स्वतःची मुले नसल्यामुळे अनुपम खेर भावुक:म्हणाले- मला मुलांची कमतरता जाणवते, त्यांना वाढवू शकलो असतो तर मला जास्त आनंद झाला असता

अनुपम खेर यांनी 1985 मध्ये अभिनेत्री किरण खेरशी लग्न केले. दोघांच्या लव्ह लाईफची खूप चर्चा झाली. नुकतेच अनुपम यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले. पत्नी किरण खेर यांचा मुलगा सिकंदर खेर याला आपले नाव दिले असले तरी ते म्हणाले. पण, त्यांना कधी कधी मुलांची कमतरता जाणवते. वास्तविक, एका पॉडकास्टमध्ये अनुपम खेर यांना विचारण्यात आले की, त्यांना स्वतःची मुले नसण्याची उणीव भासते का? यावर अनुपम म्हणाले, अर्थातच मला स्वतःची मुले नसण्याची कमी भासते. यापूर्वी असे घडत नव्हते, परंतु गेल्या 8-10 वर्षांपासून मला एकटेपणा जाणवत आहे. मी सिकंदरवर खूप आनंदी आहे. पण माझी मुलं लहानापासून मोठी होताना पाहिली असती तर कदाचित तो आनंद वेगळाच झाला असता. हे मी प्रामाणिकपणे सांगत आहे. माझ्या आयुष्यातील ही शोकांतिका नाही. अनुपम खेर पुढे म्हणाले, ‘मी माझ्या आयुष्यात बहुतेक वेळा व्यग्र होतो, पण आता वयाच्या 50-55व्या वर्षी मला एक शून्यता जाणवते. किरण आणि सिकंदर आपापल्या आयुष्यात व्यग्र असल्यामुळेदेखील हे घडले असावे. अनुपम यांनी 1985 मध्ये पहिली पत्नी मधुमालती आणि किरण खेर यांनी पहिले पती उद्योगपती गौतम बॅरी यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर लग्न केले. दोघांचे लग्न झाले तेव्हा किरणचा मुलगा सिकंदर हा चार वर्षांचा होता.

Share

-