महाविकास आघाडीत 200 जागांवर मतैक्य:शरद पवार यांची माहिती, म्हणाले – मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर चर्चा करून ठरवू

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल हे आम्ही निवडणुकीनंतर ठरवू, आता चर्चा करणे योग्य नाही, आमच्यासाठी तो विषय संपला आहे. मविआची पत्रकार परिषद झाली तेव्हाच हा विषय ठरला. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि मी स्वतः होतो. जयंत पाटील यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी आहेच. ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, जागांबाबतचा निर्णय जयंत पाटील घेणार आहेत. दरम्यान शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीत 288 पैकी 200 जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागांसाठी आज बैठक होईल. बैठकीला तिन्ही पक्षांचे अध्यक्ष हजर राहतील. निर्णय घेतील आणि आम्हाला सांगतील. हरियाणाच्या निवडणुकीचा महाराष्ट्रात परिणाम नाही शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत जसा पिपाणीचा फटका बसला तसा फटका यावेळी बसेल का असा प्रश्न केा असता ते म्हणाले की, लोकसभेला जे चित्र होते ते स्पष्ट झालेले नव्हते. आता आम्ही स्पष्ट केले आहे. हरियाणात भाजप सरकार होते ते कायम राहिले. जम्मू काश्मीरमध्ये तसे झाले नाही. पण त्या निवडणुकीचा महाष्ट्रात परिणाम येथे होईल असे वाटत नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाबाबत काही नेते दावा करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रश्न केला असता शरद पवार म्हणाले की मनोज जरांगे यांचा निवडणूक लढण्याचा ‘निर्णय तर होऊ द्या, निर्णय झाल्यावर मग बोलता येईल. मविआने चेहरा ठरवावा- सीएम महायुतीच्या पत्रकार परिषदेत महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न विचारण्यात आला होता.त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की आमच्याकडे मुख्यमंत्रिपदाचे कुणालाही डोहाळे लागलेले नाही. आमचे काम हाच आमचा चेहरा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता विरोधी पक्षनेत्यांच्या चेहरा ठरवावा असे म्हटले होते. सीएमपदावर अंतर्गत चर्चा सुरू जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री चेहरा जाहीर करावा असं उध्दव ठाकरे यांचा आग्रह आहे पण याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहे.माझ्यावर मोठी जबाबदारी आहेच. जास्तीत जास्त विधानसभेला जागा निवडून आणायच्या आहेत. त्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे. बाहेरच्या पक्षातील लोकांना घेण्याचा आमचा उद्देश नाही. आमच्याकडे तरुण चेहरे आहेत, असे म्हणत त्यांनी यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देणार हे स्पष्ट केले आहे.

Share

-