गिरीश महाजन:भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख; सलग 7 वेळा जामनेरमधून विधानसभेवर, फडणवीसांचे निकटवर्तीय
गिरीश दत्तात्रेय महाजन हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि संकटमोचक म्हणून ओळखले जातात. ते जामनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. उत्तर महाराष्ट्रतील राजकारणात त्यांचा प्रभाव आहे. महाजन सलग सात वेळा जामनेरमधून विधानसभेवर निवडून आलेले आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. जामनेरच्या सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणारे गिरीश महाजन हे 1995 पासून सतत विधानसभेवर निवडून आले आहेत. 1995 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढणाऱ्या महाजन यांनी काँग्रेसचे तत्कालिन उमेदवार ईश्वरलाल जैन यांचा 20 हजार मतांनी पराभव केला होता. कोण आहेत गिरीश महाजन? गिरीश दत्तात्रय महाजन हे उत्तर महाराष्ट्रातील जामनेर येथील रहिवासी असून त्यांच्या पत्नीचे नाव साधना महाजन आहे. गिरीश महाजन 2014 मध्ये भाजप-शिवसेना सरकार मध्ये जलसंपदा खात्याचे मंत्री होते. ते सातेळेस जामनेरचे आमदार राहिले आहेत. भाजपतील निर्णयांमध्ये महाजनांचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रमध्ये एकनाथ खडसे बरोबरच गिरीश महाजन असे दोन भाजप सत्ता ध्रुव होते. परंतु 2016 मध्ये एकनाथ खडसेवर त्यांच्या मंत्रिपदाचा गैर वापर केल्याचे आरोप लागले, खडसेना मंत्री पदावरून राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून गिरीश महाजन यांना उत्तर महाराष्ट्राच्या व राज्य पातळीवरील राजकारणात अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले. भाजपातील निर्णयांमध्ये महाजनांचा प्रभाव वाढला. 1 जानेवारी 2020ला भाजपचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी महसूल-मंत्री एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले की, त्यांच्यामुळेच आपणास 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली. आपले राजकारण संपवण्याचा कट रचला गेला असा आरोप त्यांनी गिरीश महाजन,माजी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर केले. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक आपले तीकिट कापले असा आरोप केला. 2019 मध्ये सांगली जिल्ह्यात पूर आलेला होता तेव्हा गिरीश महाजन पूर परिस्थितीत दौरा करण्यासाठी गेले. तिथे ते राष्ट्रीय आपत्ती दलाच्या नावेत बसून सेल्फी काढताना व हसतांना समाजमध्यमांमध्ये पाहिले गेले यावर राज्यातल, राष्ट्रीय बातमीपत्रांनी, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने-विरोधकांनी संताप व्यक्त केला होता.