जग ज्या रूपात पाहू इच्छिते…:तसेच होण्याच्या नादात आपण स्वत:चे खरे रूप गमावत आहोत

हॉलीवूड अभिनेत्री मर्लिन मन्रो एकदा गर्दीच्या रस्त्यावर मेकअपशिवाय फिरली. तिचे शरीर वाकलेले होते. ती विचित्र हावभाव करत होती. कुणीही तिला ओळखू शकले नाही. मर्लिनने तिची मैत्रीण ॲमीला विचारले, तुला मी मर्लिन मन्रो झालेले पाहायला आवडेल? ॲमीच्या उत्तराआधीच मर्लिनने तिची अदा दाखवली. तिने केस हलवत तेच हास्य पसरवले. तिथे उभे असलेले लोक थक्क झाले. वर्तणूक शास्त्रज्ञ डेल व्हिलेहन म्हणतात की, मुन्रो ही फक्त ओळख नव्हती.ती अनेक वर्षे तयार केलेले व्यक्तिमत्त्व होते. पण जेव्हा तिला स्वत:ला मूळ रूपात पाहावेसे वाटले तेव्हा जगाला फक्त मर्लिन हवी होती. खरी व्यक्ती नको होती. आपल्या डायरीत मर्लिनने लिहिले होते, ‘मी स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करतेय. ते सोपे नसते. या प्रक्रियेत ती स्वत:ची खरी ओळख गमावून बसली. मुन्रोची कहाणी अनोखी नाही. आपल्यातली कित्येक लोक समाजाच्या अपेक्षेनुसार स्वत:ला घडवत असतात. आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाला तोपर्यंत साफसूफ करत असतो जोपर्यंत समाज ते स्वीकारत नाही. समाजशास्त्रज्ञ एरव्हिंग गॉफमनने आपल्या पुस्तकात लिहिले होते की, सामाजिक गप्पा हे एक प्रकारचे प्रदर्शन आहे. पण आता लोक आपल्या व्यक्तिमत्त्वाला हजारो अज्ञात प्रेक्षकांसाठी घडवण्यात मग्न असतात. व्हिलेहन म्हणतात की, आपण आता स्वत:ला नव्हे आपल्या प्रतिमेला सांभाळतो. यामुळे आपले ‘खरे’ असणे वास्तवात कसे आहोत यापेक्षा कसे दिसतो यावर ठरते. आता गप्पांचे उद्दिष्ट जोडले जाणे नव्हे प्रतिमा सांभाळणे झाले आहे. न्यूरोसायन्स सांगते की, आपले मन याला बक्षीस समजते. म्हणूनच आपण वारंवार तेच करतो जे आपल्याला दुसऱ्यांच्या नजरेत कौतुकास्पद वाटते. परिणाम…नाते टिकवण्यात कमी पडतोय
डॉ. व्हिलेहन म्हणतात की, जगात ‘खरे’ असण्याचा सर्वात मोठा ट्रेंड असताना आपण आपल्यातील दुर्बलता, त्रुटीही विचार करूनच दाखवतो. दुर्बलता गाळतो. उत्स्फूर्त क्षण ऑनलाइन मंचांवर सादर करतो. खऱ्या भावनांना नव्हे तर प्रतिमा उजळ‌वण्याला प्राधान्य देतो, परिणामी इतरांकडून स्तुतिसुमने मिळवतो; पण खरी नाती टिकवण्यात कमी पडत आहोत.

Share