दिव्य मराठी अपडेट्स:पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे – पद्मश्री डॉ.‎ स्मिता कोल्हे यांना आज बोधनकर स्मृती पुरस्कार‎ प्रदान सोहळा

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स खंडाळा घाटात बस अपघात रुग्णालयात असल्याने‎ भुमरे मतदानापासून वंचित‎ वडीगोद्री‎ – पैठण मतदारसंघात बुधवारी 351 मतदान केंद्रांवर 3‎वाजेपर्यंत 54.79 टक्के मतदान झाले. एकूण 3 लाख‎25 हजार 353 पैकी 1 लाख 78 हजार 253 मतदान‎झाले. मतांची वाढलेली टक्केवारी बघता कुणासाठी‎धोकादायक ठरणार याची चर्चा रंगली होती. महायुतीचे‎उमेदवार विलास भुमरे रुग्णालयात उपचार घेत‎असल्याने मतदानापासून वंचित राहिले. बिडकीन येथे‎केंद्रीय प्राथमिक शाळा व सरस्वती भुवन विद्यालय या‎दोन ठिकाणी मतदान केंद्रे आहेत. सरस्वती भुवन‎मधील एका बूथवर सहा वाजेनंतरही मतदान चालू‎होते. सकाळी सात वाजेपासूनच या बूथवर गर्दी होती व‎सकाळपासूनच रांग लागलेली होती. सायंकाळी 5‎वाजेपर्यंत 68.79 टक्के मताचा टक्का झाला होता,‎असे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी सांगितले.‎ आचारसंहिता भंगाच्या 10,134 तक्रारी निकाली मुंबई – विधानसभा निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2024 दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण 10 हजार 139 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 10 हजार 134 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येते. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 15 ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण 706 कोटी 98 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. आडमांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे पत्र व्हायरल सोलापूर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार नरसय्या आडम यांनी भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा दिल्याचे खोटे पत्र समाज माध्यमात व्हायरल केल्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. धोनी व अजिंक्य अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. अॅड. वासम ‘आपलं शहर’ या समाजमाध्यम ग्रुप पाहत होते. त्यावर ‘आडम मास्तरांचा देवेंद्र कोठे यांना जाहीर पाठिंबा’ असे खोटे पत्र व्हायरल केल्याचे दिसून आले. हे पत्र त्या ग्रुपमधील अजिंक्य व धोनी या ग्रुप अॅडमिनच्या माध्यमातून व्हायरल केले होते. ही गोष्ट वासम यांनी पोलिस आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. उमेदवाराचा फोटो, मतदान स्लिप वाटप करणाऱ्या दोघांवर गुन्हा सोलापूर – मतदानाच्या वेळी पक्षाच्या उमेदवाराचा फोटो व चिन्ह असलेल्या मतदान स्लिप देत निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चौघांवर बुधवारी गुन्हा बीएनएस कलम 223, 3(5)प्रमाणे दाखल झाला आहे. ही बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास बापूजीनगरातील ज्ञानसागर प्राथमिक शाळेतील बूथ क्र. 226 ते 231 येथे घडली आहे. याबाबत पोलिस हवालदार किशोर पवार (नेम सदर बझार)यांनी फिर्याद दिली असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुनील आमाटी (30), गणेश म्हेत्रे (20), योहान सोतालोल्लू (52), रविकांत बाबय्या कुमार यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. शामराव बोधनकर‎ स्मृती पुरस्कार वितरण‎ सोहळा आज छत्रपती संभाजीनगर – शामराव‎ बोधनकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने ‎शामराव बोधनकर स्मृती पुरस्कार‎ सोहळा होत आहे. स.भु.‎परिसरातील गोविंदभाई श्रॉफ ललित‎कला अकादमी सभागृहात 21‎ नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता‎हा सोहळा होईल. इंद्रायणी मधुकर ‎बोधनकर स्मृती पुरस्कारही प्रदान‎ करण्यात येईल. पुरस्काराचे मानकरी‎ पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व पद्मश्री डॉ.‎स्मिता कोल्हे आहेत. अध्यक्षस्थानी ‎ज्ञानप्रकाश मोदाणी असतील. या‎वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंकुश‎ भालेकर असतील. ‘अग्निशिखा‎कावेरी” या हैदराबाद‎मुक्तिसंग्रामावर आधारित‎ बालनाट्याचे उर्दू भाषांतर आणि‎‘हैदराबाद मुक्तिसंग्रामातील झुंजार ‎महिला” या डॉ. ऊर्मिला चाकूरकर‎यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार‎ आहे.‎ देशभरातील 6 कोटी बनावट रेशनकार्ड रद्द नवी दिल्ली – देशभरात 5.80 कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांची पडताळणी ई-केवायसी प्रक्रियेद्वारे करण्यात आली. याअंतर्गत आतापर्यंत 64% लाभार्थींची पडताळणी केली आहे. सध्या 20.4 कोटी शिधापत्रिकांमधून 80.6 कोटी लाभार्थींना रेशन दिले जाते. शिधापत्रिकांच्या डिजिटलायझेशनमुळे देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे. आधार आणि ई-केवायसी प्रणालीद्वारे पडताळणी केल्यानंतर 5 कोटी 80 लाखांहून अधिक शिधापत्रिका बनावट आढळून आल्या असून त्या सरकारने रद्द केल्याने वितरण व्यवस्थेतील हेराफेरी कमी झाली आहे. राजस्थानमध्येही चित्रपट साबरमती रिपोर्ट करमुक्त जयपूर – गोध्रा हत्याकांडावर आधारित चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ला राजस्थानातही करमुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी भाजपशासित तीन राज्ये हरियाणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात तो करमुक्त करण्यात आला आहे. विक्रांत मॅसीचा हा चित्रपट 15 नोव्हेंबरला संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘हा चित्रपट इतिहासाच्या त्या भयानक काळाचे वास्तववादीपणे चित्रण करतो, ज्याला काही स्वार्थी तत्त्वांनी निहित स्वार्थ साधण्यासाठी विकृत करण्याचा प्रयत्न केला. घटस्फोटाच्या काळात पत्नीला सासरच्या सुविधांचा हक्क : कोर्ट नई दिल्ली – घटस्फोटाचे प्रकरण प्रलंबित असताना पत्नीला सासरी असलेल्या सुविधांचा लाभ घेण्याचा हक्क असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्या. विक्रम नाथ आणि न्या.पी.व्ही.वराळे यांच्या खंडपीठाने हे स्पष्ट करून केरळ निवासी एका डॉक्टरच्या पत्नीला अंतरिम पोटगी भत्ताही वाढवून दिला आहे. उच्च न्यायालयाने अंतरिम पोटगी भत्ता घटवला होता.त्याला पत्नीने अाव्हान दिले आहे. त्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटले की, घटस्फोट प्रक्रियेच्या कालावधीत आपला वैवाहिक जीवन स्तर कायम राखण्याचा हक्क आहे. सरकारे आरोपींसाठी वेगवेगळा मापदंड लावू शकत नाहीत – कोर्ट नवी दिल्ली – राज्य सरकार आरोपींसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे मापदंड लागू करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फौजदारी खटल्यात एका व्यक्तीला जामीन देताना बंगालला हे सुनावले. सरकारला अशा गोष्टींची परवानगी दिली जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती बी.आर. गवई व न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या पीठाने राज्य सरकार या प्रकरणात इतर चार सहआरोपींना जामीन देण्यास विरोध तर करत नाही ना, हे पाहण्याचा प्रयत्न केला. वास्तविक त्याबद्दलचा सल्ला सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे. तरीही सरकार त्याच्या विरोधात जाऊन जामीन अर्जास विरोध करत आहे. त्यामुळे तो 12 महिन्यांपासून तुरुंगात आहे. पीठ म्हणाले, सगळे स्पष्ट आहे. ही मिलीभगत आहे.

Share

-