गणेश भक्तांसाठी महत्त्वाची बातमी:आता अंगभर कपडे घातले तरच सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश; गणेश जयंती पासून निर्णय लागू

महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत असलेल्या मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात आता अंगभर कपडे घातले तरच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर अज्ञासाच्या वतीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आता केवळ भारतीय पेहरावांमध्येच पुढील आठवड्यापासून हा ड्रेस कोड लागू राहील मंदिरांमधील येणारा प्रत्येक भक्ताचा पेहराव हा शालेय आणि पावित्र जपणारा असावा अशा पद्धतीचा पेरावा असावा अशी ही आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अंगभर कपडे घातले तरच आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. मागे गणेश जयंती पासून हा निर्णय लागू होणार आहे या संदर्भात न्यासाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला आहे महिला असो किंवा पुरुष असेल सर्वांसाठी हे निर्बंध लागू असतील पुरुषांना देखील हाफ पॅट असलेल्या मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही तर त्यांना देखील फुल पॅड घालूनच मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या संदर्भात सिद्धिविनायक मंदिर हे मंदिर आहे एक दैवत आहे ज्यावेळी आपल्या घरात लग्न सोहळा किंवा पूजा असते त्यावेळी आपण जसे कपडे परिधान करतो तसेच कपडे हे परिधान करून मंदिरात यावे अशी प्रतिक्रिया राहुल लोंढे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. महिलांनी साडी किंवा पंजाबी ड्रेस अशा प्रकारचे ड्रेसेस स्पर्धा करून मंदिरात यावे अशा प्रकारच्या सूचना आता मंदिराकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता केवळ पूर्ण कपडे घालूनच सिद्धिविनायक मंदिरामध्ये प्रदेश दिला जाणार आहे. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक श्री सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. तसेच ते मुंबईतील सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारे मंदिर मानले जाणारे हे गणेशाचे मंदिर विनायक या नावाने प्रसिद्ध आहे. त्यामुळेच येथे गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक येतात. अनेक सेलिब्रिटी दर्शनाला येतात येथे अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी असते. अमिताब बच्चन, सलमान खान, संजय दत्त, दीपिका पदुकोण, रणबीर कपूर यांच्यासह अनेक मोठे बॉलीवूड स्टार्स सिद्धिविनायक मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. या सेलिब्रिटींना येथे मुख्यतः चित्रपट रिलीज दरम्यान किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी पाहिले जाते. पुष्करच्या ब्रह्मा मंदिरात सर्वात आधी लागला होता ड्रेस कोडचा बोर्ड पुष्करच्या ब्रह्माजी मंदिरात दररोज 50 ते 60 हजार भाविक देश-विदेशातून दर्शनासाठी येतात. पुजारी कृष्ण गोपाल वशिष्ठ यांनी सांगितले होते की, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आमचे आवाहन आहे की त्यांनी सभ्य कपडे घालूनच मंदिरात प्रवेश करावा. मंदिर हे पर्यटन स्थळ नाही म्हणून लोक लहान आणि अशोभनीय कपडे परिधान करून दर्शनासाठी येत होते. यासाठी यापूर्वी मंदिराबाहेर फलकही लावला होता. ज्यामध्ये लोकांना सभ्य कपडे घालूनच मंदिरात येण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Share