गरजू 20 विद्यार्थिनींना सायकल वाटप, रोटरी क्लबचा उपक्रम:मरणोत्तर नेत्रदान केलेल्यांच्या वारसांचा सत्कार

नदीचे रूंदीकरण, खोलीकरणाचा उपक्रम स्तुत्य शेवगाव येथील सुर्यकांता नदीचे रूंदीकरण व खोलीकरणाचा राबवलेला जलसंधारणाचा उपक्रम स्तुत्य आहे. इतर रोटरी क्लबला हा उपक्रम प्रेरणादायी आहे. मानवी जीवनात सर्वांनाच अनेक अडचणी, अडथळे व समस्या येतात. परंतु, सकारात्मक विचाराने त्यावर मात करणे, धैर्य व संयम बाळगून जीवनात स्वतः प्रगती करणे महत्वाचे असते. तसेच सामाजिक उत्तरदायित्व म्हणून समाजाला वेळ, पैसा व सेवा देणे हे आपल्या जीवनाचे कर्तव्य मानले पाहिजे. निस्वार्थ मानवसेवा हेच रोटरीचे ध्येय आहे, असे डॉ. साबू म्हणाले. रोटरी क्लबच्या वतीने तालुक्यातील २० गरजु मुलींना सायकल वाटप करताना प्रांतपाल डॉ. सुरेश साबू. समवेत रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. काकासाहेब लांडे, सचिव मोहमंद वसिम, खजिनदार संतोष ढाकणे व इतर समाजाच्या विकासात महिलांची भागीदारीही महत्वाची असते.त्यामुळे येथील रोटरी क्लब मध्ये पुरूषांबरोबर ५० टक्के महिलांचा सहभाग वाढवावा. तसेच पुढील काळात एखाद्या महिलेला रोटरीचे अध्यक्षपदही द्यावे. महिलांचा सहभाग असलेल्या ठिकाणी मानवसेवेचे काम अधिक गतीने चांगले होते. या वेळी मोहमंद वसिम यांनी रोटरीच्या कामाचा अहवाल सादर केला. सात किमी लांबीच्या सुर्यकांता नदीच्या काठी लवकरच वृक्षारोपण करणे, सुमारे १० हजार लोकांची मधुमेह व रक्तदाब तपासणी करणे तसेच अंधमुक्त शेवगाव, रक्तदान आदींसह विविध क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबवण्याचा रोटरीचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. तिवारी यांनी पुरस्काराबद्दल रोटरी क्लबविषयी कृतज्ञता व्यक्त केली. फिरस्ता ग्रुपचे कार्य सध्या आमच्या वृद्धांचा ग्रुप करीत असल्याचे सांगत ९५ टक्के वृद्धांना अनेक प्रतिनिधी |शेवगाव तालुक्यातील विविध शाळांतील गरजू २० विद्यार्थिनींना रोटरी क्लबच्या वतीने सायकल वाटप करण्यात आले. यामुळे या विद्यार्थिंनींना शिक्षण घेणे सोयीचे होणार आहे. मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्यांच्या वारसांचा सत्कार, तसेच सामाजिक कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते .राधेशाम तिवारी यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन रोटरी डिस्ट्रिक्ट प्रांतपाल डॉ. सुरेश साबू यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रोटरीचे सहप्रांतपाल पुरूषोत्तम जाधव, शेवगाव रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. काकासाहेब लांडे, सचिव मोहमंद वसिम, खजिनदार संतोष ढाकणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. रोटरी डिस्ट्रिक्ट प्रांतपाल डॉ. साबू म्हणाले, रोटरी क्लबचे सुमारे २२५ देशात मानवतावादी व सेवेचे कार्य सुरू आहे. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून स्वतःच्या जीवनातील काही वेळ , पैसा व सेवा देण्यातच खरा आनंद व समाधान आहे. येथील रोटरी क्लबने समाजहितासाठी विविध उपक्रम राबवित केलेले कार्य कौतुकास्पद आहे. समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष लांडे यांनी, सुत्रसंचालन नीलेश मोरे यांनी, तर आभार संतोष ढाकणे यांनी मानले.

Share

-