संविधानाच्या रक्षणासाठी ही निवडणूक महत्त्वाची:मविआचा विजय झाला तर मोदींच्या कुबड्या गळून पडतील, त्यांची खुर्ची हादरेल – काँग्रेस

विधानसभा निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही आमच्याकडून संविधान हा मुद्दा असणार आहे, असे वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले. राज्यात महाविकास आघाडी जिंकल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खुर्चीला झटके बसतील. देशाचे संविधान वाचवण्यासाठी राज्यातील निवडणुका जिंकणे महत्त्वाचे आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी राज्यपाल नियुक्त विधार परिषदेच्या आमदारांच्या शपथविधीवरही टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषण होण्याच्या एक दिवस आधी विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांना शपथविधी दिला जातो, ही कुठली नितीमत्ता-नैतिकता आहे. हे सर्व कायदा गुंडाळून काम सुरू आहे, असे ते म्हणाले. संविधान वाचवण्यासाठी राज्यातील निवडणुका महत्त्वाच्या
महायुतीने महाराष्ट्रात निवडणुका जिंकल्यास भाजप पुन्हा संविधानाला हात घालण्याचा प्रयत्न करणार, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यांनी संविधाला हात घालू नये, यासाठी आम्ही त्यांना लोकसभेला थांबवले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकल्यास पंतप्रधान मोदींच्या दोन कुबड्या गळून पडतील. त्यानंतर त्यांना संविधान बदलण्याचा आणि लोकशाहीला हात घालण्याच हिंमत राहणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीत संविधानाचे रक्षण होणे गरजेचे आहे. आगामी निवडणुकीत संविधान आमचा मुद्दा महाराष्ट्रातील निवडणूक झाल्यानंतर कदाचित उद्या नरेंद्र मोदींच्या खुर्चीला झटके बसतील. देशाच्या रक्षणासाठी राज्यातील विधानसभा निवडणुकीत आमचा संविधान हा मुद्दा असणारच, असे वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले. देशाचे संविधान वाचवण्यासाठी राज्यातील निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत गाजला होता संविधानाचा मुद्दा
2024 च्या लोकसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 400 पारचा नारा दिल्यानंतर विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली होती. संविधान बदलण्यासाठीच भाजपला 400 खासदार संख्या हवी आहे, असा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपयश आले होते. लोकसभेच्या 48 जागांपैकी भारत आघाडीला 30 तर एनडीएला 17 जागा मिळाल्या. यामध्ये भाजपला 9, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळाली. भाजपने 23 जागा गमावल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 41 जागा मिळाल्या होत्या. 2014 मध्ये हा आकडा 42 होता. म्हणजे निम्म्याहून कमी. हेही वाचा… महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले:288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूक, 23 नोव्हेंबरला निकाल निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-