सुहास कांदे यांच्यावर टीका करू नका:समीर भुजबळ यांच्या सभेत कांदे समर्थकाने घातला गोंधळ
नांदगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या सभेत गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदगाव तालुक्यातील साकूर या गावात समीर भुजबळ यांची सभा होती. या सभेत विरोधील उमेदवार सुहास कांदे यांच्या टीका करताना एका जण उठून आला आणि सुहास कांदे यांच्यावर टीका करू नका, असे म्हणत त्याने भर सभेत गोंधळ घातला. यानंतर समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ करणाऱ्याला बाहेर काढले. समीर भुजबळ यांची साकूर गावात सभा होती. समीर भुजबळ सभेला संबोधित करताना भाषणादरम्यान त्यांनी सुहास कांदे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. तेवढ्यात उपस्थित पैकी एका कार्यकर्त्याने आक्षेप घेत सुहास कांदेंवर टीका करू नका म्हणत आक्रमक पवित्रा घेतला. मात्र समीर भुजबळ यांनी त्याच्याकडे लक्ष न देता आपले भाषण सुरूच ठेवले. समीर भुजबळ ऐकत नसल्याचे पाहून सुहास कांदेंच्या समर्थकाने भर सभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालणाऱ्या सुहास कांदे समर्थकाला सभेत बाहेर हाकलून दिले. त्या व्यक्तीला बाजुला काढल्यानंतर साकूर ग्रामस्थांकडून समीर भुजबळ यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. समीर भुजबळ यांना नांदगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र, महायुतीत ही जागा शिंदे गटाला सुटली. शिंदे गटाने सुहास कांदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्व पदांचा राजीनाम देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, समीन भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र, समीर भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली नाही. समीर भुजबळ अपक्ष निवडणूक लढवत असल्यामुळे शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हे ही वाचा… सदा सरवणकरांना घरात नो एन्ट्री:प्रचाराला आलेले पाहताच महिलेचा राग अनावर; प्रश्नांचा भडिमार करत दारातूनच पाठवले परत; VIDEO सदा सरवणरकर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी माहीम मतदारसंघ पिंजून काढत आहेत नुकतेच ते कार्यकर्त्यांसह माहीम कोळीवाड्यात प्रचारासाठी गेले असता, त्यांना एका महिलेच्या रोषाला सामोरे जावे लागले. सदा सरवणकर घरासमोर येताच त्या महिलेचा राग अनावर झाला. तिने सरवणकरांवर प्रश्नांचा भडिमार करत आपला रोष व्यक्त केला. तसेच सदा सरवणकर यांना घरातही येऊ दिले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पूर्ण बातमी वाचा…