दिव्य मराठी अपडेट्स:‘नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांचे निधन

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची आज प्रक्षाळपूजा, राजोपचार पूर्ववत पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची बुधवारी (20 नोव्हेंबर) प्रक्षाळपूजा होत आहे. श्रींचे 24 तास सुरू असणारे दर्शन बुधवारपासून बंद होऊन सर्व नित्य राजोपचार सुरू होणार आहेत. 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी संपन्न झाली, तर 4 नोव्हेंबरपासून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपूजेपर्यंत बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. बुधवारी प्रक्षाळपूजा होत असून, त्या दिवशी पहाटे 4 ते 5 या वेळेत नित्यपूजा, दु.12.20 ला पहिले स्नान, दु. 2.10 ते 5.30 या वेळेत महाअभिषेक, पोशाख, अलंकार व महानैवेद्य तसेच सायं.6.45 वाजता धूपारती व रात्री 12 नंतर शेजारती होणार आहे. या दिवशी श्रींचा पलंग शेजघरामध्ये ठेवण्यात येत असून श्रींचे सुरू असणारे 24 तास दर्शन बंद होऊन, सर्व नित्य राजोपचार पूर्वीप्रमाणे सुरू होत आहेत. तसेच देवाचा शिणवटा/थकवा घालविण्यासाठी आयुर्वेदिक काढा श्रीस नैवेद्य म्हणून रात्री शेजारतीवेळी दाखविण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
‘नक्षत्रांचे देणे’ फेम गायक मुकुंद फणसळकरांचे निधन पुणे – ‘नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर (60) यांचे अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात मंगळवारी निधन झाले. फणसळकर यांच्या पार्थिवावर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुगम संगीत क्षेत्रातील अनेक कलाकार या वेळी उपस्थित होते.
“नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रमाच्या माध्यमातून फणसळकर घराघरात पोहोचले होते. त्यापूर्वी त्यांचा ‘स्मरणयात्रा’ हा सुगम संगीताची वाटचाल उलगडणारा कार्यक्रम जागतिक मराठी परिषदेत गाजला होता. ‘सारेगमप’ कार्यक्रमाचे ते पहिले विजेते ठरले होते. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. कालीचरण महाराजांवर गुन्हा नोंदवा; मराठा समाजाची मागणी खुलताबाद – मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, खुलताबाद तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. मागणीचे निवेदन खुलताबाद पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कुठलाही समाज असो, त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली जातात. मराठा समाज मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून आंदोलने करत आलेला आहे. गेल्या 40 वर्षांपासूनची मराठा आरक्षणाची मागणी वेगवेगळ्या कालखंडात आंदोलनाद्वारे, समाजाने शासनाकडे मांडली आहे. अशातच मूक मोर्चाच्या माध्यमातून 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने 58 मोर्चे मराठा समाजाने राज्यात काढल.16 महिन्यांपासून जरांगे पाटील यांनी उपोषणे आणि रॅली, सभांच्या माध्यमातून शासन दरबारी मराठा समाजाची कैफियत कायद्याच्या चौकटीत मांडली आहे. मात्र, समाजाविरोधात काही जणांनी वक्तव्य करण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे कालीचरण महाराजांवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली. जनार्दन स्वामींचा 35 वा पुण्यस्मरण सोहळा 5 ते 12 डिसेंबरदरम्यान नाशिक – निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या 35 व्या पुण्यस्मरणानिमित्त ओझर येथील आश्रमात 5 ते 12 डिसेंबरदरम्यान जनशांती धर्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्याच्या तयारीला वेग आला अाहे. या सोहळ्याचे ध्वजारोहण 24 नोव्हेंबर राेजी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्यासह अनेक साधू-महंतांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यात जनशांती धामातील विविध मंदिरांवर सुवर्ण कलशांची स्थापना तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या लक्षवेधी सोहळ्याप्रसंगी महाजपानुष्ठान, 108 कुंडात्मक कार्यसिद्धी महायज्ञ, अखंड नंदादीप, महाअभिषेक, पूजन, हस्तलिखित नामजप, नामसंकीर्तन, भागवत पारायण, पहाटे ब्रह्म मुहुर्तावर नित्यनियम विधी, आरती, सत्संग, भागवत वाचन, श्रमदान असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सोहळ्याच्या नियोजनासाठी भक्त परिवारातील प्रमुख सदस्यांची ओझर आश्रमात नुकतीच नियोजन बैठक झाली. विभक्त राहणाऱ्या पत्नीवर पतीने केला ब्लेडने हल्ला पुणे – कौटुंबिक वादातून 35 वर्षीय महिला पतीपासून मागील काही दिवसांपासून विभक्त राहत हाेती. त्यामुळे पतीने दारू पिऊन पत्नीकडे जात तिला “तू माझ्यासाेबत रहा’ अशी बळजबरी केली. महिलेने त्यास विराेध केला असता पतीने धारदार ब्लेडने पत्नीच्या शरीरावर वार करून तिला जखमी केल्याची घटना पुण्यात घडली. या घटनेत रेखा संताेष चाैधरी (वय-35,रा.वडगाव,पुणे) ही महिला जखमी झाली असून तिचा पती सतीश संताेष चाैधरी (37) याच्यावर सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. वडगाव परिसरात एका इमारतीत महिला पतीपासून विभक्त राहत हाेती. मात्र, दोन दिवसांपूर्वी सतीश हा पत्नीकडे दारू पिऊन आला. त्यानंतर त्याने पत्नीस आपण सोबत राहू असे सांगितले. मात्र, पत्नीने नकार देताच त्याने हल्ला केला. दारू पाजण्यावरून मारहाण, गुन्हा दाखल बीड – ‘तू आम्हाला दारू पाज किंवा तू आमच्या पैशाची दारू पी’, अशी भांडणाची कुरापत काढून एकास तिघांनी मारहाण केली. ही घटना बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथे 12 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल आहे. पिंपवाडी येथील अशोक रंगनाथ ढोकळ यांना तिघांनी दारूच्या कारणावरून मारहाणकेली. या प्रकरणी आप्पा पाखरे, पाटील पाखरे, गौतम निकाळजे (सर्व रा. पिंपळवाडी, ता. बीड) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हवालदार राऊत करत आहेत. जालन्यात आचारसंहितेत 1 कोटीची रोकड जप्त जालना – जालना पोलिस दलाने आचारसंहिता काळात 1 कोटी 7 लाख 55 हजार 570 रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे जप्त करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अजयकुमा बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाया वाढविल्या आहेत. दरम्यान, कारवाया करीत असताना 2 कोटी 32 लाखांचा अवैध मद्य, गांजा, गुटखाही जप्त करण्यात आला आहे. अवैध शस्त्रांबाबत कारवाया करीॉत असताना 32 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवायांमुळे एकच खळबळ उडाली आहे. उपद्रवींवर पोलिसांचे लक्ष आहे. बहिणीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ‎महिलेस मारहाण, जिंतूरला गुन्हा दाखल‎ परभणी – जिंतूर शहरातील बेलदार कॉलनी येथे‎फिर्यादीच्या बहिणीला मारहाण करताना, भांडण‎सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेसही संशयितांनी‎मारहाण केली. ही घटना 18 नोव्हेंबरला जिंतूर‎शहरातील बेलदार कॉलनी भागात घडली. गौसिया बी‎सय्यद यांनी तक्रार दिली आहे. संशयित त्यांच्या‎बहिणीला मारहाण करत होते. भांडण सोडविण्यासाठी‎गेलेल्या फिर्यादी महिलेलाही मारहाण करण्यात आली.‎या प्रकरणी अफसाना शेख, मैमुना, शेख शोयब, शेख‎सलीम यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास‎पोलिस हवालदार जोगदंड करत आहेत.‎ परभणीतील 1623 मतदान‎केंद्रांवर 12 हजार कर्मचारी‎ परभणी‎ – जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये 6 मतदान केंद्र‎संवेदनशील आहेत. यात जिंतूर, परभणीत प्रत्येकी 2, तर‎गंगाखेड व पाथरी मतदारसंघात प्रत्येकी 1 मतदान केंद्र‎संवेदनशील आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील‎1623 पैकी 931 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात‎येणार आहे. या सर्व मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य‎घेऊन 12 हजार 568 कर्मचारी मंगळवारी रवाना झाले.‎कृषी विद्यापीठात साहित्याचे वाटप झाले.‎ जिंतूर मतदारसंघात 438, परभणी 338, गंगाखेड 432‎ आणि पाथरीत 415 मतदान केंद्रे आहेत. चारही‎विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 1 महिला मतदान केंद्र,‎1 दिव्यांग अधिकारी मतदान केंद्र आणि 1 तरुण अधिकारी‎मतदान केंद्र असेल. सर्व मतदान केंद्रांवर 1738 पोलिस‎आणि 1417 होमगार्ड जवान तैनात असतील. तसेच‎केंद्रीय राखीव पोलिस दल आणि राज्य राखीव पोलिस‎दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या अाहेत.‎संवेदनशील मतदान केंद्रावर अधिकचे पोलिसबळ‎उपलब्ध करून देण्यात आले आहे.‎ सिलिंडर चोरणाऱ्यांना जालन्यात पकडले जालना – ऑटोरिक्षातून गॅस सिलिंडर चोरून नेणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्या ताब्यातून तीन गॅस सिलिंडर, ऑटो रिक्षासह 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जालना शहरातील लोधी मोहल्ला ते मंमादेवी मार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू मामा यांच्या पालखीचे प्रस्थान बीड – लिंबागणेश येथे 9 नोव्हेंबर 2024 रोजी बाळू मामांच्या मेंढ्या पालखीसह श्री क्षेत्र लिंबागणेश येथे आल्या होत्या. यामध्ये 3 हजार मेंढा होत्या. यासोबत त्यांचे सेवेकरीही उपस्थित होते. त्यांच्या मेंढरांचे नियमाप्रमाणे शनिवार व रविवार रोजी लोकर कात्रण समारंभ झाला. या वेळी समस्त लिंबागणेशकरांनी बाळू मामांच्या तळ्यावरती आलेल्या सर्व भाविक भक्तांना पुरणपोळीचा महानैवेद्य समर्पित करण्यात आला. लिंबागणेशसह पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते. 11 दिवसाच्या मुक्कामानंतर बाळू मामाच्या पालखीचे मंगळवारी वैद्यकिन्हीकडे प्रस्थान झाले. सोशल मीडियावर अफवा‎रोखण्यासाठी पाच पथके‎ हिंगोली‎ – जिल्ह्यातील तीन विधानसभा‎मतदारसंघात अफवा‎पसरविणाऱ्यांची गय केली जाणार‎नाही. सोशल मीडियावर लक्ष‎ठेवण्यासाठी सायबर सेलची पाच‎पथके स्थापन करण्यात आली‎अाहेत, अशी माहिती पोलिस‎अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी‎ दिली.‎ हिंगोली, कळमनुरी आणि वसमत‎विधानसभा मतदारसंघात सर्व‎मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त तैनात‎आहे. जिल्ह्यात 2000 पेक्षा अधिक‎पोलिस अधिकारी व कर्मचारी‎नियुक्त आहेत. या सोबतच राज्य‎राखीव दल व सीमा सुरक्षा दलाच्या‎4 कंपन्या दाखल झाल्या आहेत.‎जवान तैनात केले आहेत.‎संवेदनशील भागात स्थानिक‎पोलिसांसोबतच इतर 18 पथकांच्या‎माध्यमातून गस्त घातली जात आहे.‎जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू‎करण्यात आले असून पाच किंवा‎त्यापेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र‎थांबू नये, असे आवाहन केले आहे.‎ धुळ्यात नीचांकी तापमान 10.8 अंशांवर, संभाजीनगर 14.4 वर नाशिक – हिमालयीन प्रभावामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका हळूहळू वाढत असून राज्यात मंगळवारी धुळे सर्वात कमी 10.8 अंश तर नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये 10.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. संभाजीनगरमध्ये पारा 14.4 वर होता. राज्यात दोन दिवसांपासून तापमान घसरत आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत थंडीचे प्रमाण अधिक आहे, तर मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीपेक्षा 1 ते 2 अंश सेल्सियसने कमी आहे.

Share

-