गजीनृत्याने गर्दीचा उच्चांक मोडला:साताऱ्यातील म्हसवडच्या नागोबा यात्रेसाठी परराज्यातून भाविक दाखल

म्हसवड येथील श्री.नागोबा यात्रेत गावोगावच्या गजीनृत्यांच्या स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या नयनरम्य सादरीकरणामुळे आबालवृद्धांबरोबर युवक वर्गाने मोठी उपस्थिती लावत गर्दीचा उच्चांक मोडला. दिवसेंदिवस नागोबा यात्रेतील कुस्त्यांचा जंगी निकाली फड, बैलगाडी शर्यत असेल अथवा गजीनृत्य व धनगरी ओव्यांचा कार्यक्रम असतील या कार्यक्रमांनी यात्रेत मोठा उत्साह निर्माण केल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या यात्रेत माणदेशी भूषण म्हणून प्रसिद्ध असलेला येथील गजीनृत्यांचा खेळ हा यात्रेत मुख्य आकर्षण असल्याचे पुन्हा एकदा उपस्थितांच्या निदर्शनास आले. यात्रेतील या गजी नृत्य स्पर्धेत सातारा, सोलापूर, सांगली आदी जिल्ह्यातील अंबावडे, निकमवाडी, मायणी, डोंबाळवाडी, इबतवाडी, सुळेवाडी, पिंपरी, गंगोती, शिरताव, पुळकोटी, काळेवाडी,शिवरी, मसाईवाडी, पालवण, मलवडी, बोरगांव, गोरडवाडी, माळशिरस, विरकरवाडी,मासाळवाडी, खडकी, नरवणे, फोंडशिरस, चितळी, बनगरवाडी, शिरताव, खुडूस, पिंगळी, निंबवडे, झंजेवाडी, दोरगेवाडी कचरेवाडी, निमगाव, बंडगरवाडी, कोकरेवाडी, कण्हेर, नरबटवाडी, गीरवी, बाभुर्डी, मोही, कोकरेवाडी, पळशी, फोंडशिरस, आदीसह ५० गावातील गजीमंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. ढोलांचा गजर, पिपाणी व भोंग्याच्या सुरात बेभान होऊन नृत्य करणारे प्रत्येक गावातील गजी नृत्य पथकाच्या वेगवेगळ्या डावाने उपस्थित प्रेक्षकांना नयनरम्य अविष्कार अनुभवता आला. नागोबा यात्रेत अबालवृध्दांचा खास आखाडा म्हणून हा गजीनृत्य कार्यक्रम प्रसिद्ध असल्याचे पुन्हा एकदा या उच्चांकी गर्दीच्या समूहाने दाखवून दिले आहे. या यात्रेस महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्रप्रदेशातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.या यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व गजीनृत्य पथकांना याबरोबरच भाविक यात्रेकरुस नियोजनपूर्वक एक दिवस महाप्रसादाची परंपरा हल्लीच्या काळात अद्याप नागोबा देवस्थान ट्रस्टने एक आगळी वेगळी सामाजिक बांधिलकी तितक्याच जोमाने जपत सगळ्यासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. यात्रेत गजीनृत्य स्पधेत भाग घेतलेल्या पथकास कोणत्याही प्रकारची अडचण यात्रेत येऊ दिली जात नाही. त्यांना सर्व सुविधा मंदीर ट्रस्ट मार्फत यात्रेकरूंना पुरविल्या जातात. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वरा खोत, पांडा रोडके, किसन ढंम, मधुकर सोकासने, किसन जठरे, धर्मू खोत, जिजाबा खोत, सूर्यकांत विरकर, रामचंद्र विरकर, मधुकर कर्ले, वस्ताद विरकर, तुकाराम विरकर, बापू रोडके, बीरा रोडके, भारत रोडके, अंकुश गोरड, बापू गोरड, धनाजी विरकर, राजू खोत, दादा ठोंबरे, रामा रांखंडे यासह विरकरवाडी गजीनृत्य मंडळ व ट्रस्टच्या सर्व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.

Share