आईचा खून करणाऱ्या नराधमाला जन्मठेप:किरकोळ कारणावरून हातपाय तोडत जाळून टाकले होते, अखेर 6 वर्षांनी लागला निकाल

वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे 2018 साली जन्मदात्या आईवर विळ्याने वार करत तुकडे करून निघून हत्या केल्यानंतर आईला जाळून टाकणाऱ्या नराधम मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वैभव पाटील यांनी ही शिक्षा सुनावली आहे. मंगरूळपीर येथे झालेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरले होते. वाशिमच्या मंगरूळपीर येथे 31 ऑक्टोबर 2018 रोजी आरोपी अतुल गावंडे हा त्याच्या पत्नीसोबत वाद घालत होता. हा वाद मिटवण्यासाठी त्यांची आई त्याची समजूत घालण्यासाठीमध्ये पडली. त्यानंतर आरोपीचा राग त्याच्या आईवर असल्याने मध्यरात्री आई झोपलेली असताना तिच्यावर विळ्याने वार करत हातपाय धडावेगळे केले. याच वेळी त्याची बायको आणि वाहिनीला देखील त्याने जखमी केले. घाबरून या दोघींनी घराबाहेर पळ काढला. घरात नराधम मुलाने स्वतःच्या आईला जाळून टाकले. या घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली होती. या घटनेला 6 वर्षे उलटून गेली व अखेर आज यावर निर्णय सुनावण्यात आला असून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्व साक्ष पुरावे तपासल्यानंतर या खटल्यात सत्र न्यायालयातील न्यायाधीश वैभव पाटील यांनी हा अंतिम निकाल दिला आहे. कोल्हापूर प्रकरणात शिक्षा कायम
अशीच घटना 2017 साली कोल्हापूर येथे घडली होती. दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून नराधम मुलाने आईची अतिशय क्रूरपणे तिच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडत हत्या केली होती. या प्रकरणी हायकोर्टाने या नराधम मुलाला फाशीची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने आरोपीला हीच शिक्षा योग्य असल्याचे म्हणत फाशी कायम ठेवली आहे. फाशीची शिक्षा योग्यच असून तो सुधारण्याची कोणतीही शक्यता नसल्याने तो समाजात राहण्यास योग्य नाही, असे स्पष्ट मत मुंबई हायकोर्टाने निकालात नोंदवले आहे.

Share