लग्नापूर्वी सारिकाला स्टार मानत होते कमल हसन:त्यांच्या मानसिक-आर्थिक समस्यांबद्दल माहित नव्हते; कुणाहीची मदत घेत नव्हती अभिनेत्री
साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार कमल हसनने एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले. त्याने त्याची माजी पत्नी सारिकाशी संबंधित एक किस्सा शेअर केला. कमल हसन यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना कळले की सारिका तिचे घर सोडून गेली आहे आणि आर्थिक समस्यांना तोंड देत आहे तेव्हा मला धक्का बसला. सारिकाची अवस्था ऐकून कमल हसनला बसला धक्का
सिमी गरेवाल यांच्याशी झालेल्या संवादात कमल हसनने सांगितले की, त्यांची आणि सारिकाची पहिली भेट 1984 मध्ये ‘राज तिलक’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. आधी दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी 1988 मध्ये लग्न केले. कमल हसन म्हणाले की, ‘मला माहित नव्हते की सारिका तिचे घर सोडून एकटी मानसिक आणि आर्थिक समस्यांना तोंड देत आहे. जेव्हा मी तिला भेटलो तेव्हा ती एक स्टार होती, परंतु तरीही ती कुठे राहते हे फार कमी लोकांना माहित होते. जसजशी सारिका आणि माझी मैत्री घट्ट होत गेली तसतशी तिची खरी स्थिती मला कळली आणि मला धक्काच बसला. मला ती खूप आवडली, पण तिच्याबद्दल सहानुभूतीही होती. मात्र, सारिकाला त्या सहानुभूतीची गरजच नव्हती आणि तिने ते खूप अपमानास्पद मानले. तिला मदत हवी आहे का असे विचारले तर ती रागावली. 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला
कमल आणि सारिका यांचा 2004 मध्ये घटस्फोट झाला. दोघांना श्रुती आणि अक्षरा हसन या दोन मुली आहेत. घटस्फोटानंतर सारिकाने टीव्हीच्या दुनियेत प्रवेश केला. अलीकडेच सारिका अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘उंचाई’ या चित्रपटातही दिसली होती. कमलचे पहिले लग्न वाणी गणपतीसोबत झाले होते.
कमल हसनचे पहिले लग्न वाणी गणपतीसोबत झाले होते. वाणी आणि कमल यांनी 1975 मध्ये आलेल्या मेलनट्टू मारुमगल या चित्रपटात एकत्र काम केले होते. यादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली, ज्याचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. मात्र, लग्नाच्या 9 वर्षानंतर 1988 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.