पुण्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ रोगाचे थैमान:आजाराचे संकट ओळखून योग्य ती खबरादारी घ्या, शरद पवारांच्या राज्य सरकारला सूचना

पुणे शहरात ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ अर्थात ‘जीबीएस’ या दुर्मीळ रोगाने थैमान घातले आहे. आतापर्यंत या रोगाची 24 जणांना लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शहरातील तीन प्रमुख रुग्णालयांनी जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे. महापालिकेनेही याची दखल घेत समिती स्थापन केली. याबाबत शरद पवार यांनीही चिंता व्यक्त करत या आजाराचे संकट ओळखून योग्य ती खबरादारी घेण्याचेही पुणे महापालिका व राज्य सरकारला सुचवले आहे. पुणे महानगरपालिका हद्दीतील 6 खासगी रुग्णालयांमध्ये 24 संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. त्यापैकी 8 रुग्णांवरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. तर त्यापैकी 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. हे रुग्ण प्रामुख्याने सिंहगड रोड, धायरी आणि आसपासच्या परिसरातील असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात आढळलेल्या जीबीएस रोगाच्या संशयित रुग्णांपैकी सर्वांत कमी वयाचा रुग्ण 2 वर्षांचा, तर सर्वाधिक वयाचा रुग्ण 68 वर्षांचा आहे. नेमके काय म्हणाले शरद पवार? ‘जीबीएस’ अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने पुणे शहर आणि शहरालगत काही भाग विशेषतः सिंहगड रस्त्यावरील पुणे मनपामधील नवी समाविष्ट गावांमध्ये नागरीक बाधित झाल्याचे निदर्शनात आले आहे. या दुर्मीळ आजाराची दाहकता लक्षात घेता आणि नागरिकांमध्ये वाढलेले भीतीचे वातावरण ही एक चिंतेची आणि गंभीर बाब म्हणावी लागेल. दूषित पाण्यातून या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासन व राज्य सरकारने ही परिस्थिती आटोक्यात आखण्याकरिता योग्य ती खबरदारी घ्यावी. संभाव्य संकटाचे अतिदक्षतापू्र्वक योग्य नियोजनातून निराकरण करण्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे, असे शरद पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. नेमका आजार काय आहे?
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा एक दुर्मिळ स्वयंप्रतिकार रोग आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जा संस्थेच्या भागावर हल्ला करते. यामुळे पक्षाघात होऊ शकतो आणि मृत्यू होऊ शकतो. गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे कारणे बहुतेक रुग्ण होतात बरे गुइलेन हा आजार दरवर्षी 1 लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला होतो. याचे निदान गुंतागुंतीचे असते. चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या याच्या निदानासाठी आवश्यक असतात. आयव्हीआयजी अथवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. या आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होत असले, तरी 20 टक्के रुग्णांना सहा महिन्यांनंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात. 2021 मध्ये काहींना रोगाची लागण 2021 मध्ये कोरोना लस घेतलेल्या काही जणांना ह्या रोगाची लागण झाल्याचे बोलले जात होते. कोट्यावधी लोकांनी कोरोना लस घेतलेली असताना केवळ काहीच लोकांमध्ये आजाराची लक्षणे दिसून आली.

Share