ढोलबारे कृउबा माथाडी कर्मचाऱ्यांनी एक ट्रॉली कचऱ्याची केली होळी:बागलाण कसमादे कृषी मार्केटच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता उपक्रम
ढोलबारे तालुका बागलाण येथील खाजगी कृषी बाजार समितीच्या माथाडी कर्मचाऱ्यांनी परिसरातील घातक एक ट्राली कचरा आणि प्लास्टिकची होळी करीत होळीच्या पूर्वसंध्येस पर्यावरण संतुलनचा संदेश दिला. प्लास्टिकचा दिवसेंदिवस होणारा वाढता वापर तसेच पुनर्वापर होऊ न शकणारा कचरा हा दिवसेंदिवस बाधक ठरत आहे. प्लास्टिकचा वापर आजच आटोक्यात आणला नाही तर येणाऱ्या पिढ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. या संकटाचे विपरीत परिणाम ओळखून ढोलबारे येतील खासगी शेतकरी कृषी बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी भर उन्हात बाजार समिती आवारातील प्लास्टिक व कचरा गोळा करुन स्वच्छतेबाबत सामाजिक संदेश दिला. जमा झालेल्या कचऱ्याच होळी करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सभापती सुरेश पवार, ढोलबारे ग्रामपंचायतीचे उपसरपंच भिला ठोंबरे, सदस्य रावसाहेब ठोंबरे, सचिव गणेश पवार, उपसचिव प्रा. अमोल बच्छाव आदींसह आधीसह माथाडी कामगार व कर्मचारी उपस्थित होते. होळी उत्सव हा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सवांमधील अतिशय महत्त्वाचा उत्सव असून या दिनी समाजातील वाईट गोष्टींचे दहन आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार अरण्याचा मानस असतो. आजच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाच्या संवर्धनार्थ जो सकारात्मक संदेश दिला तो खरोखरच कौतुकास्पद आहे. – गणेश पवार, सचिव, बाजार समिती