जमात-उद-दावाचा डेप्युटी चीफ मक्कीचा हार्टअटॅकने मृत्यू:मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइड हाफिजचा नातेवाईक, 2023 मध्ये जागतिक दहशतवादी घोषित

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मेहुणा आणि दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याचा आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मक्की गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. साखरेचे प्रमाण वाढल्याने त्याच्यावर लाहोरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अब्दुल मक्की हा जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा डेप्युटी चीफही होता. 2020 मध्ये त्याला टेरर फंडिंगसाठी न्यायालयाने 6 महिन्यांची शिक्षाही सुनावली होती. शिक्षेनंतर त्याने स्वतःला लो प्रोफाइल ठेवले होते. 2023 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले. कोण आहे अब्दुल रहमान मक्की? अब्दुल रहमान मक्की याला हाफिज अब्दुल रहमान मक्की या नावानेही ओळखले जाते. त्याचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे झाला. मक्की दीर्घकाळापासून हाफिज सईदच्या जवळ होता. त्याने लष्कर आणि जमात-उद-दावामध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. राजकीय प्रमुख आणि लष्करासाठी निधी उभारणे यासारखी कामेही मक्कीने हाताळली. तो लश्करच्या रेग्युलेटरी बोर्ड शुराचा सदस्यही होता. 2000 मध्ये लाल किल्ला आणि 2008 मध्ये मुंबईतील ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी मक्कीला भारतीय एजन्सींनी आरोपी मानले होते. अमेरिकेच्या वित्त विभागाने 2010 मध्ये त्याचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला होता. बातमी अपडेट होत आहे…

Share