दिव्य मराठी अपडेट्स:महायुतीच्या आमदार, मंत्र्यांना आज संघ मुख्यालयाचे निमंत्रण; संघ परिचय वर्गाचे आयोजन

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स महायुतीच्या आमदार, मंत्र्यांना आज संघ मुख्यालयाचे निमंत्रण नागपूर – विधानसभेच्या नागपूर अधिवेशनानिमित्त प्रथेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीचे आमदार व मंत्र्यांना आज सकाळी 8 वाजता रेशीमबागेतील संघ मुख्यालयात निमंत्रित केले आहे. गुरुवारी सकाळी स्मृतिमंदिरस्थळी आयोजित संघ परिचय वर्गात येणाऱ्या आमदारांना संघाचे विदर्भ प्रांत संघचालक श्रीधर गाडगे आणि महानगर संघचालक राजेश लोया हे मार्गदर्शन करणार आहेत. संघातर्फे सुरू असलेल्या विविध सेवाकार्यांबाबत ते माहिती देतील. गेल्या वेळी निमंत्रण टाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार तेथे जाणार की नाही याकडे लक्ष लागले आहे. कारण विधानसभा निवडणुकीच्या काळात आणि निकालानंतरही अजित पवारांनी आपल्या पक्षाची भूमिका भाजप-शिंदेसेनेपेक्षा वेगळी असल्याचे स्पष्ट केले आहे.
हिंदू धार्मिक स्थळे सरकारी नियंत्रणाच्या बाहेर ठेवावीत – मंगलप्रभात लोढा मुंबई – हिंदू धार्मिक स्थळे सरकारच्या नियंत्रणाबाहेर ठेवावीत ही माझी वैयक्तिक मागणी आहे. कारण धार्मिक स्थळे सरकारी खर्चाने बांधलेली नाहीत. काही भाविकांनी या स्थळासाठी जमीन दान केली, काहींनी आर्थिक मदत, तर काहींनी बांधकामासाठी मदत केली, असे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले. सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळांसाठी समान कायदे असावेत. मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण देणाऱ्यांना ज्या पद्धतीने पगार दिला जातो तसाच पगार मंदिरांच्या पुजाऱ्यांनाही द्यावा का? या प्रश्नावर लोढा यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था (प्रभादेवी) अधिनियम, 1980 मध्ये सुधारणा करण्याच्या अध्यादेशाला मंगळवारी विधिमंडळात मंजुरी देण्यात आली. या अध्यादेशावर सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिंदू धार्मिक स्थळांप्रमाणेच अन्य धर्मांची धार्मिक स्थळेही सरकारच्या नियंत्रणामध्ये घेण्याची कल्पना व्यक्त केली होती. त्या संदर्भाने लोढा यांनी ही भूमिका व्यक्त केली. अाजपासून 5 दिवसथंडीचा कडाका कमी नाशिक – नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने राज्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा बुधवारी 1 ते 2 अंशाने वाढला. कमी दाबाचे हे क्षेत्र उद्यापर्यंत (दि.19) तामिळनाडूसह आंध्र प्रदेशाकडे सरकणार असून राज्यात गुरुवारपासून पाच दिवस हवामान कोरडे रहाण्याची शक्यता असल्याने किमान तापमान 3 ते 4 अंशाने वाढून थंडीची तीव्रता कमी होण्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून मध्य महाराष्ट्रात धुके पडण्याचा अंदाज आहे. लाचखोर‎ मुख्याध्यापकाचा‎जामीन अर्ज केला नामंजूर‎ नांदेड‎ – सातव्या वेतन आयोगाच्या‎फरकासाठी 40 लाखांची लाच‎मागितल्याच्या प्रकरणात,‎मुख्याध्यापकाचा अटकपूर्व जामीन‎अर्ज नांदेड येथील विशेष‎न्यायालयाने फेटाळून लावला.‎ दिव्यांग शाळेतील 4‎कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन‎आयोगाचा सव्वा कोटींचा फरक‎प्रलंबित होता. तो काढण्यासाठी‎खानापूर (ता.देगलूर) येथील वैभव‎निवासी शाळेचा मुख्याध्यापक‎यादव सूर्यवंशी याने इतर दोघांसह‎40 टक्केच्या हिशेबाने 40 लाख‎रुपये लाचेची मागणी केली होती.‎कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन बँकेत‎जमा झाल्याबरोबर लाचेचे 40 लाख‎रुपये द्यावे लागतील असे ठरले होते.‎त्यानुसार 22 नोव्हेंबरला दुपारी‎बँकेतून 40 लाखांची रक्कम काढून‎तक्रारदाराने लिपिक शिवराज बामणे‎आणि लिपिक चंपत वाडेकर या‎दोघांना दिली होती.‎ रेल्वेत‎ विसरलेली बॅग‎महिलेला मिळाली परत‎ नांदेड – मराठवाडा एक्स्प्रेसच्या‎एसी डब्यात छत्रपती संभाजीनगरला‎विसरलेली बॅग परतीच्या प्रवासात‎परत मिळाली. नांदेडच्या रहिवासी‎अंजली बाऱ्हाळे या छत्रपती‎संभाजीनगरला एका बँकेत कार्यरत‎आहेत. काही दिवसांच्या सुटीनंतर‎17 रोजी सकाळी नांदेडहून 17688‎मराठवाडा एक्स्प्रेसच्या सी 2/52 या‎एसी डब्यातून संभाजीनगरला गेल्या.‎सकाळी गाडीतून उतरताना त्या‎आपली बॅग गाडीतच विसरल्या.‎त्यांच्या माध्यमातून दक्षिण मध्य‎रेल्वेचे विभागाचे जनसंपर्क‎अधिकारी राजेश शिंदे यांच्याशी‎संपर्क साधून घटना कळवण्यात‎आली. काही वेळातच शिंदे यांनी‎यंत्रणेमार्फत ती बॅग सुरक्षित‎असल्याचे कळवले. ही बॅग‎मंगळवार, 17 डिसेंबरला बाऱ्हाळे‎यांना परत करण्यात आली.‎ रेल्वेत‎ विसरलेली बॅग‎महिलेला मिळाली परत‎ नांदेड – मराठवाडा एक्स्प्रेसच्या‎एसी डब्यात छत्रपती संभाजीनगरला‎विसरलेली बॅग परतीच्या प्रवासात‎परत मिळाली. नांदेडच्या रहिवासी‎अंजली बाऱ्हाळे या छत्रपती‎संभाजीनगरला एका बँकेत कार्यरत‎आहेत. काही दिवसांच्या सुटीनंतर‎17 रोजी सकाळी नांदेडहून 17688‎मराठवाडा एक्स्प्रेसच्या सी 2/52 या‎एसी डब्यातून संभाजीनगरला गेल्या.‎सकाळी गाडीतून उतरताना त्या‎आपली बॅग गाडीतच विसरल्या.‎त्यांच्या माध्यमातून दक्षिण मध्य‎रेल्वेचे विभागाचे जनसंपर्क‎अधिकारी राजेश शिंदे यांच्याशी‎संपर्क साधून घटना कळवण्यात‎आली. काही वेळातच शिंदे यांनी‎यंत्रणेमार्फत ती बॅग सुरक्षित‎असल्याचे कळवले. ही बॅग‎मंगळवार, 17 डिसेंबरला बाऱ्हाळे‎यांना परत करण्यात आली.‎ मुंबईत पाच कोटींचे कोकेन हस्तगत मुंबई – एक किलो कोकेनसह 45 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत पावणेपाच कोटी रुपये आहे. आरोपीविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे पथक डोंगरी परिसरात गस्त घालत असताना एक संशयित दुचाकीस्वार त्यांना पाहून पळू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दुचाकीची तपासणी केली असता त्यात पांढऱ्या रंगाचा पदार्थ सापडला. तपासणीत ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आरोपीची चौकशी सुरू आहे. माजी उपनगराध्यक्षाच्या मुलावर सिन्नरला गोळीबार सिन्नर – सिन्नर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे यांचा मुलगा सागर लोंढे (28) याच्यावर कारमधून आलेल्या चौघांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार करून कोयत्याने वार केल्याची घटना बुधवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास घडली. गोळीबारात लोंढे याच्या मुलाच्या डोक्याला गोळी चाटून गेल्याने तो या हल्ल्यातून वाचला. मात्र, कोयत्याने वार झाल्याने त्याच्या हातावर व खांद्याला मोठी जखम झाली आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे. पुण्यात नामांकित शाळेत नृत्य शिक्षकाने केला दोन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार पुणे – पुणे शहरातील वारजे माळवाडी भागात एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या 10 व 11 वर्षांच्या दाेन विद्यार्थ्यांवर नृत्य शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 39 वर्षीय शिक्षकाविरोधात वारजे माळवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. दरम्यान, आरोपी शिक्षकाला 22 डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. पाेलिस उपायुक्त संभाजी पाटील यांनी सांगितले की, या प्रकरणात अाराेपीवर पाेस्काेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात अाला असून शाळेच्या प्रशासनानेदेखील याबाबत पाेलिसांना माहिती दिली अाहे. शाळेतून नृत्य शिक्षकाला निलंबित करण्यात अाले आहे. दोन वर्षापासून आरोपी शिक्षक मुलांशी अश्लील कृत्य करत होता. त्याने मोबाइवर चित्रीकरण केले होते. विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी शाळेत समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना योग्य आणि अयोग्य स्पर्शाबाबतची याबाबतची देण्यात येते. त्यात हा प्रकार उघड झाला आहे. विमानात बॉम्बची धमकी दिली तर 1 लाखांचा दंड नवी दिल्ली – विमानात बॉम्बच्या धमक्या देऊन अराजक पसरवणारे आता सुरक्षित नाही. विमान कंपन्या आणि विमानतळांना बॉम्बच्या धमकीचे कॉल आणि ई-मेल पाठवणाऱ्या गुन्हेगारांना ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्यात येईल. त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. यात कोणतीही संस्था दोषी आढळल्यास 1 कोटींचा दंड होऊ शकतो. विमानात बॉम्बच्या धमक्यांच्या अनेक घटना समोर आल्यानंतर नागरी उड्डयन मंत्रालयाने विमान (सुरक्षा) नियम 2023 मध्ये बदल केले आहेत. बॉम्बच्या धमक्या देणाऱ्यांवर विमान अपहरण आणि विमानात स्फोटके वाहून नेण्याची कलमे जोडण्याचाही विचार केला जात आहे. आतापर्यंत अशा धमक्या देणाऱ्यांना जास्तीत जास्त दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती. स. भु. क्रीडा महोत्सवाचे 23, 24 डिसेंबर रोजी आयोजन छत्रपती संभाजीनगर – सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत 23 आणि 24 डिसेंबर रोजी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सभु महाविद्यालयातील मैदानावर 23 डिसेंबरला सकाळी 11 वाजता अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडू सारिका काळे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. तर महोत्सवाचा समारोप 24 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता अर्जुन पुरस्कार विजेत्या तथा क्रीडा उपायुक्त अभिलाषा म्हात्रे यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात विविध क्रीडा प्रकारांत स्पर्धा होतील. टी-20 : भारत-विंडीजमध्ये निर्णायक सामना आज मुंबई – भारतीय महिला संघाची वेस्ट इंडीजविरुद्धची 3 सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरा व निर्णायक सामना गुरुवारी सायं. 7 वाजता मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होईल. भारताने 2016 मध्ये विंडीजविरुद्धची शेवटची टी-20 मालिका गमावली होती. दोघांत आतापर्यंत झालेल्या 23 सामन्यांत भारताने 14 जिंकले व 9 गमावले. टी-20 वर्ल्डकपनंतर विंडीजची पहिलीच मालिका आहे.

Share