बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्यातील दाेषी ‘जमात’ला पाकिस्तानकडून फूस:भारताचा विरोध करणाऱ्यांची तीव्र निदर्शने

बांगलादेशात हिंदूंविरोधातील हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले आहे. हिंदूंविरोधात नोव्हेंबरपासून हिंसाचाराच्या घटनांची गुन्हेगार बांगलादेशची कट्‌टरवादी संघटना जमात-ए-इस्लामीला पाकिस्तान फूस लावत आहे. ढाका येथे पाकिस्तानी उच्च आयोग याचे केंद्र बनले आहे. शेख हसीना यांच्या पंतप्रधान म्हणून १६ वर्षांच्या कार्यकाळानंतर प्रथमच पाक उच्च आयोगात जमात-ए-इस्लामी आणि जुलैमध्येच स्थापन अत्यंत कट्टरवादी संघटना खिलाफत मजलिससोबत बैठकांचे सत्र सुरू आहेत. सूत्रांनुसार नोव्हेंबरमध्ये पाक उच्चायुक्तांनी या दोन्ही संघटनांसोबत सुमारे १० बैठका घेतल्या. हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन कौन्सिलचे म्हणणे आहे की, ऑगस्टपासून ते आतापर्यंत हिंदूंवरील हल्ल्याच्या तीन हजारांहून अधिक घटनांत जमातचे कट्टरवादी लोक सामील आहेत. दरम्यान, भारताच्या हिंसाचारामुळे घुसखोरीच्या घटना आणखी वाढू शकतात. ट्रम्प आल्यानंतर स्थिती बदलू शकते बायडेन सरकारने यूनुस सरकारला पाठिंबा दिला. पाकिस्तानी लष्कराचा पाठिंबा असलेल्या सरकारला मदत दिली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्थिती बदलू शकते. डेमोक्रॅटचा पाठिंबा असलेले यूनुस हे ट्रम्प यांचे नावडते आहेत. ट्रम्प यांनी बांगलादेशात हिंदूंविरोधातील हिंसाचारावर टिका केली आहे. बांगलादेशातील सध्याचे सरकार आपल्या हितांसाठी योग्य नाही, हे अमेरिकेच्या लवकरच लक्षात येईल. अर्थव्यवस्थेचा आलेखही खाली आला एकेकाळी वेगाने वाढणाऱ्या बांगलादेशी अर्थव्यवस्थेची सध्या वाइट स्थिती आहे. कोविडच्या खालच्या पातळीपेक्षाही कमी वृद्धी दर आहे. रेटिंग एजन्सी मूडीजने बांगलादेशी अर्थव्यवस्थेला स्थिरवरून निगेटिव्ह श्रेणीत टाकले आहे. स्थिती इतकी खराब आहे की, बांगलादेश अांतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून जितकी मदत मागत आहे त्यामुळेही अर्थव्यवस्था सुधरणार नाही. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा गळा घोटला यूनुस सरकारने सर्वात आधी वृत्तपत्रांची दडपशाही सुरू केली. १६७ पत्रकारांची मान्यता रद्द करण्यात आली. १२९ पत्रकारांविरुद्ध हत्या, अपहरण आदी गुन्हे दाखल केले. सरकारविरुद्ध आवाज उठवणाऱ्या विद्वान आणि वकिलांची दडपशाही केली. ऑक्टोबरमध्येच सात हजार लोकांना अटक करण्यात आली. : युनूस सरकारने उठवली जिहादी संघटनांवरील बंदी, लांगूलचालन धोरणाचा अवलंब बांगलादेशात घटनात्मक वैधता नसतानाही मोहंमद युनूस हे हंगामी सरकारचे प्रमुख बनले. युनूस हे केवळ लष्कर-मुल्ला युतीचा नागरी चेहरा आहेत. इस्लामिक हिंसाचार वाढण्याची कारणे अगदी स्पष्ट आहेत. युनूस सरकारने दहशतवादी कनेक्शन असलेल्या जिहादी संघटनांवरील बंदी उठवली. युनूस सरकारने इस्लामिक कट्टरवाद्यांना खूश करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष शब्दही काढण्याची घोषणा करण्यात आली. दुसरा ‘पाकिस्तान’ : इस्लामी हिंसाचारामुळे अस्थिर बांगलादेश दुसरा पाकिस्तान होऊ शकतो. हिंदूंवरील हल्ल्याचा भारताने यापूर्वीच तीव्र विरोध केला आहे. भारतात आधीपासूनच मोठ्या संख्येने बेकायदेशीर बांगलादेशी आहेत. विरोधातील घटना गुरुवारीही सुरूच होत्या. यूनुस सरकारला पाठिंबा देणारा पाकिस्तान समर्थक खालिदा झिया यांचा पक्ष बीएनपीने गुरुवारी भारतीय साड्या जाळल्या. बीएनपीच्या भारतविरोधी अभियानांतर्गत भारतीय सामानावर बहिष्कार घालण्यासाठी बांगलादेशातील अनेक शहरांत निदर्शेने केली जात आहेत. खालिदा झिया यांनी ३ डिसेंबरलाच पाकिस्तानी उच्चायुक्त सय्यद अहम मारूफ यांच्यासोबत चर्चा केली. ढाका, चितगाव आणि मेयमनसिंह विद्यापीठात कट्टरवादी विद्यार्थी संघटनांनी भारतविरोधी सभाही घेतल्या. चलनावर नाहीत बंगबंधू.. यूनुस सरकारने चलनी नोटेवरील ‘बंगबंधू’ शेख मुजीबुरहमान यांचे चित्र हटवण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशच्या राष्ट्रपित्याचा दर्जा प्राप्त असलेल्या ‘बंगबंधू’ यांच्या चित्राऐवजी आता नोटेवर जुलैतील विद्यार्थी आंदोलनाचे चित्र असेल. पाकिस्तानी साखर खाणार बांगलादेशी.. बांगलादेशने पाकिस्तानातून २५ हजार टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही खेप जानेवारीत कराचीहून चितगावला पोहोचेल. ५३ वर्षांत प्रथमच बांगलादेश पाकमधून साखर आयात करेल.
हिंदूंविरुद्ध दडपशाही चिंताजनक : अमेरिका अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारग्रेट मॅकलियॉड म्हणाल्या, बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांची दडपशाही चिंताजनक आहे. आमची स्थितीवर नजर आहे. मॅकलियॉड येथे दोनदिवसीय दौऱ्यावर आल्या आहेत.

Share