महाराष्ट्राच्या जनतेच्या भविष्याचा निकाल देणारी निवडणूक:केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
राज्यातील विधानसभा निवडणुक राज्यातील जनतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्र हे देशात प्रगतशील राज्य आहे. परकीय गुंतवणुक मध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे. ही संताची भूमी असून देशाला सामाजिक विचार देणारे फुले, शाहू, आंबेडकर हे महाराष्ट्राचे आहे. त्यामुळे ही निवडणुक महाराष्ट्राचे जनतेचा भविष्याचा निकाल देणारी ही निवडणुक आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार पुन्हा आले तर दुप्पट वेगाने राज्यात विकास हाेईल असे मत केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार मेधा कुलकर्णी ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर, भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, युवा सेना नेते किरण साळे,आरपीआय शहराध्यक्ष संजय साेनवणे , जयंत भावे, मंदार जाेशी, संदीप बुटाला, राजभाऊ बराटे, अमाेल बालवडकर , माेनिका माेहाेळ उपस्थित हाेते. गडकरी म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि पं.नहेरु यांनी रशियाचे माॅडेल स्विकारले. पण बदलत्या काळात कम्युनिस्ट विचारधारा नंतर रशिया, चीन मध्ये संपुष्टात आली व त्यांनी देशाचा विकास साधला. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस काळात याेग्य नियाेजन नसल्याने काेटयावधी रुपये वाया गेले. ग्रामीण भागात लक्ष्य दिले नाही, दुष्काळ पडत हाेता, पाणी पुरवले गेले नाही. काँग्रेसने याकामास कधी महत्व दिले नाही. देशात पाण्याची कमतरता नसून याेग्य नियाेजन हवे आहे. आम्ही ४९ नदी जाेड प्रकल्प देशात सुरु केले. राज्याराज्यात पाण्यावरुन सुरु असलेले भांडण त्यामुळे संपुष्टात येऊ शकले. अनेक गाेष्टी काँग्रेसला करता आल्या असत्या पण त्यांनी त्या केल्या नाही. राज्यात विविध उड्डाणपूल बांधण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते पण बीओटी तत्वावर मी काम सुरु केले असून आज देशात पाच लाख काेटीचे रस्ते कामे करत आहे. आम्ही मागील आठ वर्षापासून नागपूर मध्ये शाैचालयाचे पाणी विक्री करत असून त्यातून ३०० काेटी रुपये कमवताे. या बाबीचा कधी काँग्रेसने विचार केला नाही. शेतकरी, शेतमजूर, मुस्लिम, दलित, कामगार यांची गरीबी कधी हटली गेली नाही पण आता नवीन आर्थिक धाेरणे स्विकारली त्यामुळे विकास हाेत आहे. भारताची ऑटोमाेबाईल उद्याेग हा २२ हजार लाख काेटीची असून जगात तिसऱ्या क्रमांकाची आहे. यातून साडेचार काेटी राेजगार देखील निर्माण झाले आहे. बायाे इंधनमुळे पुढील पाच वर्षात चीनला मागे टाकून आपण दुसऱ्या क्रमांकावर ऑटोमाेबाईल उद्याेगात पाेहचू, काेविड नंतर जगाला चीनपेक्षा भारताचे महत्व समजले आहे. याेग्य निती, नेतृत्व, पक्ष असेल तरच परिस्थिती बदलू शकते. पुण्यासाठी ५४ हजार काेटीची विविध विकास कामे मी मंजूर केली आहे.