हिंदूंच्या बाबतीत मोदींची भोंदूगिरी:बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार विरोधातील आंदोलनात भाजप-संघ का नाही? संजय राऊत यांचा सवाल

बांगलादेशांवर हिंदू वरील अत्याचार हा चिंतेचा विषय असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. तेथील मंदिरांवर हल्ले होत आहेत. तेथील इस्कॉनच्या प्रमुखांना अटक झाली आहे. हिंदूंचे मोठ्या प्रमाणात खून होत आहेत. हे सर्व चिंताजनक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, हे सर्व चित्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विचलित करत नसेल आणि फक्त सचिव पातळीवर चर्चा सुरू असेल तर हे सरकार हिंदूंच्या बाबतीत भोंदूगिरी आणि ढोंग करत असल्याचा आरोप राऊत त्यांनी केला आहे. यांना फक्त हिंदूंच्या बाबतीत मतांचे राजकारण करायचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बांगलादेशाऐवजी असे काही जर पाकिस्तानात घडले असते तर नरेंद्र मोदींनी इंडिया गेट समोर भाषण करुन पाकिस्तानात घुसून मारू असा दावा केला असता. देशभरात तसे वातावरण निर्माण केले असते, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. देशात आता कुठेही निवडणुका नाहीत. बांगलादेशमध्ये यांना निवडणूक लढवायच्या नाहीत. त्यामुळे याबाबत काहीही बोलले जात नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधान हिंदुत्ववादी असतील तर स्वतः याकडे लक्ष घातले पाहिजे. केवळ सचिव पातळीवर चर्चा होऊन काही उपयोग होणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. बांगलादेश मधील हिंदूंवरील अत्याचा हा केवळ बांगलादेशाचा अंतर्गत विषय नाही. तर हा आपल्या देशाचा देखील विषय आहे. देशातील हिंदूंवर अत्याचार होत असेल तर तो आपल्या देशाचा देखील विषय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संपूर्ण देशभरात हिंदू नवरील अत्याचार विरोधात आंदोलने होत आहेत. सगळीकडे मोर्चे काढले जात आहेत. मात्र, यामध्ये भाजप आणि आरएसएस कुठेही नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सभापतींवर अविश्वास प्रस्ताव नरेंद्र मोदी मणिपूरला जात नाही. नरेंद्र मोदी बांगलादेश मधील अत्याचार विषयी बोलत नाहीत. असे असेल तर बंगालची फाळणी झाल्यामुळे हिंदू तिथे आहेत. त्यांच्या बाजूने कोण उभे राहणार? संसदेमध्ये त्यावर चर्चा करु दिली जात नसल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. राज्यसभेच्या सभागृहात ज्या पद्धतीने सभागृह चालवले जात आहे. त्यामुळे आम्हाला राज्यसभेच्या सभापतींवर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा दुर्दैवाने विचार करावा लागत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पराजय झालेल्या उमेदवारांना पठिंबा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या उमेदवारांना विजयाची खात्री होती. अशा उमेदवारांचा पराभव झाला आहे. ते सर्व उमेदवार आपापल्या पद्धतीने लढत आहेत. त्यांच्या या लढ्याला राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Share