गिलने रोहितच्या निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या:म्हणाला- कर्णधाराचे संपूर्ण लक्ष सामन्यावर; उद्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना
टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिलने रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. काही वृत्तांत असे म्हटले जात होते की, रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी, रोहितच्या निवृत्तीच्या प्रश्नावर गिल म्हणाला – ‘संघात अद्याप अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मला वाटतं रोहित भाई सध्या याबद्दल विचार करत नसतील. सध्या त्याचे लक्ष उद्याच्या सामन्यावर आहे. तो सामन्यानंतर निर्णय घेईल. गिलला विचारण्यात आले की रोहितने निवृत्तीबद्दल सहकारी खेळाडूंशी चर्चा केली आहे का? चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रविवार, ९ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. गिलच्या परिषदेपूर्वी टीम इंडियाने केला सराव, पाहा फोटो