दिव्य मराठी अपडेट्स:आज लाडकी बहीण योजनेच्या‎ कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड जिल्हा दौरा

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स आज लाडकी बहीण योजनेच्या‎कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री नांदेडला‎ नांदेड – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी ‎दौऱ्यावर येत असून शहरात विविध कार्यक्रमांचे‎ आयोजन करण्यात आले आहे. 13 ऑक्टोबर रोजी ‎मुंबई येथून शासकीय विमानाने 2:15 वाजता नांदे ड‎विमानतळ येथे आगमन व मोटारीने नवा मोंढा मैदान‎येथे पोहोचतील. दुपारी 2:30 वाजता महिला ‎सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी‎ बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम व आमदार‎ बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातील विविध‎ विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन करतील.‎ सोलापूर जिल्ह्यात प्रहार पाच जागा लढवणार साेलापूर – येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय म्हणून तिसरी आघाडी निर्माण करण्यात आली असून या आघाडीतर्फे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जिल्ह्यातील पाच जागांवर आम्ही उमेदवार उभे करणार आहाेत अशी माहिती स्थानिक अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुलकर्णी यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज, आमदार बच्चु कडू, शेतकरी नेते राजु शेट्टी यांच्यासह काही नेत्यांनी एकत्र येत राज्यात तिसरी आघाडी करुन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 75 वर्षापासून साेलापूरसह राज्यातील रस्ते, विज. पाणी हे प्रश्न सुटलेले नाहीत. साेलापुरातील लक्ष्मी-विष्णू मील कामगारांचा प्रश्न प्रलंबित आहे. घरकुल याेजना राबविली गेली नाही. नागरिकांना सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दाेघांनाही पर्याय देण्यासाठी आता तिसरी आघाडी विधानसभा निवडणूक लढवत आहे, असे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. मावशीच्या पतीचा मुलीवर अत्याचार मुंबई – मावशीच्या पतीने 15 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घाटकोपर येथे घडला. पीडितेच्या समुपदेशनात हा प्रकार उघड झाला. समुपदेशन करणाऱ्या 31 वर्षीय महिलेने याप्रकरणी घाटकोपर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर बालकांचे शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत आरोपीला अटक झाली नव्हती. पीडिता एप्रिल महिन्यात घाटकोपर येथे मावशीच्या घरी आली होती. त्यावेळी मावशीच्या पतीने पीडित मुलीला पॉर्न व्हीडीओ दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडू लागले. म्हणून तिला एका समुपदेशन केंद्रात नेण्यात आले होते. नांदेड शहरात 25 वर्षांपासून फरार‎आरोपीला पोलिसांनी पकडले‎ नांदेड – एका गुन्ह्यात पंचवीस वर्षांपासून फरार‎असलेल्या भारत चिंतामण सोळंके (53, रा. लक्ष्मीनगर‎मालटेकडी, नांदेड) या आरोपीला पोलिसांनी पकडले.‎शहरातील शिवाजीनगर भागातील सेतू सुविधा‎केंद्र, औद्योगिक वसाहत येथे सपोउपनि सुधीर भालचंद्र‎खोडवे यांना अाराेपी थांबलेला दिसला. खोडवे हे‎अर्जित रजेवर असतानासुद्धा शिवाजीनगर येथील वॉरंट‎तामिल करणारे अंमलदार शेटवाड व वजिराबादचे‎पोहेकॉ देविदास डोईजड यांना ही माहिती दिली अन्‎पोलिसांनी अाराेपीला ताब्यात घेतले.‎ रत्नागिरीत रा. स्व. संघसंचलनावेळी रस्ता अडवल्याने तणाव रत्नागिरी – विजयादशमीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कौमुदी संचलनावेळी शहरातील कोकणनगर परिसरात प्रक्षोभक घोषणा देत 30 ते 40 जणांनी रस्त्यावर येत संचलन अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी प्रक्षोभक घोषणाबाजी करणाऱ्या 4 संशयितांना अटक केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवी वर्षास यंदा सुरुवात झाली आहे. परंपरेप्रमाणे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला स्वयंसेवकांचे कौमुदी पथसंचलन सुरू होते. रात्री 11 वाजता शिस्तबद्ध स्वयंसेवकांचे हे संचलन कोकणनगर परिसरात येताच काही समाजकंटकांकडून प्रक्षोभक घोषणाबाजी सुरू झाली होती. हरियाणात 17 आॅक्टाे.ला शपथविधी, पीएम येणार चंदीगड – हरियाणात भाजप सरकारचा शपथविधी 17 आॅक्टोबरला पंचकुला येथे होईल. नायब सैनी दुसऱ्यांदा सीएम पदाची शपथ घेतील. कार्यक्रमास पंतप्रधान मोदींसह भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. जामनगर घराण्याचे जडेजा वारसदार! जामनगर – गुजरातच्या जामनगर येथील जाम साहब शत्रुशल्य सिंह यांनी राजघराण्याचा वारसदार जाहीर केला आहे. त्यांनी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा यांना आपला वारसदार म्हणून निवडले आहे. अजय जडेजा नवानगरचे नवे जाम साहब असतील. शत्रुशल्य सिंहजी यांना अपत्य नाही. जाम साहब रणजितसिंह यांच्या नावावरच क्रिकेटची रणजी करंडक स्पर्धा आयोजित केली जाते. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी फासावर लटकलेल्या तरुणाला वाचवले मेरठ – उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पोलिसांनी गळफास घेतलेल्या एका तरुणाचा जीव वाचवला. आई-वडील रागावल्यामुळे संतापलेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी 112 वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. आदित्य मृत्यूपासून काही सेकंदांच्या अंतरावरच होता तेव्हा पोलिस देवदूतांच्या रूपात तेथे आले आणि त्यांनी फासावर लटकलेल्या तरुणाला उचलले आणि फास घट्ट करण्यापासून रोखले. यामुळे त्याचा जीव वाचला. पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले.

Share

-