दिव्य मराठी अपडेट्स:​​​​​​​पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज धुळे-नाशिक; तर वसमतला ‎शरद पवार यांची जाहीर सभा

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स पंतप्रधान मोदींची आज धुळे-नाशिक, तर उद्या अकोला-नांदेडमध्ये जाहीर सभा मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी 8, 9 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचार दौऱ्यावर येत आहेत. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता धुळे येथे पहिली सभा होणार आहे. दुपारी 2 वाजता ते नाशिकमध्ये जाहीर सभा घेतील. 9 नोव्हेंबर रोजी अकोला येथे दुपारी 12 वाजता आणि 2 वाजता नांदेड येथे त्यांची सभा होईल. भाजप प्रदेश कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 12 नोव्हेंबर रोजी मोदी चिमूर (चंद्रपूर जिल्हा) आणि सोलापूर येथे सभा घेतील. सायंकाळी त्यांचा पुणे येथे रोड शो आयोजित करण्यात आला आहे. वसमतला आज, तर उदगीरला उद्या ‎शरद पवार यांची जाहीर सभा होणार‎ हिंगोली – वसमत येथे आज सायंकाळी 6 वाजता,‎जिल्हा परिषद मैदानावर शरद पवार यांची सभा होणार‎आहे. तसेच उद्या शनिवारी (दि. 9) सकाळी 10‎‎वाजता त्यांची उदगीर येथे जाहीर‎‎सभा आयोजित करण्यात आली‎‎आहे. शरद पवार शुक्रवारी रात्रीच‎‎उदगीर येथे मुक्कामी येणार आहेत.‎‎सकाळी 10 वाजता त्यांची उदगीर‎‎शहरातील जिल्हा परिषदेच्या‎मैदानावर (क्रीडा संकुल मैदान) जाहीर सभा होईल.‎ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या‎आज लातूर जिल्ह्यात तीन सभा‎ लातूर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर‎काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आज, 8‎नोव्हेंबर रोजी शहर, रेणापूर व निलंगा येथे सभा‎आयोजित करण्यात आल्या आहेत. शहर,‎रेणापूर व निलंगा विधानसभा मतदारसंघातील‎पदाधिकारी आणि नागरिकांसोबत ते संवाद साधणार‎आहेत. आज दुपारी 2 वाजता निलंगा, शहरातील‎गंजगोलाई परिसरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे‎स्मारकाच्या परिसरात दुपारी 4 वाजता, तर रेणापूर येथे‎सायंकाळी 7 वाजता पटोले यांची सभा होणार आहे.‎ दाऊद, लॉरेन्स बिष्णोईचे टीशर्ट विकणाऱ्यांवर गुन्हा मुंबई – कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, लॉरेन्स बिष्णोई यांचे उद्दात्तीकरण करणारे टीशर्ट विकणाऱ्या विक्रेत्यांसह ई-कॉमर्स संकेतस्थळांविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दाऊद इब्राहिम व लॉरेन्स बिष्णोईचे छायाचित्र असलेले टीशर्ट््स या संकेतस्थळांवर विक्री करण्यात येत होते. त्यात फ्लिपकार्ट, अली एक्स्प्रेस, टी शॉपर्स व इट्सी या प्रसिद्ध ई-कॉमर्स संकेतस्थळांसह त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा समावेश असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाकडून गुरुवारी देण्यात आली. सायबर पोलिस संकेतस्थळांवर आक्षेपार्ह मजकुराचा शोध घेत असतात. अशाच पद्धतीने शोध घेताना संबंधित टीशर्ट आढळल्याचे सांगण्यात आले. दिवाळीला आजोळी आलेल्या मुलाचा बारवेत बुडून मृत्यू शिर्डी – आजी-आजोबांकडे दिवाळीच्या सुटीत आलेल्या 13 वर्षीय नातवाचा बारवेतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दया घुले (13, रा. खांडगाव, ता. संगमनेर) असे मृत मुलाचे नाव आहे. गोगलगाव येथे गुरुवारी (7 नोव्हेंबर) सकाळी ही घटना घडली. नागरिकांनी त्यास वाचवण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन पथकाने त्याला तातडीने पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यास लोणी येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत असल्याचे घोषित केले. खांडगाव येथील दया घुले हा आपल्या आजोळी गोगलगाव येथील आजोबा रावसाहेब चिमाजी चौधरी यांच्याकडे दिवाळीच्या सुटीनिमित्त आला होता. गोगलगाव ग्रामपंचायतीजवळील बारवेत गुरुवारी सकाळी खेळताना तो पडला. गावकऱ्यांनी त्यास वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यात यश आले नाही. दयाच्या मृत्यूनंतर गावामध्ये शोककळा पसरली. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पांगरा शिंदे परिसरात भूगर्भातून आवाज; ‎हिंगोली प्रशासनाकडे घटनेची नोंद नाही‎ हिंगोली – वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे‎परिसरातील गावांमधून गुरुवारी (7 नोव्हेंबर) दुपारी‎तीन वाजून 13 मिनिटांनी भूगर्भातून आवाज आला.‎त्यानंतर काही वेळातच पुन्हा दोन वेळा आवाज‎आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मात्र या आवाजाची‎नोंद झाली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन‎कक्षाच्या सूत्रांनी सांगितले.‎ दुकानातून नोकरानेच‎लांबवले लाखाचे कपडे‎ बीड‎ – कपड्याच्या दुकानात नोकर‎म्हणून काम करणाऱ्यानेच‎दुकानातील 1 लाखाचे कपडे व‎इतर साहित्य लंपास केले. ही ‎घटना बीड शहरात घडली.‎ राजा साहेल पटेल (28, रा.‎पटेलनगर, बीड) यांनी याबाबत‎तक्रार दिली. त्यांच्या‎तक्रारीनुसार, त्यांचे बीड‎शहरातील तेलगाव नाका‎परिसरात कपड्यांचे दुकान‎आहे. या दुकानावर काम‎करण्यासाठी त्यांनी जान‎माेहम्मद सय्यद (रा. जव्हेरी‎गल्ली, कारंजा रोड, बीड) या‎तरुणाला कामाला ठेवले होते.‎मालकाचा विश्वास संपादन‎करुन जान मोहम्मद सय्यद याने‎दुकानातून कपडे लांबवले.‎ चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराची क्राऊड फंडिंगची मोहीम नागपूर – जनतेची मदत घेऊन उमेदवाराच्या मदतीसाठी चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण नानाजी पडवेकर यांनी क्राऊड फंडिंग मोहीम सुरू केली आहे. पडवेकर यांच्या मुलाने वडिलांसाठी क्राऊड फंडिंगचे आवाहन केले आहे. कट्टर आंबेडकरवादी असलेल्या माझ्या वडिलांना निवडून आणण्याकरता हे पाऊल उचलण्यात आले आहे. क्राऊड फंडिंगचा उद्देश हा पैसे गोळा करण्याबरोबरच कौशल्य विकास, शिक्षण आदी विषयात करणाऱ्या कामात आपलीही हिस्सेदारी आहे, असे लोकांना वाटायला हवे असा आहे. कट्टर आंबेडकरवादी असल्यामुळे वडिलांना सामाजिक न्यायाची चाड आहे. माझे वडील निवडून आल्यास मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात येईल. मात्र या उद्दिष्टपूर्तीसाठी लोकांच्या मदतीची गरज आहे. म्हणून आमच्या प्रचारासाठी क्राऊड फंडिंग सुरू केले आहे. सोबत बँक अकाउंंट नंबरही देण्यात आला आहे. यापूर्वी चंद्रपूरमध्ये दारूबंदी आणण्यात हातभार असलेल्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या निवडणुकीकरताही आॅनलाइन लोकवर्गणी उभारण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने “डोनेट फॉर देश’ नावाची ऑनलाइन क्राउड फंडिंग मोहीम सुरू केली होती. यात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे भारतीय एका खास डिझाइन केलेल्या वेबसाइटद्वारे पार्टीला 138 रुपये, 1380 रुपये 13,800 रुपये किंवा अधिक देणगी देऊ शकत होते. पेंढ्या जाळल्यास आता होणार दुप्पट दंड : केंद्र नवी दिल्ली – दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने केंद्र सरकारने पेंढ्या जाळणाऱ्या शेतकऱ्यांना दंडाची रक्कम दुप्पट केली आहे. आता दोन एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्याला 2,500 रुपयांऐवजी 5 हजार आणि 2 ते 5 एकरपर्यंत शेतजमीन असलेल्यांना 5 हजारांऐवजी 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. तसेच पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्यांना 30 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या कठोर भूमिकेनंतर बुधवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. जेटचा प्रवास संपुष्टात; मालमत्ता विकण्याचे सुप्रीम काेर्टाचे आदेश नवी दिल्ली – जेट एअरवेज दिवाळखोरीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने गुरुवारी एअरलाइन बंद करून तिच्या मालमत्तेची विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विमान कंपनीसाठी बोली लावणाऱ्या जालान कॅलरॉक कन्सोर्टियमची (जेकेसी) 200 कोटी रुपयांची गुंतवणूक जप्त करण्याची आणि एसबीआयच्या नेतृत्वातील कर्जदारांना 150 कोटी रुपयांची बँक गॅरंटी कॅश करण्याची परवानगीही दिली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या प्रकरणी राष्ट्रीय कंपनी विधी अपिलीय न्यायाधिकरणाचा (एनसीएलएटी) निर्णय फेटाळला. खंडपीठ म्हणाले, हे प्रकरण अनेक पातळ्यांवर डोळे उघडणारे आहे. एनसीएलएटीचा आदेश चुकीचा आहे. यात रेकॉर्डवरील साक्षीदारांची दिशाभूल केली आहे. 5 वर्षे उलटूनही बोली लावणारी कंपनी पहिला हप्ता भरू शकलेली नाही. खंडपीठाने कलम 142 अंतर्गत विशेष घटनात्मक अधिकार वापरून हा निर्णय दिला. कोर्ट म्हणाले, आमच्याकडे ही तरतूद वापरण्याशिवाय पर्याय नाही.

Share