महाडिकांच्या धमकीचा सुप्रिया सुळेंकडून समाचार:म्हणाल्या – हे स्वत:ला कोण समजतात? अदृष्य शक्ती मागे आहे, म्हणून काहीही करतील का?

भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर येथे सभेत लाडकी बहीण योजनेविषयी बोलताना महिलांविषयी वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरून सुप्रिया सुळे यांनी महाडिकांसह भाजपवर जोरदार टीका केली. महिलांबाबत गलिच्छ बोलणे ही भाजपची संस्कृती आहे. हे स्वतःला कोण समजतात? आधी नगरमध्ये आणि आता महाडिकांनी महिलांबाबत गलिच्छ भाषा वापरली. अदृष्य शक्ती मागे आहे, म्हणून काहीही करतील का? लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करून दाखवा, गाठ माझ्याशी असेल, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. भाजपच्या नेत्याने महिलांना गलिच्छपणे धमकी दिल्याप्रकरणी आम्ही केस करणार आहोत. निवडणूक आयोगालाही नोटीस पाठवली असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, हा छत्रपतींचा, शाहू, फुले यांचा महाराष्ट्र आहे. महिलांबाबत गलिच्छ बोलणे ही महाराष्ट्राची नाही, तर भाजपची संस्कृती आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. भापजचे नेते सातत्याने महिलांचा अपमान करतात, धमकी देत आहेत. आधी नगरमध्ये बाळासाहेब थोरांत यांच्या लेकीला बाबत गलिच्छा भाषा वापरली, आता पुन्हा महाडिकांनी महिलांना धमकी दिली. अशा गलिच्छ विधान करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही ताकदीने उभे राहू, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. देवेंद्र फडणवीसांवर साधाला निशाणा
सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या फेक नरेटीव्ह टीकेवरही प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस हे आम्हाला फेक नेरेटिव्हचे डायरेक्टर, क्रिएएटर म्हणतात. 70 हजार कोटींचा आरोप फडणवीस यांनी केला. त्या फाईलवर फायनल सही फडणवीस यांचीच होती. या घोटाळ्याची चौकशी लावणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षातील अजित पवारांना घरी बोलवून फाईल दाखवली. हे फेक नेरेटिव्ह नाही, तर वास्तव आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. सुनील टिंगरेंना पुन्हा दिले प्रत्युत्तर
दरम्यान सुनील टिंगरे शरद पवार यांना पाठवलेल्या नोटीसीवर सुप्रिया सुळे यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. पाठवलेल्या नोटीसमध्ये पक्षाच्या अध्यक्षांचा उल्लेख आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष हे शरद पवार आहेत. आमच्यावर क्रिमिनल केस करू, अशी आम्हाला धमकी देण्यात आली. आमच्या पक्षाचे नेते त्यांच्या विरोधात बोलल्याच म्हटले आहे. हे सर्व टिंगरे यांच्या वकिलांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. सुनील टिंगरे यांच्याकडून शरद पवार, उद्धव ठाकरे, खरगे यांना धमकी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. हे ही वाचा… उद्धव ठाकरेंची बॅग अधिकाऱ्यांनी तपासली:वणी येथे हेलिकॉप्टरमध्ये जाऊन घेतली झाडाझडती; ठाकरेंनी पोस्ट केलेला VIDEO व्हायरल विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्राचे वातावरण तापले असताना आता अधिकाऱ्यांनी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची झाडाझडती घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात ते बॅगांची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझ्यासारख्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅगा तपासण्याचेही आव्हान दिले. पूर्ण बातमी वाचा…

Share

-