हिंदू धर्माच्या आस्थेबद्दल कुणीही प्रश्न करू नये:इतर धर्मावर बोलण्याची हिंमत दाखवावी, नीतेश राणे यांचा उद्धव अन् राज ठाकरेंवर घणाघात

रमजानच्या काळात जो कचरा केला जातो त्यावर कुणी काही बोलत नाही. सर्व प्रश्न हिंदू धर्माला विचारले जातात. एवढी हिंमत आहे तर बकरी ईद आणि रमजानच्या वेळेस प्रश्न विचारा ना, असे म्हणत मंत्री नीतेश राणे यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता टोला लगावला आहे. नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, मोहरमच्या वेळी प्राण्यांमध्ये सळई घातली जाते तेव्हा कुणी विचारत नाही की का सळई घातली जाते. आमच्या हिंदू धर्माच्या आस्थेबद्दल कुणीही प्रश्न विचारू नये अन् विचारायचेच असतील तर अन्य धर्मांना देखील विचारण्याची हिंमत दाखवावी. उद्धव ठाकरेंनी अल्लाहू अकबर म्हणणे बंद करावे नीतेश राणे म्हणाले की, रमजानच्या महिन्यात जो रात्री धिंगाणा घातला जातोय. 12 वाजेच्या नंतर दुकाने सुरू आहेत. मोहम्मद अली रोड, नळ बाजारमध्ये धिंगाणा सुरू आहे. आम्ही जय श्री राम अन् जय शिवराय एकाच श्वासात म्हणतो. पण उद्धव ठाकरे यांनी जे अल्लाहू अकबर असे म्हणायचे सुरू केले आहे ते बंद करा. पहिले यांच्यासाठी जय श्री रामचे नारे लागत होते अन् आता अल्लाहू अकबरचे नारे लागत आहे. राज साहेब त्यांच्या भूमिकेच्या बाबतीत अल्पमतात सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, नांदगावकर साहेबही राज ठाकरे यांचे ऐकत नाहीत या बाबतीत असे दिसत आहे. ठाकरे यांनी टीका केली, पण त्यांची टीका सध्या तरी देशात अल्पमतात आहे. कारण उत्तर प्रदेश सरकारने 65 कोटींचा आकडा जाहीर केला. याचा अर्थच असा आहे, राज साहेब त्यांच्या भूमिकेच्या बाबतीत अल्पमतात आहेत. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे ? राज ठाकरे म्हणाले होते की, बाळा नांदगावकर यांनी कमंडलमधून पाणी आणले होते. मी त्यांना म्हटले हड मी ते पिणार नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिलेत. तिथे आलेले माणसे अंग खाजवत होते आणि हे बाळा नांदगावकर म्हणतायत गंगेचे पाणी घ्या. कोण पिणार ते पाणी अशी खिल्ली राज ठाकरे यांनी उडवली. उद्धव ठाकरेंचे वक्तव्य काय? शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले नसते आणि औरंगजेबाला मोकळे सोडले असते तर गुजरात बिजरात पहिले औरंगजेबाच्या चरणी लीन झाले असते. संपूर्ण देशच हिरवा झाला असता. त्यामुळे जय श्रीराम आणि जय शिवराय म्हटलेच पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते यावर बोलताना नीतेश राणेंनी टीकास्त्र डागले आहे.

Share