महाराष्ट्राच्या 288 जागांवर मतदान सुरू:दुपारी 1 पर्यंत 32.18% मतदान; सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉईन घोटाळ्याचा आरोप

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज एका टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना आपला मताधिकार बजावता येईल. दुपारपी 1 वाजेपर्यंत 32.18% मतदान झाले असून, त्यात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 50.89%, तर मुंबई शहर विभागात सर्वात कमी 27.73% मतदान झाले. राज्यात एकीकडे मतदान सुरू असताना दुसरीकडे भाजपने पुन्हा एकदा बिटकॉईन घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांचा हात असल्याचा आरोप केला. या दोन्ही नेत्यांनी निवडणूक व मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी परकीय चलनाचा वापर केल्याचा आरोप भाजपने केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले की, या घोटाळ्याची ऑडिओ क्लिप समोर आली असून त्यात सुप्रिया सुळे यांचा आवाज आहे. मात्र, सुप्रिया आणि शरद पवार या दोघांनीही हे आरोप फेटाळून लावलेत. दुसरीकडे भाजप नेते विनोद तावडे नोट फोर व्होट प्रकरणात अडकलेत. पण त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावलेत. हे षडयंत्र आहे. राहुल गांधी आरोप करत असतील तर त्यांनी आधी मला 5 कोटी रुपये मिळाल्याचे पुरावे द्यावेत, असे ते म्हणालेत. अपडेट्स 1. नागपूर मध्य, नाशिक आणि मालेगाव येथील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाला. यामुळे नागपूर मध्य मतदारसंघातील एका केंद्रावर एक तास उशिराने मतदान सुरू झाले. 2. धुळ्यात एका मतदान केंद्रावर भाजप आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. 3. नवी मुंबईतील शिवाजी नगर मतदान केंद्राबाहेर एक संशयास्पद वाहन सापडले आहे. वाहनातून अनेक इंटरनेट राउटर, लॅपटॉप आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. निवडणुकीशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी ब्लॉग पाहा…

Share

-