ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाची भीती नसते:शरद पवारांचा बबनराव शिंदे यांच्यावर हल्लाबोल

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारवर टीका केली आहे. ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नसते, अशी टीका पवारांनी केली आहे. सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, मला देखील ईडीची नोटीस आली होती. मी राज्य सरकारी बँकेचे पैसे काढल्याचे सांगण्यात आले होते. पण मी राज्य सहकारी बँकेचा सभासद देखील नव्हतो, तरी मला नोटीस आली. मी ईडीच्या कार्यालयाच्या जवळ गेलो त्यानंतर, अधिकारी आणि पोलीस प्रशासन म्हणले आमची चूक झाली. त्यांनी मला हात जोडले, असे शरद पवार यांनी सांगितले. ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कोणाच्या बापाची भीती नाही माढा येथील आमदार बबनदादा शिंदे यांना माझ्या खासदारकीचा निधी सुद्धा विश्वासवर खर्च करायचे अधिकार दिले होते. पण राज्यात सरकार बदलले, आपला पक्ष फुटला त्यावेळी हा माढ्याचा गडी कुठे गेला कळलेच नाही. मी विचारले तेव्हा ईडीची भीती असल्याचे सांगितले. संकट आल्यावर ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कोणाच्या बापाची भीती नाही, अशी टीका पवारांनी केली. पुढे पवार म्हणाले, निवडणुका लागल्यावर हे आमदार बबनदादा शिंदे परत माझ्याकडे आले. चुकले म्हणाले. मी पण म्हणलो, चुका पोटात घेऊ, संधी देऊ. त्यांनी तिकीट मागायला आलो असल्याचे सांगितले. तेव्हा मी त्यांना सांगितले आता नव्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे. त्यांच्या डोक्यात नवीन म्हणजे त्यांचा लेक वाटला, असा टोला शरद पवारांनी बबनदादा शिंदे यांना लगावला. 40 वर्ष मी तुम्हाला मदत केली. तुमच्या कामात लक्ष घालण्याची तयारी मी ठेवली. सीना माढा सिंचन योजनेसला निधी दिला. तुमच्या कारखान्याला मी मदत केल्याचेही यावेळी पवारांनी सांगितले. दोन वर्षात महाराष्ट्रात 67 हजार 381 महिलांवर अत्याचार शरद पवार पुढे म्हणाले, दोन वर्षात महाराष्ट्रात 67 हजार 381 महिलांवर अत्याचार झाले आहेत. म्हणजेच दर तासाला पाच महिलांवर या महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत. महाराष्ट्रातील 64 हजार महिला आणि लेकी बेपत्ता आहेत. शिंदे-फडणवीस अशा राज्यकर्त्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही, असा हल्लाबोल शरद पवारांनी महायुती सरकारवर केला आहे. 62 लाख मुळे राज्यात बेरोजगार राज्यात बेरोजगारी देखील वाढली आहे. 62 लाख मुळे राज्यात बेरोजगार आहेत.हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे शरद पवार म्हणाले. मोदींनी उद्योगपतींचे 16000 कोटींचे कर्ज माफ केले. मात्र, शेतकऱ्यांचे पाच ते दहा हजारांचे कर्ज माफ केले नाही. या सरकारला शेतकऱ्यांबाबत आस्था नसल्याचे शरद पवार म्हणाले.

Share

-