मला हलक्यात घेतलं, आघाडी ‎सरकार टांगा पलटी केलं- शिंदे:मुख्यमंत्र्यांच्या 29 मिनिटांच्या भाषणात मविआवर कडाडून टीका‎

मला हलक्यात घेतल्यानेच महाविकास आघाडी‎सरकारचा टांगा पलटी केला. लाडक्या बहिणींना‎लखपती झालेलं मला बघायचंय. लाडक्या बहिणींच्या‎विरोधात असलेल्या आघाडी सरकारला या बहिणी‎कडक लक्ष्मी बनून घरी बसवल्याशिवाय राहणार‎नाहीत. आता वारं फिरलंय.. आपलं महायुतीच ठरलंय,‎अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेवासे‎येथील सभेत फटकेबाजी करताना सरकारच्या ‎तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा असल्याने ‎कर्जमाफीचा निर्णय आम्ही घेतल्याचे सांगितले. नेवासे‎फाट्यावरील ज्ञानेश्वर कॉलेजजवळ महायुतीचे‎उमेदवार विठ्ठल लंघे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे‎यांची सोमवारी (११ नोव्हेंबर) सभा झाली. प्रारंभी‎पालकमंत्री राधाकृष्ण विखे, उमेदवार लंघे, सचिन‎देसरडा आदींची भाषणे झाली. मुख्यमंत्री शिंदे यांनी‎त्यांच्या २९ मिनिटांच्या भाषणात आघाडी सरकारवर ‎‎कडाडून टीका केली. ते म्हणाले, की काँग्रेसने खटाखट ‎‎देणार असल्याचे सांगितले, पण त्यांचा खटका दबला ‎‎नाही. मात्र, आम्ही पटापट दिले, कारण बोलतो तसे ‎‎वागणारे आम्ही आहोत. राज्यात कोणीही उपाशीपोटी‎झोपू नये, हा आमचा मानस असल्याचे ते म्हणाले.‎ लाडक्या बहिण ‎योजनेबाबत खोटा प्रचार‎ महाविकास आघाडीने लाडकी‎बहिण योजनेत खोडा घालण्याचे‎काम केले. लाडक्या बहिणींच्या‎खात्यात आलेले पैसे लवकर काढा,‎अन्यथा हे पैसे परत जातील, असा‎खोटा प्रचार त्यांनी केला. मात्र,‎आम्ही महिलांना लखपती करणार‎असून, आम्ही देणारे तर ते घेणारे‎आहेत. ते देवालाही सोडत नसल्याचे‎मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.‎ दादागिरी उखडून फेकू, शनैश्वर देवस्थानातील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही‎ शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान हे पवित्र स्थान‎आहे. शनिची वक्रदृष्टी पडली, तरी राजाचा रंक होतो.‎शनिदेव तालुक्यात परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार‎नाही. शनैश्वरमधील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार‎नाही, अशी तंबी देत विकास आराखड्यातून संत ज्ञानेश्वर‎मंदिर व अहिल्यानगरचा विकास करणार असल्याचे‎सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी नेवाशात भगव्याचा विजय‎होणार आहे. पुंडलिक विजयाची वीट ठेवल्याशिवाय‎राहणार नाही. तालुक्यातील घराणेशाही व दादागिरी‎उखडून फेकल्याशिवाय राहणार नसल्याचे ते म्हणाले.‎

Share

-