दिव्य मराठी अपडेट्स:जिंतूरला आज साई ग्राउंडवर दुपारी 2 वाजता अमित शहा यांची सभा; तर फडणवीस यांची मुखेडमध्ये सभा
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स
जिंतूरला आज साई ग्राउंडवर दुपारी 2 वाजता अमित शहा यांची सभा होणार परभणी – महायुती उमेदवार मेघना बोर्डीकर-साकोरेयांच्या प्रचारार्थ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आजजिंतूरला सभा होत आहे. 13 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता जिंतूर येथील साई ग्राऊंडवर ही सभा होणारआहे. सभेसाठी अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्याने जिंतूर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत अनेक मार्गांवरील वाहतूक वळवली आहे. याबाबत पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी 12 नोव्हेंबरला आदेश काढले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये सभा नांदेड – महायुतीचे उमेदवार आमदार डॉ. तुषारराठोड, लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवारडॉ.संतुकराव हंबर्डे यांच्याप्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांची जाहीर सभा आजहोणार आहे. सकाळी 11 वाजताकंधार फाटा (ता.मुखेड) येथे हीसभा होईल. या सभेसाठी खासदारअशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे, शाहीरअण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, संजय कौडगेयांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. यासभेला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. पैशांच्या वाहतुकीचा आरोप;दोन्ही शिवसेना आमने-सामने सोयगाव – पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्ते ज्या वाहनातूनसोयगावकडे येत होते, त्या वाहनात पैसे असल्याच्याआरोपावरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी संतगाडगेबाबा चौकात वाहन थांबवले. यावेळी महायुतीचे वआघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काहीवेळतणावाची स्थिती निर्माण झाली होती. आचारसंहिता पथक प्रमुख दादाराव आहेर व सहायकनिरीक्षक पंकज बारवाल यांनी वाहनाची चौकशी न करताचसोडून दिल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता. दोन्हीअधिकाऱ्यांवर कामात कसूर केल्याचा आरोप करत, गुन्हादाखल करण्याची मागणी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलीमंगळवारी एमएच 20 जीक्यू 8006 या गाडीमध्ये सत्तारांचेकार्यकर्ते प्रवास करीत होते. मतदारांना वाटण्यासाठी गाडीतपैसे असून, ही गाडी सोयगावच्या दिशेने येत असल्याचीमाहिती मिळाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनीसंत गाडगेबाबा चौकात गाडी अडवली होती. मुंबईच्या डबेवाल्यांत पाठिंब्यावरून फूट मुंबई – मुंबई डबेवाला संघटनेने विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे. संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी ही घोषणा केली आहे. ‘डबेवाल्यांच्या नावाचा स्वार्थासाठी वापर होतोय, राजकीय पक्षाला पाठिंबा दिला जात आहे. डबेवाला संघटनेचा आजवर कुणाला पाठिंबा नव्हता, पण आज आम्ही महायुतीला जाहीर पाठिंबा देत आहोत,’ असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, काही पदाधिकाऱ्यांनी मुके यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. ते मविआला पाठिंबा देत आहेत. विनापरवानगी सभा घेतल्याने आचारसंहिता भंगाचा 3 जणांवर गुन्हा दाखल पुणे – खडकवासला मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारार्थ विनापरवानगी सभा आयोजनासह बॅनरबाजी केल्याप्रकरणी तीनजणांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भरारी पथकातील समन्वय अधिकारी राहुल साळुंखे यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रोहन ज्ञानोबा धावडे, संजय ऊर्फ बाबू दोडके, अजय पोळ (तिघे रा. वारजे माळवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राजकीय पक्षांनी सभांचे वेळापत्रक पाळावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. बबनराव लोणीकर यांचे वक्तव्य खेदजनक :- जरांगे परतूर – लोणीकरांनी मराठासमाजाच्या संदर्भात जे विधान केलेते अत्यंत खेदजनक आहे.लोणीकरांसारख्या मराठासमाजाच्या नेत्यांमुळेच मराठासमाजअडचणीत येतआहे. समाजाचेअसूनसमाजाबद्दलअसे बोलतअसतील तर समाजाने यांना तेथेठेवू नये. अशा लोकांना शंभर टक्केधडा शिकवला पाहिजे, अशाशब्दांत मनोज जरांगे पाटील यांनीया वक्तव्याचा समाचार घेतलाआहे. आष्टी येथे लोणीकर यांनीप्रचारादरम्यान मराठा समाजाची मतेहाताच्या कांड्यावर मोजण्याइतकीअसल्याचे विधान केले होते. महारटाकळी चेकपोस्टवर 30 लाखांचा गुटखा जप्त गेवराई – तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीवर अहिल्यानगर येथून बीडकडे येणारा टेम्पो महारटाकळी चेकपोस्टवर गस्तीवरील पोलिसांनी पकडला असता टेम्पोत 30 लाख 8 6हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला असून कारवाई मंगळवारी पहाटे दोन वाजता करण्यात आली. याप्रकरणी टेम्पोचालक सलीम बाबुलाल दफेदार(रा.अरणगाव, ता.जामखेड,जि.नगर) याला अटक केली. गेवराई तालुक्यातील महारटाकळी चेक पोस्टवर मंगळवारी पहाटे दोन वाजता टेम्पो एमएच 16 सीडी 2395 मध्ये 30 लाख 86 हजार रुपयांची तंबाखू, पान मसाला, तंबाखूमिश्रित गुटखा पथकाने जप्त करून, एकास अटक केली. सर्वाेच्च न्यायालयात यापुढे तोंडी विनंतीवर सुनावणी बंद; नव्या सरन्यायाधीशांचे आदेश नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश (सीजेआय) न्या. संजीव खन्ना यांनी तत्काळ सुनावणीसाठी प्रकरणांचा तोंडी उल्लेख करण्यास बंदी घातली. न्या. खन्ना मंगळवारी म्हणाले, आता तत्काळ सुनावणीसाठी तोंडी विनंतीचा विचार केला जाणार नाही. यासाठी ईमेल किंवा लेखी स्लिपद्वारे विनंती करावी लागेल. यासोबतच तातडीने सुनावणीचे कारणही नोंदवावे लागेल. साधारणत: वकील दिवसाच्या कामकाजाच्या सुरुवातीला तातडीच्या आधारे प्रकरणांच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर आपल्या खटल्यांचा उल्लेख करतात. माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या काळात ही व्यवस्था होती. तथापि, याचा वापर अटकेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणांसाठीच व्हायचा. सरन्यायाधीशांनी न्यायालयीन सुधारणांसाठी नागरिक-केंद्रित अजेंड्याची रूपरेषा तयार केली आहे. ते म्हणाले, नागरिकांना न्याय मिळवून देणे व समान वागणूक मिळणे हे न्यायव्यवस्थेचे घटनात्मक कर्तव्य आहे. सांगलीत उद्यापासून संगीत महोत्सवाची पर्वणी सांगली – गीताचार्य काणेबुवा प्रतिष्ठान आणि काकासाहेब चितळे फाउंडेशनतर्फे गुरुकुलच्या दशकपूर्तीनिमित्त 14 ते 17 नोव्हेंबरदरम्यान संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या काळात पंडित भुवनेश कोमकली, पद्मश्री सतीश व्यास यांच्यासोबतच नूपुर देसाई, सुरंजन खंडाळकर, अनुजा झोकरकर यांचे गायन तर आदित्य सुतार यांचे बासरीवादन होणार आहे. या कार्यक्रमाची सांगता संजुशा पाटील यांच्या गायनाने होईल. 45+ दिवस शेल्फ लाइफ प्राॅडक्टचीच आॅनलाइन विक्री नवी दिल्ली – भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने खाद्यपदार्थांच्या ऑनलाइन विक्रीबाबत कडक सूचना जारी केल्या आहेत. ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ज्यांचे शेल्फ लाइफ 45 दिवसांपेक्षा जास्त आहे तीच उत्पादने विकू शकतील. म्हणजे खाद्यपदार्थांची एक्स्पायरी किमान 45 दिवसांची असावी. फूड बिझनेस ऑपरेटर्सना (एफबीओ) मंगळवारी जारी करण्यात आलेल्या प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कमला वर्धन राव यांनी यासंदर्भात बैठक बोलावली होती. यात ब्लिंक इट आणि झेप्टोसारख्या 200 हून अधिक प्लॅटफॉर्म आणि उद्योग संस्थांनी भाग घेतला. हसीनांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस काढण्याची तयारी ढाका – बांगलादेशात माजी पंतप्रधान शेख हसीनांविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावरून बांगलादेशाच्या अांतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या मुख्य अभियोक्त्याने आयजींना पत्र पाठवले आहे. बांगलादेशात विद्रोहानंतर यावर्षी 5 ऑगस्टपासून शेख हसीना भारतात आहेत. सीआयएसएफची पहिली महिला राखीव बटालियन नवी दिल्ली – केंद्र सरकारने केवळ महिलांच्या भारतातील पहिल्या सीआयएसएफ राखीव बटालियनला मंजुरी दिली आहे. या बटालियनमध्ये 1025 पर्सनल असतील. सीआयएसएफकडे सध्या 12 राखीव बटालियन आहेत. नव्या बटालियनची स्थापना एकूण 2 लाख पदांची स्वीकृत मर्यादा लक्षात घेऊनच करण्यात येणार आहे. क्रूझ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी नवी दिल्ली – भारताने मंगळवारी ओडिशाच्या किनारपट्टीवर लांब पल्ल्याच्या लँड अटॅक क्रूझ क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र 1,000 किलोमीटरहून अधिक अंतरावर जाणाऱ्या युद्धनौका किंवा विमानवाहू जहाजांवर मारा करण्यास सक्षम असेल. संरक्षण मंत्रालयानुसार, हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक एव्हीओनिक्स व सॉफ्टवेअरने सुसज्ज आहे. टीम इंडिया सहा वर्षांनंतर सेंच्युरियनमध्ये खेळणार सेंच्युरियन – भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तिसरा टी-20 सामना बुधवारी सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. सुपर स्पोर्ट््स पार्क येथे रात्री 8.30 वाजता सामना सुरू होईल. या मैदानावर भारत दुसऱ्यांदा टी-20 सामना खेळेल. या संघाने शेवटचा सामना 2018 मध्ये सेंच्युरियनमध्ये खेळला होता, ज्यामध्ये संघाचा सहा गड्यांनी पराभव झाला होता. गाकेबेरहा येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. सलामीवीर अभिषेक शर्मा बऱ्याच दिवसांपासून फॉर्मशी झुंजत आहे. सॅमसनही अपयशी ठरला. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजांनाही बळी घेण्यात अडचणींचा सामना करावा लागला. सेंच्युरियनमध्येही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवलाही मालिका जिंकण्याची ही शेवटची संधी आहे. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.