निवडणुका जवळ आल्यानंतरच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो का?:खासदार संजय राऊत यांचे एनआयएच्या छाप्यावर प्रश्नचिन्ह

निवडणुका जवळ आल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती वाटत अहो. त्यामुळेच अशा वेळी राज्यात छापे टाकले जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. निवडणुका जवळ आल्यानंतरच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. असे असेल तर मागील दहा वर्षांपासून तुम्ही काय करता होता? असा प्रश्नही त्यांनी विचारला. या माध्यमातून राज्यात एएनआय आणि एटीएसने टाकलेल्या छाप्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणुका जवळ आल्या की अशावेळी राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो. मग तुम्ही मागील दहा वर्षात काय करत आहात? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. निवडणुका जवळ आल्या, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन जवळ आले की, अतिरेकी पकडले जातात. अशावेळी दिल्लीतील रस्त्यावर अतिरेकी पकडले जातात. निवडणुका जवळ आल्या की, छापे टाकले जातात. असे करून वातावरण बिघडवले जाते. याला नागरिक कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त जनताच करेल, असे म्हणत संजय राऊत यांनी एनआयएच्या छाप्यावर देखील टीका केली आहे. निवडणुका जवळ आल्या आणि भाजपची पराभवाची भीती समोर आली. नंतर अचानक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा समोर करते आणि निवडणुकीनंतर असा मुद्दा पुन्हा एकदा गायब होतो. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. निवडणुका झाल्यानंतर त्याचे काय होते? याचे उत्तर आजपर्यंत मिळाले नसल्याचे देखील ते म्हणाले. अजित पवारांनी मोदींना सल्ला द्यावा अजित पवार आणि शरद पवार हा घरातील मुलाचा आणि बापाचा मुद्दा नाही. हा तर देशाचा आणि महाराष्ट्राचा प्रश्न असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना सल्ला द्यायचाच असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावा, अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवार यांना सुनावले आहे. अजित पवार ज्या ठिकाणी गेले आहेत ते त्यांचे सासर आहे की माहेर? हे त्यांनी स्पष्ट करावे असा प्रश्नही संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. सुनेने किती दिवस वाट बघायची? असा प्रश्न अजित पवार यांनी शरद पवार यांना विचारला होता. यावर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. महाराष्ट्रासह एनआयएचे 5 राज्यांमध्ये 22 ठिकाणी छापे:दहशतवादी कट आणि टेरर फंडिंग प्रकरणी कारवाई, संभाजीनगर, जालना, मालेगावमधून 4 ताब्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा एनआयए आणि एटीएसने मोठी कारवाई केली आहे. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव मधून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तरुणांचा समावेश देश विघातक कृत्यांमध्ये असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील काही संघटनांचा देखील या घटनांमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा… राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. पोहरादेवीला येणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान:बंजारा समाजाचा काँग्रेसने अपमान केल्याचा आरोप; आघाडीवरही साधला निशाणा ​​​​​​​ पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहादेवी येथे येणारे पहिले पंतप्रधान ठरले आहे. त्यांनी या दौऱ्यात पोहादेवी मंदिरात आरती केली. या दरम्यान त्यांच्या हस्ते बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विरासत-ए – बंजारा नगारा वस्तुसंग्रहालयाचे लोकार्पण झाले. या वेळी पारंपारिक बंजारा पद्धतीने मोदींचे स्वागत करण्यात आले. मोदींनी देखील नगारा वाजवत या स्वागताला प्रतिसाद दिला. या वेळी मोदींनी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. पूर्ण बातमी वाचा…

Share

-