राहुल गांधींवर खोट्या केसे लावल्या जात आहेत:त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर देश पेटून उठेल, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन जातिनिहाय जनगणना आणि आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार असल्याचे जाहीर करत थेट भाजपला मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यानंतर भाजपने राहुल गांधी यांना नक्षल समर्थक असल्याचा आरोप देखील केला आहे. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. राहुल गांधींचे तोंड बंद करण्यासाठी खोट्या केसेस दाखल केल्या जात असल्याची टीका पटोले यांनी केली आहे. खोट्या केसे दाखल केल्या जात आहेत
नाना पटोले म्हणाले, राहुल गांधींनी जी भूमिका मांडली त्यामुळे भाजप घाबरली आहे. ते सर्वसामान्य जनतेचा आवाज देशभर पोहोचवत असल्याने त्यांना अडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्यावर खोट्या केसे दाखल केल्या जात आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. तसेच राहुल गांधींच्या केसाला जरी धक्का लावला तर आम्ही सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील नाना पटोले यांनी दिला आहे. केसाला जरी धक्का लावला तर देश पेटून उठेल
नाना पटोले पुढे म्हणाले, राहुल गांधींच्या आक्रमक भूमिकेला भाजप घाबरली आहे. त्यामुळे खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत आहे. राहुल गांधींच्या मागे सीबीआय चौकशी लाऊन त्यांना महाराष्ट्रात प्रचार करता येणार नाही असे प्रयत्न केले जात आहेत. मात्र राहुल गांधी घाबरणारे नेते नाहीत. त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर देश पेटून उठेल. पराभव झाल्याने भाजपला लाडक्या बहिणी आठवल्या
भाजपने 15 लाखांचा जुमला दिला आहे. निवडणुकीत दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचे काय झाले? अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. लोकसभेत पराभव झाल्याने भाजपला लाडक्या बहिणी आठवल्या. आता आमच्या विरोधात लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याचा खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. तसेच आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही तर त्यात आणखी रक्कम वाढवून देणार असल्याचे आश्वासन देखील नाना पटोले यांनी दिले आहे. मनसेचे भोंगे जनताच बंद करेल
नाना पटोले म्हणेल, महाराष्ट्रात 67 हजार महिला गायब झाल्या, त्यांच्यावर अत्याचार झाले. असे असतानाही कारवाई होत नसल्याने कोर्टाला सुमोटो याचिका दाखल करावी लागली. ही सरकारची नामुष्की आहे. पुढे राज ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांना सांविधानिक व्यवस्थेची कल्पना नाही. ते राज्यकर्ते असल्यासारखे तोऱ्यात वागतात आणि बोलतात. मनसेचे भोंगे विधानसभेच्या निवडणुकीत जनताच बंद करणार आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Share

-