पुण्यात आचारसंहिता काळात सुमारे 31 कोटींचा मुद्देमाल पकडला:10 कोटी 92 लाख रुपयांची रोकड, 5 कोटी 2 लाखांचे मद्य जप्त

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान 15 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात 31 कोटी 77 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. यात 10 कोटी 92 लाख 25 हजार रुपये रोकड, 5 कोटी 2 लाख 57 हजार रुपयांचे 6 लाख 5 हजार लिटर मद्य, 58 लाख 81 हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, 8 कोटी 63 लाख 53 हजार रुपयांचे मौल्यवान धातू, 6 कोटी 59 लाख 88 हजारांच्या वस्तूंचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदार संघात भरारी पथके (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी) कार्यान्वित असून संशयास्पद वाहने, वाहतूक आदीवर काटेकोर लक्ष ठेऊन कार्यवाही केली जात आहे. पोलीस, आयकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग आदी विभागांच्यावतीनेही यामध्ये कार्यवाही केली जात आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय आतापर्यंतची जप्तीची कारवाई: पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 6 कोटी 70 लाख 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पर्वती विधानसभा मतदारसंघात जप्त करण्यात आला आहे. यात 2 लाख 88 हजार रुपयांचे 727 लिटर मद्य, 6 कोटी 60 लाख रुपयांचे मौल्यवान धातू, 7 लाख 46 हजार रुपयांच्या वस्तू यांचा समावेश आहे. आंबेगाव मतदारसंघात सर्वात कमी किंमतीचा अर्थात 1 लाख 17 हजार रुपये रोकड, 3 लाख 91 हजार रुपयांचे 5 हजार 558 लिटर मद्य, 85 हजार रुपयांच्या वस्तू असा एकूण 5 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बारामती मतदारसंघ – 6 लाख 83 हजार रुपयांचे 12 हजार 16 लिटर मद्य, 2 लाख 3 हजार किंमतीच्या वस्तू असा 8 लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भोर- 60 लाख रुपयांचे 25 हजार 487 लिटर मद्य, 81 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 1 कोटी 35 लाख 29 हजार रुपयांच्या वस्तू असा एकूण 1 कोटी 96 लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोसरी- 23 लाख 26 हजार रुपये रोकड, 21 लाख 45 हजार रुपयांचे 8 हजार 778 लिटर मद्य, 2 लाख 84 हजारांचे अंमली पदार्थ, 21 लाख 32 हजार रुपयांच्या वस्तू असा 68 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिंचवड- 60 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हडपसर- 35 लाख 90 हजार रुपये रोकड, 10 लाख 52 हजार रुपयांचे 7 हजार 88 लिटर मद्य, 3 कोटी 18 लाख 61 हजार रुपयांच्या वस्तू असा 3 कोटी 65 लाख 3 हजारांचा मुद्देमाल इंदापूर- 5 लाख 25 हजार रुपये रोकड, 19 लाख 3 हजार रुपयांचे 17 हजार 14 लिटर मद्य, 10 लाख 98 हजार रुपयांच्या वस्तू असा 35 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जुन्नर- 28 लाख 78 हजार रुपयांचे 13 हजार 950 लिटर मद्य, 5 लाख 93 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 61 लाख 27 हजार रुपयांच्या वस्तू असा 95 लाख 99 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कसबापेठ – 2 लाख 9 हजार रुपयांचे 1 हजार 106 लिटर मद्य, 17 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 5 लाख 34 हजार रुपयांच्या वस्तू असा 7 लाख 60 हजारांचा मुद्देमाल, खडकवासला- 5 कोटी रुपये रोकड, 14 लाख 5 हजार रुपयांचे 6 हजार 15 लिटर मद्य, 16 लाख 60 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 18 लाख 42 हजार रुपयांच्या वस्तू असा 5 कोटी 49 लाख 7 हजारांचा मुद्देमाल खेड आळंदी- 89 लाख 8 हजार रुपये रोकड, 36 लाख 64 हजार रुपयांचे 44 हजार 685 लिटर मद्य, 10 लाख 79 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 14 लाख 16 हजार रुपयांच्या वस्तू असा 1 कोटी 50 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोथरुड – 6 लाख 26 हजार रुपयांचे 1 हजार 773 लिटर मद्य, 2 लाख 48 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 1 लाख 71 हजार रुपयांच्या वस्तू असा 10 लाख 46 हजारांचा मुद्देमाल, मावळ- 27 लाख 12 हजार रुपये रोकड, 81 लाख 84 हजार रुपयांचे 1 लाख 62 हजार 840 लिटर मद्य, 2 लाख 62 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 98 लाख 97 हजारांचे मौल्यवान धातू, 27 लाख 92 हजार रुपयांच्या वस्तू असा 2 कोटी 38 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपरी- 4 लाख 48 हजार रुपये रोकड, 6 लाख 61 हजार रुपयांचे 6 हजार 970 लिटर मद्य, 5 लाख 34 हजार रुपयांच्या वस्तू असा 16 लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट- 3 लाख 20 हजार रुपयांचे 1 हजार 795 लिटर मद्य, 12 लाख 45 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 5 लाख 89 हजार रुपयांच्या वस्तू असा 21 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुरंदर- 58 लाख 87 हजार रुपयांचे 89 हजार 972 लिटर मद्य, 29 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 2 लाख 50 हजार रुपयांच्या वस्तू असा 61 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिरुर – 3 कोटी 1 लाख 90 हजार रुपये रोकड, 52 लाख 60 हजार रुपयांचे 92 हजार 312 लिटर मद्य, 12 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 1 कोटी 4 लाख 56 हजारांचे मौल्यवान धातू, 5 लाख 11 हजार रुपयांच्या वस्तू असा 4 कोटी 64 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाजीनगर- 8 लाख 83 हजार रुपयांचे 5 हजार 405 लिटर मद्य, 2 लाख 89 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 3 लाख 81 हजार रुपयांच्या वस्तू असा 15 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वडगाव शेरी- 50 लाख रुपये रोकड, 10 लाख 2 हजार रुपयांचे 5 हजार 547 लिटर मद्य, 6 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 4 लाख 67 हजार रुपयांच्या वस्तू असा 64 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Share