दिव्य मराठी अपडेट्स:जालन्यातील बाजारात गोळ्या झाडून ‎दहशत निर्माण करणाऱ्याला अटक‎; तर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स शिंदेसेनेचे आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल हिंगोली – ‘मतदारांना वाहनाने घेऊन या. त्यांना काय लागेल ते फोन पेे करा…’ असे वक्तव्य करून पैशांची ऑफर देणारे शिंदेसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर रविवारी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. तोष्णीवाल मंगल कार्यालयात शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक झाली. मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करा. बाहेरगावी असलेल्या मतदारांच्या याद्या 3 दिवसांत सादर करा. त्यांना संपर्क साधून मतदानासाठी मिळेल ते वाहन घेऊन येण्याबाबत कळवावे. त्यासाठी त्यांना फोन पे वगैरे करा… अशा सूचना त्यांनी दिल्या. निवडणूक कामात कसूर; राज्यातील पहिला गुन्हा सावनेर ठाण्यात दाखल नागपूर – निवडणूक कामात कसूर केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा सहायक शिक्षक जयप्रकाश हेडाऊ यांच्याविरुद्ध सावनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा राज्यातील पहिला गुन्हा आहे. विधानसभा निवडणुकीत प्राथमिक टप्प्यात 85 पेक्षा अधिक वय आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ही जबाबदारी सोपविण्यात आलेले हेडाऊ यांनी अधिकृत कर्तव्याचे पालन न केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल झाली. चौकशीनंतर लोकप्रतिनिधित्व अधिनियमान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्दिकी हत्या प्रकरण; दहावा अाराेपी अटकेत मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी रविवारी आणखी एका आरोपीला अटक केली. भगवंत सिंह असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आता 10 वर गेली आहे. याआधी पोलिसांनी शुभम व प्रवीण लोणकर यांच्यासह 9 जणांना अटक केली आहे. तपासासाठी वेगवेगळी 15 पथके तैनात केली आहेत. दरम्यान, सिद्दिकींचा मुलगा झिशानने सोशल मीडियावर पोस्ट करून मारेकऱ्यांना इशारा दिला आहे. ते पोस्टमध्ये म्हणाले, ‘त्यांनी माझ्या वडिलांना मारले, पण ते विसरत आहेत की ते सिंह होते व त्या सिंहाचा अंश माझ्यातही आहे. त्यांचा लढा माझ्याही रक्तात वाहत आहे. ते नेहमी न्यायासाठी उभे राहिले.’ जालन्यातील बाजारात गोळ्या झाडून ‎दहशत निर्माण करणाऱ्याला अटक‎ जालना – शहरातील नूतन वसाहत भागात एका‎तरुणाने बंदुकीतून तीन गोळ्या झाडून दहशत निर्माण‎केली. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या‎‎सुमारास लहुजी चौकात घडली‎‎आहे. परिसरात पेट्रोलिंग करत‎‎असलेल्या कदीम जालना‎‎पोलिसांनी घटनास्थळी धाव‎‎घेतली. तसेच संशयित सोनू‎‎जाधव याला ताब्यात घेतले.‎गोळ्या झाडण्याचा हा व्हिडिओ संशयिताने व्हायरल‎केला होता. हवेत गोळ्या झाडणाऱ्यावर यापुर्वीही गुन्हे‎दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.‎ पूर्ण बातमी वाचा… विरोधात निवेदन दिल्यामुळे‎बीडमध्ये तरुणावर गोळीबार‎ नेकनूर‎ – विरोधात निवेदन दिल्यामुळे‎तरूणावर गोळीबार झाल्याची घटना,‎शनिवारी मध्यरात्री बीड‎तालुक्यातील मांजरसुंबा-लिंबागणेश‎महामार्गावरील, मुळूकवाडी‎गावाजवळ घडली. यात मांडीला‎गोळी लागून तरूण जखमी झाला‎ आहे.‎ मांजरसुंबा लिंबागणेश रोडवरील‎मुळूकवाडीजवळ संदीप तांदळे‎(28, रा.हिंगणी खुर्द, ता. बीड) हे‎आपल्या जीपमधून (एमएच 03‎बीडब्ल्यू 7689) गावाकडे जात‎होते. मुळूकवाडीजवळ त्यांना‎संशयित विजयसिंह बांगर व त्याच्या‎दोन साथीदारांनी हात दाखवून‎थांबवले. जीप थांबताच विजयसिंह‎बांगर याने निवेदन दिल्याच्या‎रागातून, तांदळे यांच्यावर पिस्तूल‎रोखून त्यांच्या दिशेने चार राउंड‎फायर केले. यामध्ये संदीप तांदळे‎याच्या मांडीला गोळी घासून गेल्याने‎ते जखमी झाले आहेत.‎ 10 वर्षीय मुलीवर दोन‎जणांकडून अत्याचार‎ बीड‎ – 100 रुपये व चिकनचे आमिष‎दाखवून 10 वर्षीय मुलीवर दोन‎जणांनी अत्याचार केला तर तिसऱ्या ने‎अश्लील चाळे करुन विनयभंग ‎केल्याचा धक्कादायक प्रकार बीड ‎तालुक्यातील एका गावात समोर ‎आला आहे. पीडीतेच्या आईने ‎दिलेल्या तक्रारीवरुन तिघांविरोधात ‎पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात‎ आला आहे.‎ बीड तालुक्यातील 10 वर्षीय‎ पीडीत मुलीला 100 रुपये देण्याचे व ‎चिकन देण्याचे अामिष दाखवू न‎राजंेंद्र रामलिंग चंदनशीवे व आशिफ‎ कुमार चौधी उर्फ कल्लू नेपाळी या‎ दोघांनी एका जुन्या वाड्यामध्ये नेऊन‎ अत्याचार केला. तर, सागर राजेंद्र‎ चंदनशीवे याने तिच्याशी अश्लील‎चाळे करुन विनयभंग केला. 3 ‎ऑगस्ट 2024 रोजी हा प्रकार घडला‎ होता. ताे आता समोर आला. या‎ प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने ‎दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवला.‎ पैशांच्या वादातून‎ग्रामरोजगार सेवकाला‎विषारी द्रव पाजले‎ परभणी‎ – पैशाच्या वादातून एकाला मारहाण‎करत विषारी द्रव पाजून जीवे‎मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही‎घटना 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11‎वाजता जिंतूर रोडवर घडली.‎उपचार घेतल्यानंतर दिलेल्या‎तक्रारीवरुन 19 ऑक्टोबरला‎नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा‎दाखल झाला. किरण कदम यांनी‎तक्रार दिली आहे. फिर्यादी हे‎ग्रामरोजगार सेवक आहेत.‎ संशयित मुंजा कदम, बंडू कदम‎यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे.‎फिर्यादी हे आर्वी येथून त्यांच्या‎खासगी कामासाठी परभणीला जात‎होते. जिंतूर रोडवर संशयितांनी‎त्यांना थांबविले. तू पैसे देत नाही,‎पैशांचा वाद मिटवून टाकू असे‎म्हणत संशयितांनी फिर्यादीला, कृषी‎विभागाच्या बाजूला असलेल्या‎मोकळ्या जागेत नेले. या ठिकाणी‎फिर्यादीस शिवीगाळ करुन तू‎आम्हाला रोजगार हमीचे पैसे का देत‎नाहीस असे म्हणत बळजबरीने‎विषारी द्रव पाजले. फिर्यादीला‎उपचारासाठी रुग्णालयात दाखल‎करण्यात आले. या प्रकरणी अधिक‎तपास पोलिस उपनिरीक्षक जटाळ‎करत आहेत. या घटनेनंतर संशयित‎पसार झाले आहेत. पोलिस पथक‎त्यांचा शोध घेत आहे.‎ रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड करून‎दोन महिलांचे दागिने लुटले‎ परळी‎ – काकीनाडा पोर्ट येथून शिर्डीकडे जात‎असलेली एक्सप्रेस रेल्वेला परळी – गंगाखेड ‎‎दरम्यान सिग्नलमध्ये बिघाड करुन थांबवत ‎‎चोरांनी लूट केली. ही घटना शनिवारी‎मध्यरात्री घडली. याप्रकरणी उशिरापर्यंत रेल्वे ‎‎पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात‎ आलेला नव्हता. परळी हे नांदेड व सिकंदराबाद विभागांना ‎‎जोडणारे रेल्वे स्टेशन आहे. परळीमार्गे दररोज ‎‎किमान 25 रेल्वेगाड्या धावत असतात.‎काकीनाडा पोर्ट ते साईनगर शिर्डी ही एक्सप्रेस‎नेहमीप्रमाणे शनिवार रोजी रात्री 11.45 वाजता‎परळी रेल्वेस्थानकातून सुटली. त्यानंतर‎उखळी ते वडगाव निळा दरम्यान असलेल्या‎आऊटर सिग्नलला बिघाड करत ही रेल्वे‎थांबवण्यात थांबवण्यात आली. काही जणांनी‎रेल्वेत शिरुन आतील प्रवाशांची लूट केली.‎याच दरम्यान वडगाव निळा स्टेशनवर तैनात‎रेल्वे पोलिसांनी धाव घेताच चोरट्यांनी पलायन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎केले. घटना घडली ते ठिकाण सोनपेठ पोलिस‎ठाण्याच्या हद्दीत येत असले तरी याबाबत‎अद्याप तक्रार दाखल करण्यासाठी कुणीही‎आलेले नसल्याने तक्रार दाखल नसल्याचे‎परळी रेल्वे पोलिस ठाण्याचे पीएसआय‎सोमनाथ वाघमोडे यांनी सांगितले. दोन‎दिवसापूर्वीच घाटनांदुर स्थानकावर प्रवाशांना‎लुटल्याची घटना ताजी असताना ही घटना‎घडल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न‎ऐरणीवर आला आहे.‎

Share

-