खोक्या-बोक्या कुणालाही सोडणार नाही:सगळ्यांना ठोकणार, सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

खोक्या उर्फ सतीश भोसले याचे घर आज पाडण्यात आले. वन विभाग आणि शिरूर कासार पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. खोक्याने वन खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण करत घर बांधले होते, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो. कुणालाही सोडले जाणार नाही. सगळ्यांना ठोकणार, अशी एका वाक्यात त्यांनी प्रतिक्रिया दिली. आज दिल्ली येथे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटसाठी बेठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दौऱ्यावर आहेत. भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राला चालना देणे आणि त्याची जागतिक उपस्थिती वाढवणे हे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे. WAVES ही माध्यमे आणि मनोरंजन उद्योगातील सर्व क्षेत्रांचा समावेश करणारी पहिली जागतिक शिखर परिषद आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. WAVE बद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री? वेव्हसाठी मुंबईला होस्ट म्हणून निवडले आहे. महाराष्ट्राला होस्ट स्टेट म्हणून निवडले आहे. जगातील या क्षेत्रातील सर्वात मोठी समीट होणार आहे. ऑडिओ, व्हिज्युअल एन्टरटेन्मेन्ट या क्षेत्रातील जे व्हूज व्हू आहेत, ते सगळे या निमित्ताने मुंबईत येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याठिकाणी येणार आहेत. एक सीईओ राउंड टेबल देखील करणार आहेत. त्यामुळे एक प्रचंड मोठी संधी मुंबईला आणि महाराष्ट्राला मिळालेली आहे. क्रिएटीव्ह इकॉनॉमी ही सगळ्यात वेगाने वाढणारी इकॉनॉमी आहे. लवकरच भारत 50 बिलियन डॉलरची इकॉनॉमी तयार करतोय. म्हणून जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आपल्याला मिळणे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्राला यासाठी निवडल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. IIT प्रमाणे IICT स्थापन होणार भारत सरकारने आयआयटी प्रमाणे आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटीव्ह टेक्नॉलॉजी) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिले आयआयसीटी ही मुंबईलाच तयार होणार आहे. त्यासाठी गोरेगाव फिल्म सिटीमध्ये जागा निश्चित केली आहे. जवळपास 400 कोटी रुपये केंद्र सरकार त्याच्यावर खर्च करत आहे. कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रातील टेक्नॉलॉजीच्या सगळ्या गोष्टी या संस्थेच्या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध असतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. परिणय फुकेंच्या पुराव्यांची चौकशी करणार दरम्यान, विधिमंडळात लक्षवेधी लावण्याची धमकी आणि पैशांचीही मागणी केल्याचा आरोप आमदार परिणय फुके यांनी केला. यासंबंधित एक ऑडिओ क्लिपही परिणय फुके यांनी विधिमंडळात सादर केली. विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट कडून पैशांचा व्यवहार होत असल्याचा आरोप या माध्यमातून करण्यात आला आहे. परिणय फुके यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर बोलताना परिणय फुके यांनी काही पुरावे मांडले आहेत. त्यांच्या आरोपांची चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तत्पूर्वी या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिकची चौकशी झाल्यानंतरच पोलिस कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले होते.

Share