एकनाथ शिंदेंकडून नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला:’माझ्या बॅगामध्ये कपडेच, युरिन पॉट वगैरे नाही’; पालघरमध्ये बॅगांची तपासणी

राज्यातील राजकारणात विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान नेत्यांच्या बॅग तपासणीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. यातच पालघर जिल्ह्याच्या सभेला जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगची देखील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. या वेळी माझ्या बॅगामध्ये कपडेच आहेत, युरिन पॉट वगैरे नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. यवतमाळ जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचारासाठी हेलिकॉप्टरमधून उतरले असता निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगची तपासणी केली. या घटनेचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी स्वतः रेकॉर्ड केला आहे. यामध्ये ते अधिकाऱ्यांना जाब विचारताना दिसत आहेत. इतकच नाही तर माझ युरीन पॉट देखील तपासा, असे उद्धव ठाकरे या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असून सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा तपासल्या जात नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांच्या बॅगा तपासतानाचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. उद्धव ठाकरे यांची यवतमाळ आणि औसा येथे बॅग तपासणी झाली होती. त्यावेळी त्यांनी या दोन्ही घटनांचे व्हिडिओ काढून वायरल केले होते. यावरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगची तपासणी करतानाचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. त्यामुळे राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या बॅग तपासणीवरून चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगेची तपासणी:EC च्या कर्मचाऱ्यांनी 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात घेतली होती झाडाझडती, व्हिडिओ समोर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान निवडणूक आयोगाच्या वतीने त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात येत आहे. याचा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून सरकार तसेच निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील बॅग तपासणी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र हा व्हिडिओ पाच नोव्हेंबरचा असून या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share