महाराष्ट्रात 2-4 दिवसांत आचारसंहिता?:उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंदाज; काही कामे मार्गी लागणे अवघड असल्याचे सूतोवाच

महाराष्ट्रात पुढील 2-4 दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे बोलताना व्यक्त केला. राज्यात 2-4 दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या निवेदनात दिलेली कामे मार्गी लागणे अवघड आहे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे पुढील काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यात पुढील 2-4 दिवसांत आचारसंहिता लागण्याचा अंदाज व्यक्त केला. ते उपस्थितांना म्हणाले, राज्यात पुढील 2-4 दिवसांत आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे तुम्ही निवेदन दिल्यानंतर ती कामे मार्गी लागणे अवघड आहे. मागील 30 वर्षे आपण बारामतीचे वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जे काही झाले ते विसरून जा. मी आतापर्यंत बारामतीला सर्वात जास्त निधी दिला आहे. त्यामुळे आपण लोकसभेचा अपवाद वगळता आजपर्यंत घड्याळाचे बटन दाबत आलोत. आता विधानसभेलाही घडाळ्यासमोरील बटन दाबून आम्ही देईल तो उमेदवार विजयी करा. अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे अजित पवारांनी आज मुंबईत एक तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत महायुतीचे जागावाटप आणि पक्षाच्या आऊटगोईंगवर चर्चा होण्याची शक्यता आहे. देवगिरी बंगल्यावर होणाऱ्या या बैठकीत अजित पवार स्वतः आपल्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. रामराजे नाईक निंबाळकरही राष्ट्रवादी सोडणार उल्लेखनीय बाब म्हणजे इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारीच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी अजित पवार यांचा इंदापूर विधानसभा मतदारसंघातील मार्ग खडतर बनला आहे. त्यातच शरद पवार यांनी अजित पवारांच्या पक्षाचे फलटण येथील नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आपल्या पक्षातील संभाव्य प्रवेशाचेही संकेत दिलेत. याशिवाय इतरही काही नेत्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. हे ही वाचा… राहुल नार्वेकरांचे सासरे दादांची साथ सोडणार:माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार यांची ‘तुतारी’ हातात घेण्याची शक्यता मुंबई – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सासरे तथा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. ते लवकर फलटणमध्ये आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन आपली पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास:रामराजे नाईक निंबाळकर दुसऱ्या पक्षात जातील असे वाटत नाही वाई – आपली साथ व आपला पक्ष सोडून महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे जाणार नाहीत, असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील वाई येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेनिमित्त व विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हे वाई, लोणंद, खंडाळा येथे दौऱ्यावर आले होते. वाई येथे जनसन्मान यात्रेची सभा संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. वाचा सविस्तर

Share

-