कन्नडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेला ‎सत्तार, अजित पवार गटाची दांडी:महायुतीत छुप्या बंडामुळे नेत्यांची धाकधूक वाढली

कन्नडला साेमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‎यांची सभा झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांचे‎निकटवर्तीय समजले जाणारे पालकमंत्री‎अब्दुल सत्तार आणि अजित पवार गटाचे‎पदाधिकारी गैरहजर होते. वैजापूर, जालना ‎आणि घनसावंगीतही मुख्यमंत्र्यांनी‎ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.‎ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (११‎नोव्हेंबर) कन्नड शहरात आले होते. संजना‎ जाधव यांना ऐनवेळी शिंदे गटात प्रवेश ‎दिला. लगेच दुसऱ्या दिवशी शिंदेसेनेकडून ‎उमेदवारी दिल्याने कन्नडमधील महायुतीत ‎तिन्ही पक्षांच्या तीन ते चार इच्छुकांसह ‎पालकमंत्री अब्दुल सत्तार नाराज आहेत.‎त्यामुळे त्यांनी सभेकडे पाठ फिरवली.‎ वैजापूर | मागील निवडणुकीत आमदार‎बोरनारे यांच्याविरुद्ध लढणारे भाऊसाहेब‎पाटील चिकटगावकर अभय पाटील ,‎राजीव डोंगरे, संतोष जाधव , एल . एम.‎पवार, संजय निकम हे पाच उमेदवार आज‎आपल्या बाजूने आहेत. माजी आमदार ‎‎भाऊसाहेब यांच्या नावाचा उल्लेख करून ‎‎मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवसेना उद्धव ‎‎बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अनुभव त्यांना‎आला आहे. त्या पक्षाला फक्त माल म्हणजे‎पैसे देणारा सक्षम उमेदवार हवा असतो,‎अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न‎घेता वैजापुरात केली.‎ महाविकास‎आघाडीचे नेते सत्तेवर असताना ते घरातच‎बसले व समृध्दी महामार्ग, वॉटरग्रीड,मंंुबई‎मेट्रो अशा योजनांना ब्रेक लावले, अशी‎टीका मुख्यमंत्र्यांनी जालन्यात केली.‎ घनसावंगीत माजी मंत्री राजेश‎टोपेंवर सोडले टीकेचे बाण‎ घनसावंगी मतदारसंघात २५ वर्षे एकाच‎व्यक्तीकडे सत्ता दिल्याने विकासाच्या नावाने‎बोंबाबोंब झाली आहे. त्यांनी स्वतःच्या‎शाळा, कारखाने, सूतगिरण्या यांचाच‎विकास केला. सर्व सामान्य जनतेच्या‎मूलभूत गरजा तसेच रस्ते आणि पाणी या‎मुख्य कामांकडे दुुर्लक्ष केले, अशी टीका‎मुख्यमंत्र्यांनी माजी मंत्री राजेश टोपेंवर केली.‎ चाळीसगाव घाटातील बोगद्याचे‎काम मार्गी लावण्याची ग्वाही‎ बोगदे आणि रस्त्यांच्या कामात मी पटाईत‎आहे. त्यामुळे कन्नड घाटातील बोगद्याचे‎काम मार्गी लावले जाईल, असे आश्वासन‎यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. लाडक्या‎बहीणींचे मानधन १५०० वरून २१०० रुपये‎केले जाईल,लाडकी बहीण प्रवास करायला‎लागली आणि एसटी नफ्यात आली, असे‎मुख्यमंत्र्यांनी सांगितले.‎ सत्तारांची नाराजी का?‎ लोकसभा निवडणुकीपासून पालकमंत्री‎सत्तार आणि माजी केंद्रीय मंत्री‎रावसाहेब दानवे हे एकमेकांवर‎आरोप-प्रत्यारोप करत आहेत. एका ‎नेत्याने आरोप केला की लगेच त्याला ‎दुसऱ्याकडून प्रत्युत्तर दिले जाते. कन्नड ‎मतदारसंघाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी‎ पालकमंत्री सत्तार यांच्याकडे दिली होती.‎ मात्र, ऐनवेळी रावसाहेब दानवे यांच्या‎कन्या संजना जाधव यांनी पक्षप्रवेश‎करून उमेदवारी मिळवली. त्यामुळे‎पालकमंत्र्यांनी उमेदवारीचा शब्द दिलेले‎पदाधिकारी नाराज झाले. कट्टर विरोधक‎रावसाहेब दानवे यांच्या कन्येसाठी‎मतदारसंघात काम कसे करावे, असा‎प्रश्न सत्तारांसमोर निर्माण झाला. त्यामुळे‎त्यांनी सोमवारी झालेल्या सभेपासून‎अंतर राखणे पसंत केले. त्यांच्या‎भूमिकेकडे लक्ष लागले आहे.‎

Share

-