तुम्ही लोकांची वर्षानुवर्षे तोंडे दाबून ठेवली:आता संगमनेर तालुका गप्प बसणार नाही, सुजय विखे यांनी जयश्री थोरात यांना सुनावले

संगमनेरमधील प्रस्थापितांचा तख्ता पलटकेल्याशिवाय थांबणार नाही. लोकशाहीत तुम्ही आम्हाला बोलायचं थांबवू शकत नाही. ताई… ओ.. ताई.. जरा ऐकायला शिका. वर्षानुवर्षे तुम्ही लोकांची तोंड दाबून ठेवले. आज हा संगमनेर तालुका गप्प बसणार नाही, असे म्हणत भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरातांना सुनावले आहे. दरम्यान सुजय विखे पुढे बोलताना म्हणाले की, आता तुम्ही कानात जरी कापसाचे बोळे घालते, तर हा आवाज तुमच्या घरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. ही परिवर्तनाची नांदी आहे.एखादा माणूस गोरगरीबांचं रक्त पित असेल, तर त्याविरुद्ध विखे-पाटील सदैव उभा राहिल. 40 वर्षांपासून जनतेच्या आयुष्याशी खेळ- विखे सुजय विखे म्हणाले की, मी 40 वर्षांपासून जो आमदार गोरगरीब जनतेच्या आयुष्याशी खेळ करत राहिला, त्याच्याबद्दल बोललो. ताई.. ओ.. ताई… मी तुमच्या वडिलांबद्दल काहीच बोललो नाही. तालुक्यांच्या आमदारांची कार्यपद्धत, निष्क्रियतेबद्दल बोललो. 20 जनता दाखवून देईल सुजय विखे म्हणाले की, ताई तुम्ही गोरगरीब जनतेचा बाप काढायला निघाला आहात. हे आम्ही सहन करणार नाही. 20 नोव्हेंबरला संगमनेरची जनता दाखवून देईल तालुक्याचा बाप जनता आहे की आमदार असे म्हणत विखेंनी निशाणा साधला. सुजय विखे इच्छुक काही दिवसांपूर्वी सुजय विखे म्हणाले की, मला संगमनेरमधूनच विधानसभा निवडणूक लढवायला आवडेल. इतर मतदारसंघात नको. पक्षाने आदेश दिल्यास संगमनेरमधूनच उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी संगमनेरमधूनच विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, संगमनेरची जागा भाजपला सुटणार सुजय विखे म्हणाले की, सुजय विखे यांना या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. दोन दिवसात पक्षाचा निर्णय होवून संगमनेर विधानसभा मतदार संघाची जागा भाजपच्या वाट्याला येईल, तळेगाव, निमोण भागातील तरुणांनी या मातीची शान राखून परिवर्तन केले. तसेच आता येणाऱ्या निवडणुकीतही करायचे असे त्यांनी म्हटले आहे. थोरांतांनी नातेवाईकांनाच पदे वाटली सुजय विखे म्हणाले की,चाळीस वर्षे तालुक्याला मोठी पद मिळाली. पण निधी आणता आला नाही. यांनी केवळ नाते ठेकेदार आणि जमिनीचा ताबा मिळवणारे याच गोष्टीवर पद वाटप केले असा आरोप त्यांनी केला. तर मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून तळेगावला 44 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Share

-