दिव्य मराठी अपडेट्स:राजुरी स्टीलच्या मालकास धमकी, दोन लाखांची खंडणी न दिल्यास कंपनी बंद करण्याचा इशारा
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स राजुरी स्टीलच्या मालकास धमकी, दोन लाखांची खंडणी न दिल्यास कंपनी बंद करू, जिवे मारू जालना – दाेन लाख रुपये द्या, अन्यथा कंपनी बंद करू, जिवेमारू, अशी धमकी दिल्याची घटना जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत घडली आहे. राजुरी स्टील कंपनीचे मालक कैलास लोया यांना सुपरवायझर मार्फत मोबाइलवरून ही धमकी देण्यात अाली आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात संतोष गायकवाड व राम जाधव (नागेवाडी) या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मागील काही महिन्यांपासून जालना शहरातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या मालकांना, खंडण्या मागण्यांचे प्रकार वाढले आहेत. खंडणी न दिल्यास थेट हल्ले होऊ लागले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. कैलास लोया यांची राजुरी स्टील कंपनी आहे. नागेवाडी शिवारात तुमच्या शेठला 2 लाख रुपये देण्यास सांगा, नसता मजुरांना मारहाण करू, जिवे मारून टाकण्याच्या धमक्या सुपरवायझर मार्फत मोबाइलवरून देण्यात अाल्या. सुपरवायझर नंदकिशोर कुरधने (भाग्यनगर, जुना जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदनझिरा ठाण्यात दाेघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजअकोला येथे जाहीर सभा अकोला – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रविधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याच्यादौऱ्यावर आहेत. दरम्यान, शनिवार, 9 नोव्हेंबर रोजीसकाळी 10 वाजता येथील डाॅ. पंजाबरावदेशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर महायुतीच्याउमेदवारांच्या प्रजारार्थ त्यांची जाहीर सभा आयोजितकरण्यात आली आहे. या सभेला नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीमधीलघटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीआज चंद्रपूर येथे जाहीर सभा चंद्रपूर – भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस हे शनिवार 9 नोव्हेंबर रोजी दौऱ्यावरअसून सकाळी 10 वाजता दादमहल येथील कोहिनूरतलाव क्रीडांगण येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यातआले आहे. विधानसभेच्या मतदानाची तारीख जवळयेताच सर्व पक्ष कामाला लागले असून सर्वउमेदवारांनी प्रचारात उडी घेतली आहे. यातमहायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभाआयोजित करण्यात आली आहे. या सभेला महायुतीचेसर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित राहणार आहेत. वाशीममध्ये आज प्रा. नितीन बानगुडेपाटील यांची जाहीर सभा मंगरुळपीर – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचाबिगुल वाजलेला आहे. विविध पक्षाच्या वतीनेआपल्या स्टार प्रचारकाच्या माध्यमातून उमेदवार हेप्रचार सभेचे आयोजन करत आहेत. वाशीममंगरूळपीर विधानसभा मतदारसंघाचे महाविकासआघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रा. नितीनबानगुडे पाटील यांची जाहीर सभा आयोजित केलीआहे. दिनांक 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता नवीनपंचायत समिती समोर मंगरूळपीर येथे या सभेचेआयोजन करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या आज परळी, आष्टी बीडला सभा बीड – जिल्ह्यातील परळी, आष्टी आणि बीडमध्ये मविआ उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार हे शनिवारी एकाच दिवशी 3 सभा घेणार आहेत. पहिली सभा परळीत, त्यानंतर आष्टी येथे आणि त्यानंतर बीडमध्ये सभा होईल. ते बीडमध्ये ते मुक्कामी थांबणार आहेत. त्यामुळे मुक्कामी दौऱ्यात बीडसाठी शरद पवार काय समीकरणे जुळवतात याकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात व 6 मतदार संघात, शरद पवार गटाचे 5 तर ठाकरे गटाचा 1 उमेदवार आहे. परळीत धनंजय मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न पवारांकडून होणार आहे. राजेसाहेेब देशमुख यांच्या प्रचारासाठी शनिवारी दुपारी ते सभा घेतील. त्यानंतर आष्टी येथे मेहबूब शेख यांच्या प्रचारासाठी सायंकाळी, तर रात्री बीड शहरात संदीप क्षीरसागरांसाठी सभा होईल. पुण्यात भराेसा सेलकडूनपाच तरुणींची सुटका पुणे – गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाने बुधवार पेठेतील पाच पीडित मुलींची सुटका केली आहे. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष व फ्रिडम फर्म संस्थेला 7 नोव्हेंबरला बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत काही महिलांना देह व्यापारासाठी अडकवून ठेवल्याची माहिती मिळाली. पथकाने छापा टाकून पाच मुलींची सुटका करीत आँटीसह चार आरोपींविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या पाचही महिलांकडून आरोपी वेश्या व्यवसाय करून घेत त्यांना मिळालेले निम्मे पैसे घेत होते,अशी माहिती संबंधित तरुणींच्या चौकशीत उघड झाली. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने एका तरुणीकडून कुंटणखाना आँटीने वेश्या व्यवसाय करून घेतला, असे पोलिसांनच्या चौकशीत निष्पन्न झाले. हिंगोलीचे माजी खासदार ॲड.माने चौथ्यांदा बदलणार राजकीय भूमिका हिंगोली – माजी खासदार ॲड. शिवाजी माने तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा स्वगृही परतणार अाहेत. पुढील दोन दिवसांत ते ठाकरे गटात प्रवेश करणार अाहेत. त्यामुळे ठाकरे गटाला जिल्ह्यात बळ मिळेल. शिवसेना, काँग्रेस, भाजप, महाराष्ट्र स्वराज्य पक्षमार्गे ते आज ठाकरे गटात प्रवेश घेणार आहेत. आज कळमनुरी येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार अाहे. आधी शिवसेना, काँग्रेस, भाजपमार्गे आज ते ठाकरे गटात प्रवेश घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ते शिवबंधन बांधणार आहेत. बंडखोरी रोखण्यात यश आले नसल्याची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची कबुली पुणे – बंडखोरी रोखण्यात माझ्यासह इतर वरिष्ठ नेत्यांना यश आले नाही, अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दिली. ते म्हणाले की, आमच्याकडे अनेक सक्षम उमेदवार असल्याने बंडखोरी वाढली. मुख्यमंत्री कोण बनणार हा दुय्यम विषय आहे. निकाल लागल्यानंतर त्यावर आम्ही एकत्रित बसून निर्णय घेऊ. सध्या राज्यात आघाडीच्या 180 पेक्षा अधिक जागा निवडून आणणे हे आमचे ध्येय आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याचेही ते म्हणाले. शिंदेसेनेच्या आहिरराव यांचीदेवळालीत माघार निश्चित नाशिक – देवळालीत अजित पवार गटाच्या उमेदवार आ. सरोज आहिरेंच्या विरोधात थेट हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिलेल्या व माघारीवेळी नॉट रिचेबल झालेल्या शिंदेसेनेच्या उमेदवार डॉ. राजश्री अाहिरराव माघार घेणार आहेत. 9 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अाहिरेंना पाठिंब्याची अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे येथे गतवेळेप्रमाणे अाहिरेंविरुद्ध उद्धवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांच्यात सरळ लढत रंगणार आहे. नांदगावमध्ये शिंदेसेनेचे विद्यमान आ. सुहास कांदेंविरुद्ध समीर भुजबळांनी बंडखोरी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदेसेनेने देवळालीत डॉ. राजश्री अाहिरराव यांना एबी फॉर्म दिला होता. सोशल मीडिया पोस्टमुळे हिंगोलीमध्ये धावाधाव हिंगोली – हिंगोली जिल्ह्यात प्रचारासाठी सोशल मीडियाचा होणारा वापर प्रशासनासाठी चांगलाच डोकेदुखी ठरू लागला अाहे. बुधवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर प्रश्नार्थक चिन्ह वापरून केलेल्या पोस्टमुळे खळबळ उडाली. पोलिस प्रशासनासह निवडणूक प्रशासनाच्या पथकाची चांगलीच धावाधाव झाली. बुधवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर हिंगोली शहरालगत 20 खोके सापडल्याची पोस्ट, प्रश्नार्थक चिन्ह देऊन कुणीतरी टाकली. याबाबत कुठल्याही प्रकारची अधिक माहिती देण्यात आली नाही. केवळ प्रश्नार्थक चिन्ह देऊन प्रसारित झालेल्या या पोस्टवरून, अनेकांनी निवडणूक प्रशासनासोबतच पोलिसांनाही दूरध्वनी करून चौकशी सुरू केली. एकाचवेळी अनेकांनी माहिती विचारल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेतली. नांदेडला मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश नांदेड – लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी, 20 नोव्हेंबरला जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवले जाणार आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. हदगाव-मनाठा, किनवट-माळ बोरगाव, मांडवी, माहूर-मौ.दहेगाव, अर्धापूर-कामठा, धर्माबाद-नीरंक या गावांचे आठवडे बाजार बंद असतील. पुण्यात भारत-ऑस्ट्रेलिया लष्कराचा संयुक्त सराव पुणे – भारत ऑस्ट्रेलियादरम्यान तिसऱ्या ‘ऑस्ट्राहिंद 2024’ या लष्करी संयुक्त सरावाला शुक्रवारी पुण्यात औंध लष्करी तळावर सुरुवात झाली. 21 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सरावात भारत आणि ऑस्ट्रेलिया लष्करातील लाइट हॉर्स रेजिमेंट व भारतीय लष्कराच्या डोग्रा रेजिमेंटचे 120 जवान सहभागी झाले आहेत. दोन आठवड्यांच्या या सरावात तंत्रज्ञान देवाणघेवाण, सामरिक कौशल्याचे आदानप्रदान, युद्ध कवायती व दोन्ही लष्करांत क्रिकेट सामनाही होईल. ऑस्ट्राहिंद हा लष्करी सराव 2022 मध्ये सुरू झाला. पहिला सराव राजस्थान, तर 2023 मध्ये पर्थ इथे झाला. सरावामुळे दोन्ही देशांतील सहकार्याचा नवीन अध्याय सुरू होणार आहे. सुनील केदारांना नियती माफकरणार नाही – भास्कर जाधव नागपूर – रामटेक मतदारसंघात काँग्रेसमधून झालेल्याबंडखोरीवरून उबाठा शिवसेनेत संताप उफाळून आलाआहे. उबाठा नेते भास्कर जाधव यांनी रामटेक येथीलजाहीर सभेत बोलताना काँग्रेस नेते सुनील केदारयांच्यावर टिकेचे अासूड ओढले. छत्रपतींच्यापुतळ्यासमोर घेतलेली शपथ केदार अवघ्या पंधरादिवसात विसरले. सगळे काही होईल. नियती अशालोकांना माफ करीत नाही, हे लक्षात ठेवा, असाइशारा जाधव यांनी दिला. सुनील केदार यांनीमहाविकास आघाडी, उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुखउद्धव ठाकरे आणि छत्रपतींचाही विश्वासघात केलाअशी टिका जाधव यांनी केली. काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरी मागेसुनील केदार यांचा हात आहे. पाच महिन्यांपूर्वी याचशिवसैनिकांनी आणि याच जनतेने रक्ताचे पाणी करूनकाँग्रेसचा खासदार निवडून आणला. पाच महिन्याततुम्ही उलटला. राजेंद्र मुळकांबद्दल केदारांना एवढे प्रेम आले होतेआणि मुळकांना विधानसभेवर निवडून जायचे होते तरकामठीची जागा लढवू शकले असते. मुळकांनाकेदारांनी कामठीतून का उभे केले नाही ?असा सवालजाधव यांनी केला. कळमेश्वरला शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यासमोर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांना केदार यांनी विश्वास दिला होता, हे ते विसरले. रश्दी यांच्या पुस्तकाची आयात बंदी उठवली नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयाने सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या वादग्रस्त पुस्तकाच्या आयातीवर 1988 मध्ये घातलेली बंदी उठवली आहे. बंदी घालणारी अधिसूचना अधिकारी सादर करू शकत नसल्यामुळे ती अस्तित्वात नाही असे गृहीत धरले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती रेखा पल्ली आणि न्या. सौरभ बॅनर्जी यांच्या खंडपीठाने 5 नोव्हेंबरला हा निर्णय दिला होता. 2019 मध्ये संदीपन खान नावाच्या व्यक्तीने पुस्तक आयात करण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. संदिपन म्हणाले होते, मी या पुस्तकाची ऑर्डर दिली होती, पण 36 वर्षांपूर्वी सीमा शुल्क विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेमुळे हे पुस्तक आयात करता आले नाही. हैदराबाद-संभाजीनगर विमान अडीच तास लेट छत्रपती संभाजीनगर – हैदराबादहून चिकलठाणा विमानतळावर येणाऱ्या इंडिगो विमानाचे सुमारे अडीच तास उशिराने आगमन झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. हैदराबाद येथून सायंकाळी 5.40 वाजता निघून चिकलठाणा विमानतळावर सायंकाळी 7.05 वाजता नियमित वेळापत्रकानुसार पोहोचणे अपेक्षित होते, परंतु हैदराबाद येथेच संबंधित विमान उशिराने दाखल झाले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकडे ते रात्री 8.30 वाजता निघाले व रात्रीचे 9.36 वाजता पोहोचले. संबंधित विमान नियमित वेळेपेक्षा अडीच तास म्हणजेच 2 तास 31 मिनिटे उशिराने पोहोचले. 20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शेअर बाजार राहणार बंद नवी दिल्ली – महाराष्ट्रातील विधानसभेसाठी मतदानामुळे बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शेअर बाजार बंद राहील, असे नॅशनल स्टाॅक एक्स्चेंजने जाहीर केले अाहे. बुधवारी भांडवली बाजारासह वायदा बाजारातील व्यवहारही बंद राहतील. एनएसईप्रमाणेच मंुबई शेअर बाजारही (बीएसई) सुटीची घोषणा करण्याची शक्यता अाहे.