फडणवीसांच्या तोंडून जरांगे पाटलांचे नाव निघत नाही:त्यांची जीभ अडखळते, MIM चे अध्यक्ष ओवैसींनी उडवली खिल्ली

विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून वार-पलटवार आणि आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडून मनोज जरांगे पाटील यांचे नाव निघत नाही. मनोज जरांगे पाटील यांचे नाव घ्यायला फडणवीसांची जीभ अडखळते, असे म्हणत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवली. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे वारंवार देवेंद्र फडणवींसावर हल्लाबोल करत आले आहेत. अशात आता असदुद्दीन ओवैसी यांनीही मनोज जरांगेंवरून देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. काय म्हणाले ओवैसी?
फडणवीस तुम्ही औवीसीचे नाव घेऊ शकता पण तुम्ही मनोज जरांगे पाटलांचे नाव घेऊ शकत नाही. हिंमत असेल तर तुम्ही मनोज जरांगे पाटील असे बोलून दाखवा, असे आव्हानच औवैसींनी फडणवीसांना दिले. पुढे बोलताना ओवैसी म्हणाले, तुम्ही मनोज जरांगे पाटील बोलू शकत नाहीत. त्यांचे नाव बोलताना तुमची जीभ अडखळते, असेही ओवैसी म्हणाले. फडणवीस तु्म्ही आणि अमित शाह, नरेंद्र मोदी मिळून जरी बसला तरी माझ्या समोर टिकू शकत नाही. तुम्ही माझा सामना करू शकत नाही, अशी टीकाही ओवैसी यांनी केली. निवडणूक आयोग फडणवींसावर कारवाई का करत नाही?
निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीसांवर कारवाई करावी, अशी मागणीही असदुद्दीन ओवैसी यांनी केली. भाजपच्या उमेदवाराचा पराभव होतो, तेव्हा यांना वोट जिहाद आठवतो. प्रचारात वोट जिहाद, धर्मयुद्ध असे बोलणे योग्य आहे का? लोकशाहीमध्ये असे बोलता येते का? फडणवीस निवडणूक प्रचारात वोट जिहाद आणि धर्मयुद्ध उल्लेख करत आहेत. यावर निवडणूक आयोग गप्प का आहे? ते कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न देखील ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा… धर्म धोक्यात आहे म्हणणाऱ्यांचा पक्ष धोक्यात:भावासाठी रितेश देशमुख मैदानात, महायुतीवर टीका; यंदा झापूक झुपूक वारं असल्याचा दावा “तुमचा पंजा भारी, माझा पंजा भारी, सगळ्यांचाच पंजा लय भारी”, असे म्हणत बॉलीवूड अभिनेते रितेश देशमुख यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार व त्यांचे बंधू धीरज देशमुख यांच्या प्रचार सभेत जोरदार भाषण केले आहे. तसेच धर्म धोक्यात आहे म्हणणाऱ्यांचा पक्ष धोक्यात आहे, असे म्हणत भाजप महायुतीवर देखील निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा… सदा सरवणकरांना घरात नो एन्ट्री:प्रचाराला आलेले पाहताच महिलेचा राग अनावर; प्रश्नांचा भडिमार करत दारातूनच पाठवले परत; VIDEO सदा सरवणरकर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी माहीम मतदारसंघ पिंजून काढत आहेत नुकतेच ते कार्यकर्त्यांसह माहीम कोळीवाड्यात प्रचारासाठी गेले असता, त्यांना एका महिलेच्या रोषाला सामोरे जावे लागले. सदा सरवणकर घरासमोर येताच त्या महिलेचा राग अनावर झाला. तिने सरवणकरांवर प्रश्नांचा भडिमार करत आपला रोष व्यक्त केला. तसेच सदा सरवणकर यांना घरातही येऊ दिले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share