दिव्य मराठी अपडेट्स:रिझर्व्ह बँकेचे आज द्वैमासिक पतधोरण; महागाई आणि विकास दरामुळे व्याज दर ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स रिझर्व्ह बँकेचे आज द्वैमासिक पतधोरण मुंबई – रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण ठरवण्यासाठी चलनविषयक समितीच्या तीन दिवसीय बैठकीनंतर शुक्रवारी सकाळी 10 वाजता पतधोरण जाहीर करण्यात येईल. वाढती महागाई आणि घटत्या विकास दरामुळे व्याज दर ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तत्पूर्वी,व्याज दर कपातीच्या अाशेने गुरुवारी सेन्सेक्स 809 अंकांनी वधारला होता. शेतकऱ्यांची आज दिल्ली कूच; प्रशासन राेखणार चंदीगड/अंबाला – एमएसपीसह विविध मागण्यांसाठी दीर्घकाळ संपावर असलेल्या शेतकरी संघटनांनी शुक्रवारी पायी दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हरियाणामध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरियाणा पोलिस म्हणाले, शेतकऱ्यांना पुढे जाऊ दिले जाणार नाही. कारण दिल्लीत निदर्शने किंवा धरणे आंदोलनास परवानगी नाही. पंजाब सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दलाच्या 15 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. नाकेबंदीसाठी लोखंडी व दगडी बॅरिकेड्स, काटेरी तार आणि धारदार खिळे लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय न्यायिक संहितेचे कलम 163 (बीएनएस) हरियाणातील पाच जिल्ह्यांमध्ये (अंबाला, सिरसा, जिंद, कैथल, फतेहाबाद) लागू करण्यात आले आहे. या जिल्ह्यांचे आयजी आणि एसपी सीमेवर जाऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. दरम्यान, युनायटेड किसान मोर्चा (गैर-राजकीय) व किसान मजदूर मोर्चा (केएमएम) यांनी सांगितले की, 101 शेतकऱ्यांचा एक गट शुक्रवारी दुपारी 1 वाजता दिल्लीला रवाना होईल. राज्यात 2 दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नाशिक – अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र हे विरून गेले आहे तसेच राज्यात आगामी दोन दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. समुद्रात अति तीव्र दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस झाला. बुधवारी मध्यरात्री नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. शहरात मध्यरात्री दोन तासांत 31.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर शुक्रवारी राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर, बीड, धाराशिव, सातारा, सांगली, बीड, लातूर या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस राहणार आहे.
अल्लू अर्जुनविरुद्ध सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल हैदराबाद – ‘पुष्पा 2 द रुल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान हैदराबादेतील संध्या सिनेमागृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी तिचा 9 वर्षांचा मुलगा जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अभिनेता अल्लू अर्जुन आणि संध्या सिनेमागृहाच्या व्यवस्थापकांनाही आरोपी करण्यात आले. बुधवारी पुष्पा 2 चा प्रीमियर शो होता. यादरम्यान अल्लू अर्जुन कोणतीही सूचना न देता संध्या थिएटरमध्ये पोहोचला. त्याला पाहण्यासाठी गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली. दुसरीकडे, ‘पुष्पा 2 द रुल’चे शोदेखील तेलंगण आणि कर्नाटकच्या चित्रपटगृहांमध्ये पहाटे 3 वाजता ठेवण्यात आले आहेत. यावर कन्नड फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशनने आक्षेप घेतला आहे. अल्पवयीन मुलीवर तिघांचा‎अत्याचार; पीडिता गर्भवती‎ आष्टी‎ – हिंगोली जिल्ह्यातून कामासाठी‎आलेल्या मजुराच्या 15 वर्षीय‎मुलीवर, रेल्वेतून उतरलेल्या तिघांनी‎अत्याचार केल्याची घटना उघडकीस‎आली अाहे. या घटनेत पीडित मुलगी‎नऊ महिन्यांची गर्भवती आहे.‎याप्रकरणी अज्ञात तिघांवर सोमवारी‎(2 डिसेंबर) अत्याचाराचा गुन्हा‎दाखल करण्यात आला.‎ हिंगोली जिल्ह्यातील एक कुटुंब‎दोन वर्षांपूर्वी मजुरीच्या कामासाठी‎आष्टी तालुक्यात आले होते. मार्च‎महिन्यात मजुराची अल्पवयीन मुलगी‎गावातील शाळेत रेल्वे रुळांच्या‎बाजूने जात होती. त्यावेळी‎अनोळखी तिघे जण रेल्वेतून उतरले.‎तिघांपैकी दोघांनी तिच्या हाताला‎धरून रेल्वे रुळांजवळील शेतात‎नेले. यातील एकाने तिच्यावर‎अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित‎अल्पवयीन मुलगी 9 महिन्यांची‎गर्भवती असल्याची धक्कादायक‎माहिती समोर आली आहे. या‎प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या‎तक्रारीवरून सोमवारी अनोळखी‎तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात‎आला. उपअधीक्षक बाळकृष्ण‎हानपुडे, पोलिस निरीक्षक शरद‎भुतेकर, सहायक पोलिस निरीक्षक‎विक्रांत हिंगे यांनी माहिती घेतली.‎ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात‎ 10 डिसेंबरला होणार पेन्शन अदालत‎ नांदेड – जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त‎झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे‎निवारण करण्यासाठी पेन्शन अदालत घेण्यात येणार‎आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी म्हणजेच‎10 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 1:30 या वेळेत‎जिल्हाधिकारी कार्यालयात पेन्शन अदालतीचे आयोजन‎करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी,‎कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी या दिवशी‎उपस्थितीत राहून तक्रारींचे निवेदन द्यावे.‎ संभाजीनगरात किरकोळ कारणावरून मजुराची हत्या छत्रपती संभाजीनगर – शहरातील मिसारवाडी भागातील सनी सेंटर येथील मैदानात एका मजुराची किरकोळ कारणावरून हत्या करण्यात आली. मृताच्या परिचयातीलच दोन ते तीन जणांनी चाकूने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी (5 डिसेंबर) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. विकास ज्ञानदेव खळगे (31, रा.मिसारवाडी) असे मृताचे नाव आहे. त्याच्यासोबत त्याचा भाचा गौतम राजू जाधव (21, रा. मिसारवाडी) हा देखील जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हँडबॉल स्पर्धेचे शनिवारी आयोजन छत्रपती संभाजीनगर – सागर तांबे हँडबाॅल अकादमीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेचे 7 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रमाबाई आंबेडकर हायस्कूल, एन 7 सिडको येथे पार पडेल. स्पर्धा खुल्या गटात व बाद पद्धतीने खेळवली जाईल. स्पर्धेत 25 संघांनी प्रवेश निश्चित केला आहे. विजेत्या संघांना आकर्षक चषक प्रदान करण्यात येईल. स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक सुभाष चव्हाण यांच्या हस्ते आणि प्रा. एकनाथ साळुंके, प्रा. सागर मगरे यांच्या उपस्थितीत होईल. अनधिकृत बॅनर; जालन्यात 4‎ डॉक्टरांसह 22 जणांवर गुन्हे‎ जालना‎ – जालना शहरातील विविध भागांत‎ अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात‎ आलेले आहेत. यामुळे वाहतुकीला‎ अडथळा निर्माण होत आहे. अनेक‎ बॅनरमुळे अपघातांची शक्यता ‎निर्माण झाली आहे.‎ महानगरपालिकेच्या पथकाकडून‎ गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे.‎ एका दिवसात 22 जणांवर गुन्हे‎दाखल केले असून यात नामांकित ‎चार डॉक्टरांचा समावेश आहे.‎ शहरातील विविध भागांमध्ये‎अनधिकृत फलक, होर्डिंग व‎ पोस्टर्स लावणाऱ्यांविरुद्ध कारवाया ‎करण्यात येत आहेत. दरम्यान,‎ महानगरपालिकेने निश्चित केलेल्या व अधिकृत एजन्सीचे हे बॅनर ‎असणे गरजेचे आहे.‎ युवा आशिया चषक : आज उपांत्य फेरीत भारताचा सामना श्रीलंकेशी शारजा – 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत शुक्रवारी भारतीय संघ उपांत्य फेरीत श्रीलंकेशी भिडणार आहे. हा सामना शारजामध्ये सकाळी 10.30 पासून खेळवला जाईल. श्रीलंकेचा संघ जबरदस्त फॉर्मात आहे. या संघाने गटातील तिन्ही सामने जिंकले, तर पहिल्या सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. भारताने यूएई व जपानविरुद्ध मोठे विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. भारतीय संघाने आठ वेळा 19 वर्षांखालील आशिया चषकाचे जेतेपद पटकावले. संघाची नजर नवव्या जेतेपदावर असेल.

Share