विधिमंडळात पुन्हा ‘पेन ड्राईव्ह’:फडणवीस, शिंदे यांना अडकवण्याचा कट रचला गेला; भाजप-शिवसेना नेत्यांचा मविआवर गंभीर आरोप

आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी विधान परिषदेमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. तत्कालीन काही पोलिस अधिकाऱ्यांनी त्यावेळेसचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडी मधील नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या प्रकरणात कसे गोवता येईल, अशी चर्चा करत होते. या विषयीचा व्हिडिओ क्लिप आणि ऑडिओ क्लिप असलेला एक पेन ड्राईव्ह सभागृहात दाखवण्याची सभापतींकडे समोर ठेवला आहे. यामधील काही स्टेटमेंट देखील त्यांनी सभागृहात वाचून दाखवले. अत्यंत अश्लील भाषेत वरिष्ठ अधिकारी बोलताचे यामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांना त्यामध्ये गुंतवण्याचा एक कट त्यामध्ये रचला जात होता, असे देखील दिसून आले. त्यामुळे या प्रकरणाची वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या समितीच्या माध्यमातून एसआयटी चौकशी करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याचा कट रचला गेला असल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला असल्याचे देसाई यांनी सांगितले. यामध्ये एक वरिष्ठ अधिकार देखील त्यात आहे. त्यामुळे एखाद्या एसीपी किंवा डीसीपी दर्जचा अधिकारी एवढे मोठे धाडस करू शकत नाही. त्यावेळी त्यांनी तत्कालीन डीजे पांडे यांचे नाव घेतले आहे. मात्र डीजी लेव्हलाचा अधिकारी देखील कोण्याच्यातरी सांगण्यावरूनच हे करेल, असे सरकार म्हणून आमचे मत झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. एखाद्या सन्माननीय सदस्याला जर या संबंधीची अधिकची माहिती द्यायची असेल तर ती माहिती देता येईल, अशी देखील तरतूद यामध्ये ठेवण्यात येणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणावरून कडक कारवाई करण्याची घोषणा देखील आज शासनाच्या वतीने सभागृहात करण्यात आली असल्याची माहिती देसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. मुळाशी कोण? या सर्व प्रकरणामागे कोण आहे? याच्या मुळाशी गेले पाहिजे. या छोट्या अधिकाऱ्यांना कोण हलवत होते, ते शोधले पाहिजे. हे आम्ही सरकारच्या वतीने सभागृहात सांगितले असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे. त्यामुळेच वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. सहजासहजी हा विषय सरकार सोडणार नाही. कारण दोन महत्त्वाच्या नेत्यांचा उल्लेख त्यामध्ये असल्याचे देखील देसाई यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि मूळ सूत्रधार शोधून काढला जाईल, असे देखील शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंवर पलटवार उद्धव ठाकरे गटात जे लोक निवडून आले आहेत त्यांच्यात देखील प्रचंड अस्वस्थता आहे. त्यांच्या लोकांशी आमची देखील चर्चा सुरू असते. त्यामुळे आम्ही पण त्यांचे नाव सांगायला तयार असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. सत्ताधारी पक्षातील आमदार माझ्या संपर्कात असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. यावर शंभूराज देसाई यांनी पलटवार केला आहे. त्यांनी आधी आमच्या पक्षातील लोकांची नावे सांगावीत, आम्ही पण त्यांच्या पक्षातील लोकांची नावे सांगण्यास तयार असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.

Share