले तरी यामुळे सट्टा बाजारात चांगलीच उलाढाल झाल्याचे दिसून येत आहे. पूर्ण बातमी वाचा….