विचारधारा साेडलेल्या राजकीय पक्षांना धडा शिकवणार का?:मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मतदारांना प्रश्न
गत पाच वर्षांत राज्यातील सत्तेच्या खेळामुळे, विचारांना तिलांजली देत आमदार इकडून तिकडे गेल्याने मतदारांना आपण नेमके कोणत्या विचारधारेला, पक्षाला, उमेदवारालामतदान केले तेच कळेनासे झाले आहे, अशीटीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. असे विचारहीन पक्ष, उमेदवारांना सहन करणार की, धडा शिकवणार असा प्रश्न, राज ठाकरेयांनी मनसेचे जिल्ह्यातील उमेदवार मंगेश उर्फ पप्पू पाटील यांच्याबुधवारी 6 नाेव्हेंबरला रात्री 8 वाजता झालेल्या प्रचार सभेत विचारला. शरदचंद्र पवार हे राज्यातील नवे संत ‘राज्याला संतांची परंपरा आहे.अमरावती ही संतांची कर्मभूमी राहिली आहे. त्याच मालिकेत शरदचंद्र पवार हे राज्यातील नवे संत म्हणून उदयास आले आहेत. त्यांनाएका विशिष्ट समुदायाचा पुळकाआला आहे. त्यामुळेच त्यांनीराज्यातील हिंदूंना जातींमध्ये विभागले आहे. राज्यात राकाँच्या उदयानंतर स्वत:च्या जातीबद्दल प्रेम कमी व इतरांबद्दल द्वेष निर्माण करणारे तसेच हिंदूंनी एक होऊ नये म्हणून राजकारण केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी या वेळी केला. महाराष्ट्राचा विकास अशक्य गोष्ट नाही राज ठाकरे म्हणाले, पुरुष गरोदर राहणे व बाहेर आलेली टूथपेस्ट पुन्हा ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. महाराष्ट्र समृद्ध व प्रगत करणे शक्य आहे. पण सध्याचे राजकारणी या प्रगतीच्या मार्गातील अडथळा ठरत आहेत. जगातील एवढे देश मोठे होऊ शकतात, तर महाराष्ट्राने काय घोडे मारले? महाराष्ट्र मोठा आहेच, पण या राजकारण्यांच्या स्वार्थामुळे हे घोडे अडले आहे, पाणी अडले आहे. आता हे अडलेले पाणी मोकळे करण्यासाठी तुम्हाला विचार करावा लागेल. जनतेने या लोकांचे गुलाम म्हणून राहू नये. मनसेने येथील जनतेच्या विकासासाठी एक चांगला पर्याय दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जरांगेंना टोला उल्लेखनीय बाब म्हणजे राज ठाकरे यांनी आपल्या लातूर येथील सभेत त्यांनी मराठा आरक्षण व मराठवाड्यातील मुलभूत सोयीसुविधांच्या मुद्याला हात घातला होता. ते म्हणाले होते, अशा आंदोलनांमुळे आरक्षण मिळत नाही. त्यानंतरही कुणी देतो असे म्हणत असेल तर त्याला कसे? असा प्रश्न विचारा. मराठा समाजाचा पहिला मोर्चा मुंबईत आला तेव्हा चारही पक्ष त्याला सामोरे गेले होते. एवढी वर्षे प्रत्येकाचे सरकार येऊन गेले, पण कुणीही आरक्षण दिले नाही.