एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस राज्याचे शत्रू:सदाभाऊ खोत फडणवीसांचा कुत्रा म्हणत संजय राऊतांनी केली विखारी टीका
एकनाथ शिंदे, अजित पवार देवेंद्र फडणवीस राज्याचे शत्रू आहेत. देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र का नाकरतो हे यामुळेच त्यांच्या समोर सदाभाऊ खोत शरद पवारांवर अशी टीका करतात अन् ते हसताय, त्यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानाखाली मारायली हवी होती. आम्हाला लाज वाटते की ते कधी आमच्या पाठिंब्यावर राज्याचे मुख्यमंत्री होते, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, खोटं बोलणे आणि नक्कल करण्यात भाजप आघाडीवर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने राजकारणाची गटार केली आहे. या सर्वांचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात संस्कार आहेत. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, बाळासाहेब ठाकरेंसह शरद पवार याच्यासारखे दिग्गज नेते झालेत. पण यात कधीही भाजपच्या नेत्यांचे नाव आले नाही, कारण हे सर्व संयमी नेते होते. त्यांनी लोकांवर टीका केली मात्र, त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेतली. कोणाच्या व्यगांवर टीका केली नाही. जेव्हापासून नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राजकारण आले आहे त्यांनी राजकारणाची गटार करून ठेवली आहे. अशा लोकांना सोबत घेऊन राजकारण करतात. फडणवीसांचे कुत्रे घाण भुंकतात संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना देशातील भारतरत्ननंतर दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला आहे, त्या महाराष्ट्रातील नेत्याबद्दल असे बोलताय. पण देवेंद्र फडणवीसांचे दोन कुत्रे असे घाण भुंकतात. शरद पवार असो की इतर नेते असोत त्यांच्यावर अशी टीका करत आहे. याची लाज वाटत आहे. शरद पवार देशाच्या राजकारणातील भीष्मपितामह संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे देशाच्या राजकारणातील भीष्मपितामह आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. तुम्ही त्यांच्या आजारपणावर असे व्यक्त करून महाराष्ट्राचे मान शर्मेने खाली घातली आहे. या लायकीची माणसे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात उभी केली आहे. महाराष्ट्राला महान राजकारणाची परंपरा आहे. तुळशीच्या वृंदावनात भांगीची रोपटी देवेंद्र फडणवीस यांनी लावली आहेत. महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम सुरू आहे.