IPL 2025 मध्ये केएल राहुल कोणाच्या संघात जाणार?:रोहित, विराट की धोनी.. म्हणाला- याचे उत्तर देणे खुप कठीण

आयपीएल मेगा लिलावाच्या पार्श्वभुमीवर एका मुलाखतीत केएल राहुलला एक गमतीदार प्रश्न विचारण्यात आला. राहुल आरसीबीमध्ये जाणार अशी चर्चा आहे. अशा स्थितीत राहुलचे उत्तर नक्की जाणुन घ्या. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल मागील काही दिवसांपासुन चर्चेत आहे. केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सपासून वेगळा झाला आहे. सांगितले जात आहे की, राहुलने लखनऊ मॅनेजमेंटला स्पष्ट सांगितले होते की मला संघाबरोबर कायम ठेवू नका. यानंतर राहुलची विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये जाण्याच्या चर्चांना उधान आले आहे. यातच राहुलला एका मुलाखतीत गमतीदार प्रश्न विचारण्यात आला. केएल राहुलला मुलाखतीत विचारण्यात आले की, रोहित शर्मा, विराट कोहली की एमएस धोनी, आयपीएल 2025 साठी तुमचा संघ कोणता असेल. आता अशी बातमी समोर येत आहे की आरसीबी आणि केएल राहुलमध्ये बोलणे झाले आहे. आरसीबी कोणत्याही परिस्थितीत राहुलला लिलावात घेईल. तोही सतत आरसीबीचा उलेलख करत आहे. अशात स्वाभाविक आहे की तो आरसीबीचे नाव घेईल. परंतू असे झाले नाही. राहुलने सांगितले की, याचे उत्तर देणे खुप कठीण आहे. मी या सर्वांसोबत खेळण्याचा आनंद घेतला आहे. याचे उत्तर देणे खुप कठिण आहे. आरसीबीने केएल राहुलसाठी 30 कोटी रुपये राखुन ठेवले आहे
याआधी अशी बातमी आली होती की, आरसीबीने केएल राहुलला मेगा लिलावात खरेदी करण्यासाठी 30 कोटी रुपये राखुन ठेवले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की आरसीबीचा संघ कोणत्याही परिस्थितीत केएल राहुलला खरेदी करेल. राहुल पहिलेही या संघाचा भाग राहिलेला आहे. केएल राहुलने 2013 मध्ये आरसीबीकडून खेळताना आपले आयपीएल पदार्पण केले होते. आरसीबीसाठी तो 4 सीझन खेळला, ज्यात त्याने 19 सामने खेळतांनी 417 धावा केल्या होत्या. आरसीबीने या खेळाडूंना आयपीएल 2025 साठी कायम ठेवले आहे
आरसीबीने आयपीएल 2025 साठी केवळ 3 खेळाडूंना कायम ठेवले आहे. आरसीबीने आयपीएल 2025 साठी विराट कोहली (21 कोटी), रजत पाटीदार (11 कोटी) आणि यश दयाल यांना 5 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. आरसीबीच्या पर्समध्ये अद्याप 83 कोटी रुपये शिल्लक आहेत आणि अशा परिस्थितीत हा संघ राहुलसाठी लिलावात 30 कोटी रुपयांपर्यंत बोली लावण्यास तयार असल्याचा दावा केला जात आहे.

Share

-